Thursday, November 19, 2026

 

गुसांई आणि गोसाविये !

 गुसांई आणि गोसाविये ! 

गुसांई हा शब्द प्रथम तुलसी रामायणात वाचला तर गोसाविये हा ज्ञानेश्वरींत ! खरंतर दोन्ही शब्दांचा मतितार्थ समान आहे, जसे स्वामी किंवा गुरू अथवा संन्यासी आणि विरक्त पुरूष. मुळांत मन आणि इंद्रियांवर प्रभुत्व अर्थात स्वामित्व मिळवलेला विरक्त, संन्यस्त सत्पुरूष. 

गुसांईचा खरा उच्चार आहे गोस्वामी. गो म्हणजे इंद्रियें नि त्यांचा स्वामी तो गोस्वामी.  या शब्दांवर लिहिण्याचे मूळ कारण आहे ते माझे स्वत:चे पुरेसे समाधान करून घेण्यासाठी आणि वाटलं तुम्हालाही या स्वाध्यायांत सहभागी करून घ्यावे ! 

त्याचं असे आहे की आपण कित्येकदां एखादा शब्द वाचून पुढे जात असतो मात्र तो मागे राहिलेला शब्द कधीकधी स्वस्थ बसू देत नाही. अगदी तसेच या गुसांईने केले बघा. मग त्या एकाच शब्दावरून एकापाठोपाठ शब्द नि वाक्यांची रांग लागली. आता ‘गुरूवतीचा ठावो’ आठवायचे काय कारण, पण कधीतरी केव्हातरी नजरेखालून गेलेले शब्द किंवा वाक्प्रचार अचानक स्वत:ची जाणीव करून देतात नि लगेच आपली शोधमोहीम सुरू होते. तुमचेही असे कधी होते का हो ? 

रहाळकर 

१९ नवंबर २०२६.   



Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?