Sunday, December 13, 2020

 

फुगा आणि बुडबुडा !

 फुगा आणि बुडबुडा


खरं तर दोन्हीही केवळ हवेने भरलेले, पण त्या दोन्हीतला फरक आज अचानक लक्षात आला. पहा तुम्हाला भावतोय का तो

असे पहा, रबराचा फुगा त्याचे कॅपॅसिटी एवढाच फुगवतां येतो, जास्त फुगवला तर किंवा कुणीपिनमारली तर लगेच फुटतो आणि त्याचे अवशेष केविलवाणे दिसतात

आपल्या गर्वाचे किंवा अहंकाराचे तसेच आहे. रंगरूप, कुलशील, संपत्ती, विद्वत्ता, बळ, सात्विक किंवासोज्वळपणया सर्वांचाफुगाफुटला की माणूस कसा केविलवाणा होतो नाही


बुडबुड्याचे तसे नाही. तो पाण्यातून कधी निर्माण झाला नि कधी पाण्यातच विलीन झाला ते कळतही नाही. बुडबुड्याची उपमा मला जीव-चैतन्याच्या मन बुध्दी चित्त नि अहंकार या अविष्कारांपैकीअहंकारालाद्यावीशी वाटते. हा अहंकार त्रासदायक किंवा त्याज्य नाही, कारण तेअसणेपणाचे, ‘आहेपणाचे लक्षण आहे. हा अहंकार जीव-चैतन्याबरोबर आला आणि ते असेपर्यंत टिकणारा आहे. याला कितीही टोचले तरी तो फुटणार नाही नि म्हणूनकेविलपणानाही, केवळकैवल्यच’ ! 


जरा जास्तच झालाय् का हाडोज’ ! क्षमस्व ! ! 


प्रभु रहाळकर

११/१२/२०२० 


Friday, December 11, 2020

 

आरोग्य धाम खंड तेरा (Thirteen)

 आरोग्य धाम खंड तेरा (thirteen) 


डॉक्टर रंगलाल एक अद्भुत व्यक्तिमत्व होते. लोक त्यांना सहसा क्रूर आणि फसवे समजत नि त्याच बरोबर अतिशय लोभी देखील, जीवनच्या वडिलांचे अगदी उलटशिवाय ते उर्मट आणि रानटी वाटत लोकांशी वागतांना. जीवनचे प्रथम भेटीचे वेळी ते असेच वागले होते त्याच्याशीं

त्यांची पहिली मुलाखत घडली ती जीवनचे वडिलांच्या मृत्यूनंतरच्या खडतर काळांत, जेव्हा जीवन अतिशय विषण्ण मन:स्थितींत होते, अतीव दु: नि त्याचबरोबर एका अनामिक समाधानाच्या विचित्र मिश्रणांत ! त्यांना वडिलांची माया नि प्रेम तर हवे होते पण त्यांचे उत्तुंग व्यक्तिमत्वाच्या दडपणातून सुटकारा देखील. कारण त्यामुळे त्यांचे स्वत:चे अस्तित्व नगण्य ठरूं पहात होते

एक अत्यंत प्रेमळ पिता असलेले जगत् महाशय जीवनकडून निर्विवाद आज्ञाधारकपणाची अपेक्षा धरून होते. मात्र खूप काळ साचलेला  त्याचा असंतोष एक दिवस व्होल्कॅनो सारखा उफाळून आला


वडिलांशी प्रथमच केलेल्या विद्रोहाचा प्रसंग त्यांना आज स्पष्टपणे आठवतोय्. त्या वेळीं अतर बहूने पण खूप आकांडतांडव केले होते. तिने देखील बराच असंतोष आणि नैराश्य बाळगून ठेवले होते. विवाहाच्या पहिल्या रात्रीपासूनच जीवनला तिच्या तऱ्हेवाइकपणाची  कल्पना होती, नि ती तो सहन करत आलेला होता

एक अनाथ मुलगी म्हणून तिच्या काकांनी प्रतिपाळ केलेला असल्याने ती भांडकुदळ आणि हट्टी झाली होती. तिच्या वादळी स्वभावाचे वर्णन करायला पुरेशी उपमा देतां येणार नाही. कदाचित्कठोरएवढाच एक शब्द लागू पडेल. संतापाने ती किंचाळे, डोके बडवून घेई हाताला लागेल त्या वस्तूने, मात्र काकीने शिकवलेले घरकाम व्यवस्थित पार पाडत असे. तिच्यांत विलक्षण जोम नि ताकद होती. सकाळपासून रात्रीपर्यंत विश्रांती घेतां ती काम करू शके पण तिची तिखट जीभ कुणाचाही मुलाहिजा ठेवत नसे. एखाद्या गोष्टीचा निषेध करायचा झाल्यास उपाशी राहून ती तो व्यक्त करी. महिन्यांतले किमान आठदहा दिवस कुठल्या ना कुठल्या कारणाने ती उपाशी राही. सर्व प्रकारच्या दामदमटीचे उपचार संपून समोरची व्यक्ती शरण येईपर्यंत अन्नाला शिवण्याचा हेका ती सोडत नसे

आणि म्हणूनच लग्नाच्या पहिल्याच रात्री देखील अशा जडणघडणीची मुलगी आपला रूद्रावतार धारण करेल यांत नवल ते काय ? तथापि, आश्चर्याची बाब म्हणजे एक सून म्हणून तिने चांगला लौकिक मिळवला होता, नि त्याचे कारण होते सासूकडून तिला मिळणारी सन्मानाची वागणूक. इतरांसमोर ती प्रसन्न वदनाने वापरीत असे. जीवनचे आईची खात्री पटली होती की तिच्या पायगुणानेच घराण्याची भरभराट होत होती. विवाहानंतर जीवनने आयुर्वेदाच्या अभ्यासाला पूर्णपणे वाहून घेतले होते आणि ते पाहून जीवनच्या आईला तो नखशिखांत बदलला असल्याची खात्री झाली होती. या आधीं शाळेत असतांना जीवन सहाध्यायांशीं भांडणे उकरून काढी, भर वैशाखातल्या उन्हात तासनतास भटकंती करी, वयाने नि शरीराने भारी असलेल्यांची भंबेरी उडवी, तळ्यातल्या पाण्यांत ते पूर्ण गढूळ होइस्तवर वीसवीस  फेऱ्या पोहून काढी. अभ्यासासाठी चुकूनही पुस्तकांना हात लावणारा जीवन आता पहा किती बदलला आहे, आणि त्याचे सर्व श्रेय ती नव्या सूनबाईला देत असे. तिचे या घरांत येण्यामुळेंच हा बदल घडला आहे

आणि सासूचे असे उद्गार ऐकून नव्या नवरीला साहाजिकच खूप आनंद होई


तो काळ असा होता की जेव्हा जगत् महाशयांची कीर्ती दूरदूरवर पसरली होती. अनुभवांतून आलेल्या परिपक्वतेमुळे त्यांचे ज्ञान आणि दूरदृष्टी कमालीची बहरली होती. किरकोळ आजारांसाठी ते आतां स्वत: धावून जात नसत, ते आपल्या चिरंजीवांना तिकडे पिटाळत. अर्थात् गंभीर आजारांसाठी ते स्वत: जात.’आतां मला धावायची निकड नाही कारण जीवन जातोय. आणि ते मी स्वत: जाण्यासारखेच आहे’, ते स्मित करीत म्हणत

जीवन या शब्दाचा अर्थच मुळांत आहे जिवन्तपण आणि जीवन खरेच त्यांचे आयुष्य होता. मात्र ज्यांना अशा बोलण्याचा अर्थ कळत नसे त्यांना ते सांगतही नसत. ‘जीवन रूग्णाला पाहून आल्यावर मला सांगेल आणि मी त्याला योग्य ते मार्गदर्शन करीन. तुम्ही काळजी करू नका’, ते सांगत

मात्र वडिलांनीच एखादी केस पाहावी असे जीवनला वाटले तर ते आवर्जून जात. शिवाय दुसऱ्या कुणा डॉक्टरच्या उपचारांना रोग दाद देत नाही असे कळले तरी ते जातआणि सरतेशेवटी जर रोग फारच बळावला असेल तर मात्र स्वत: जावून मृत्यूची वेळ घोषित करीत


जगत् महाशयांची कीर्ती अधिकच वाढविणारी एक घटना घडली. नवग्राम मधील सर्वांत जुन्या जमीनदार घराण्यांतले वरद प्रसाद बाबू गंभीर आजाराने पछाडले गेले. एके काळीं जगत् महाशयांचे वडील दीनबंधू मोशाय त्यांचे घरीं हिशेबनिस म्हणून काम पाहात आणि मुलांना वैयक्तिक शिकवणी देखील देत. तेथील एका आजारी मुलाची यशस्वीपणे शुश्रुषा करता करता त्यांची वैद्यकीय क्षेत्राशी तोंडओळख झाली. तो मुलगा पूर्ण बरा झाल्यावर त्यावेळचे सुप्रसिध्द कविराज कृष्णदास सेनगुप्तांनी आपण होऊन त्यांना आयुर्वेदाचे बारकावे शिकवले होते. आणि म्हणून जगत् महाशय त्या घराण्याशी कायम कृतज्ञ राहिले. त्या रॉय चौधरी घराण्यातल्या कुणाही कडून त्यांनी फी आकारली नाही. आपल्या वयाच्या पंचेचाळीस वर्षांपर्यंत त्यांनी हा परिपाठ कायम ठेवला होता

मात्र  दुर्दैवाने त्या कुटुंबाने त्यांच्या भावनेची कदर तर केली नाहीच, त्यांचा वेळोवेळी अपमान करण्याची एकही संधी सोडली नाही. इतकेच नव्हे तर औषधांची किंमत देखील आदा केली नाही

आपली पत राखण्यासाठी जगत् महाशयांना जमीनदारीचा एक भाग विकत घेण्याशिवाय पर्याय नव्हता. त्या योगें ते नवग्रामच्या रॉय चौधरी घराण्याशी बरोबरी करू शकणार होते. शिवाय आणखी एक फायदा झाला त्याचा, कारण आता रॉय चौधरी त्यांना पाचारण करणार नव्हते. यापुढे ते हरिहरपूरचे कविराज हीरालाल पाठक यांना उपचारांसाठी बोलावू लागले. केस गुंतागंतीची असेल तेव्हा राघवपूरच्या गुप्ता कुटुंबियांपैकी कविराजांना पाचारण करीत


मात्र एक वेळ अशी आली की जगत् महाशयांना बोलावणे त्यांना भाग पडले. त्याचे असे झाले की वरद बाबू स्वत: गंभीर आजारी झाले आणि म्हणून त्यांच्या मुलाने कविराज गुप्तांना पाचारण केले. गुप्तांनी त्यांना तपासून सांगून टाकले की आतां मृत्यू अटळ आहे नि तीन ते नऊ दिवसांत तो घाला घालेल

मुलाने विचारले, ‘समजा मी त्यांना कलकत्त्यास नेले तर?’ 

काहीही उपयोग नाही. ते वाटेतच मरून जातीलगुप्ता म्हणाले

मुलाने डॉक्टर रंगलालना बोलावले आणि कविराजांचे निदान त्यांना सांगितले. ‘कविराजांनी केवळ नाडी पाहिली, नि.....’ 

डॉक्टर रंगलाल उसळून उद्गारले, ‘असे पहा, माझा अजिबात विश्वास नाही नुसत्या स्पर्षाने निदान करण्यावर. आजार गंभीर आहे खरा, नि वाटल्यास मी औषध लिहून देवू शकतो. पण जगणे-मरणे यांवर मी भाष्य करणार नाही.’

मग नेऊ मी त्यांना कलकत्त्याला ? कविराज म्हणतात तीन ते नऊ दिवसच जगतील ते.’ 

काय करायचं असेल ते कर !’ 

म्हणजे रंगलाल सुध्दा उपयोगाचे नाहीत

शेवटी अखेरचा उपाय म्हणून जगत् महाशयांचा सल्ला घ्यायचे ठरले

रूग्णाची नाडी पाहून जगत् महाशयांनी घोषणा केली, ‘खुशाल घेऊन जा त्यांना उपचारांसाठी कलकत्त्याला. मी लिहून देतो की त्यांना वाटेंत किंवा नंतरही काहीच होणार नाही. उपचारांनी ते पूर्ण बरे होतील. आणि असे झाले नाही तर मी माझा व्यवसाय सोडून देईन. घेऊन जा त्यांना कलकत्त्यास !’ 

आणि अगदी तसेच घडत गेले. वरद बाबू कलकत्त्याला सुखरूप पोहोचले, उपचारांना छान प्रतिसाद दिला, बरे झाले, आणि काही दिवस हवा पालटासाठी देवघरला देखील राहून आले


तथापि, ‘फीस्वीकारण्या बाबत ते जगत् महाशयांचे मन वळवू शकले नाहीत. आणि म्हणून प्रेमाची भेट म्हणून देवघरचे पेढे, एक उत्तम हुक्का नि पाईप, सर्वोत्कृष्ठ तंबाखू आणि गरम जाकीट त्यांना स्वीकारावेच लागले

त्याच सुमारास जीवनने त्यांना आपली फी वाढवून चार रुपये करण्याचा आग्रह केला होता. मात्र जगत् महाशयांना ते पटले नाही. जीवनने आपली मल्लीनाथी सोडली नाही. ‘वाटल्यास गरीब रूग्णांकडून तुम्ही काहीही घेऊ नका’, तो म्हणाला, ‘पण तुम्ही तुमची पत आणि दर्जा राखायलाच हवा, आणि जो जितके देईल तितकेच घेण्याचा परिपाठ सोडायला हवा’. 


हा काळ कदाचित् सर्वोत्तम म्हटला पाहिजे या कुटुंबासाठी. आणि तो नक्कीच तसा होता याची खात्री होती जीवनचे आईला, नि त्याचे कारण होती नुकतीच घरांत आलेली नववधू ! अतर बहूलाही याची पूर्ण जाणीव होती. दररोज सकाळीं पेशंट पाहायला जीवन निघे तेव्हा ती नवऱ्याशेजारी येऊन उभी राही. तिची भावना होती की तिच्यामुळेच नवऱ्याचे भाग्य फळफळते आहे


मात्र जगत् महाशयांचे निधनानंतर दत्त कुटुंबाच्या लौकिकाला घसरण लागली. जीवन मोशायला अजून कविराज ही पदवी लाभली नव्हती आणि त्यामुळे बरेच गिऱ्हाइक कामदेवपुरच्या मुखर्जी कविराजांकडे किंवा हरिहरपुरचे पाठक कविराजांकडे जात. नवग्रामची श्रीमंत मंडळी दुर्गादास कुंडू ला आपला फॅमिली फिजिशियन म्हणून बोलावित

जीवन दत्तला हे कळून चुकले होते की मेडिकलची डिग्री हातांत असेल तर त्याचे तरूण वय किंवा अल्प अनुभव त्याला डॉक्टर म्हणून प्रतिष्ठा नक्कीच देईल. शिवाय त्याला अजून पर्यंतमहाशयहा कौटुंबिक वारसा लाभलेला नव्हता. ‘महाशयहे बिरूद एरागेऱ्याला लावीत नसत लोक

अशा विपरीत परिस्थितीमुळे त्याचे मनांतील सुप्त इच्छा उफाळून वर येऊ लागली. त्याने डॉक्टर व्हायलाच हवे. डॉक्टर रंगलाल प्रत्यक्ष उदाहरण होते त्याचेपुढे

नवग्रामच्या नुकत्याच श्रीमंत झालेल्या ब्रजलाल बाबूने एक खैराती ॲलोपॅथीक दवाखाना सुरू केला नि एका नवीन डॉक्टरची भर पडली नवग्राम मध्यें

म्हणून आतां अधिक उशीर करणे योग्य नव्हते. त्याने महत्प्रयासाने दोन ग्रंथ मिळवले. एक होता वैद्यक शास्त्रावर आधारित नि दुसरा बंगाली भाषेंत लिहिलेलामटेरिया मेडिका’, औषधोपचारावर सर्व काही सांगणारा आद्य ग्रंथ. हे दोन्ही ग्रंथ जीवनने लपवून वाचायला सुरूवात केली कारण डॉक्टर रंगलालशीं याबद्दल बोलण्याची त्याची प्राज्ञा नव्हती. खरंतर त्यांचेशी या संदर्भांत बोलणे डॉक्टर रंगलालना नक्कीच खूप आवडले असते.


तथापि, तीनच महिन्यांनंतर नियतीने त्या दोघांना एकत्र आणले आणि किशोर त्यांचेमधील दुवा ठरला. कदाचित् म्हणूनच किशोर त्यांचा लाडका झाला होता

एक दिवस किशोरला अचानकच गंभीर तापाने पछाडले नि तो काही केल्या उतरेना. कृष्णदास बाबूंच्या आश्रयाखाली नवग्रामला आलेला पाटणा मेडिकल स्कूलमधे शिकलेला डॉक्टर हरीश त्याचेवर ॲलोपॅथीक उपचार करीत होता आणि त्या दिवशीं डॉक्टर रंगलालही येणे अपेक्षित होते

या बातमीने जीवनला आश्चर्याचा धक्का बसला. खरेतर त्याने दाखवलेल्या बेफिकिरीची त्याला लाज वाटत होती. वयाने मोठे असलेले कृष्णदास त्याचे मित्र होते, शिवाय आपल्या अंतरंग मित्र नेपालचे ते मेहुणे देखील होतेच. किशोर त्यांचा आवडतां स्नेही होता. नवीन डॉक्टर येण्यापूर्वीं तेच आख्या कुटुंबावर पिढ्ययान पिढ्या  उपचार करीत. एक डॉक्टर म्हणून नव्हे तर केवळ जिव्हाळ्यापोटी समाचाराला जाणे योग्य होते. एरव्हीं देखील त्या परिसरांत काम निघाले तर तो सहज भेटीला जात असे किशोरशी गप्पा मारायला. सात वर्षाचा किशोर  विलक्षण हुषार नि  चेष्टेखोर होतासांवळा नि तल्लख बुध्दीचा

अगदी परवांच नेपालच्या घरातून त्याचे बरोबर बाहेर पडतांना वाटेत  किशोर भेटला होता. खूप कडक ऊन होते त्या दिवशी नि तो एकटाच चालत होता. नेपालची कर्तव्यबुध्दि अचानक जागी झाली. त्याला किशोरला आपल्या बरोबर न्यावेसे वाटले. खरंतर किशोर त्याच्या घरीं जात असल्याचे स्पष्ट दिसत असूनही नेपालने, “कुठे निघालास ? आमच्या घरीं ?” अशी पृच्छा केली

नाही !” 

तर मग इतक्या उन्हात कुठे ?” 

तुझ्या सासुरवाडीला !” क्षणार्धात उत्तर आले

नेपालला नक्कीच आवडले नाही ते. मात्र जीवनने मोठ्यांदा हंसत वेळ मारून नेली

दोन महिन्यांनी मात्र जीवन महाशयांना चांगलेच कोड्यात टाकले किशोरने. जीवन अजूनही त्यांचे फॅमिली डॉक्टर असल्याने ते तापाने फणफणलेल्या किशोरला पाहायला म्हणून गेले. नाडी परिक्षेवरून तो ताप अपचनामुळे असावा. त्याच्या आत्त्याने तक्रार केली, “त्याने तापातसुध्दां खूप मिठाई नि तूप खल्लंय् ! मग अपचन होईल यांत काय नवल ?” 

काय ऐकतोय मी ?” जीवन महाशय हलकेच उद्गारले, “तू चोरून खाल्लीस मिठाई

डगमगतां किशोरने गुन्हा कबूल केला

चोरी करणे हा गुन्हा होत नाही कां ?” 

होय, पण मिठाई व्यतिरिक्त सर्व काही !” 

आता हे ज्ञान तुला कुठे मिळालं ?” 

भागवतांत सांगितलंय् तसं ! मी ऐकलंय् की भगवान श्रीकृष्ण सुध्दा दही दूध तूप लोणी नि मिठाई चोरत असत, मग ?”

जीवन महाशयांची चांगलीच पंचाइत झाली होती. त्यांनी काहीतरी वैद्यकीय दाखले देत सुटका करून घेतली

किशोरने त्यांचे बोलणे लक्षपूर्वक ऐकून घेतले नि म्हणाला, “ठीक आहे, पुढच्या वेळीं इतके नाही खाणार, बस्स थोडे थोडे ! “ 


त्या नंतर जेव्हा जेव्हा किशोर भेटे तेव्हा तेव्हा जीवन त्याला पुराणांतल्या गोष्टीवर प्रश्न विचारीत नि तो देखील आपल्या विलक्षण उत्तराने त्यांना नामोहरम करीत असे.

त्यांनी एकदा विचारले की रावणाला किती डोकी नि हात होते. त्यावर त्याने उत्तर दिले की अर्थातच दहा डोकी नि वीस हात. “पण तुम्हाला माहीत आहे का, की तो कधीच झोपू शकला नाही. कारण त्याला कुशीवर वळताच येत नव्हते ! “ 


या अशा हलक्या फुलक्या संभाषणांमुळे त्या दोघांची चांगलीच गट्टी जमली होती. मात्र आतां जेव्हा आजाराच्या गांभीर्यामुळे डॉक्टर रंगलालना पाचारण करण्याची वेळ आली तेव्हा ते स्वत:ला रोखू शकले नाहीत. ते स्वत: आपणहून गेले. कृष्णदास बाबूंची द्विधा मनस्थिति पाहून त्यांनी धीर दिला नि म्हटले, “कृष्णदास दादा, मी तुमचेकडे नेहमीच बंधू म्हणून पाहिलंय , आपण वेगळ्या जातीचे असूनही. एक काका त्याच्या पुतण्याचे भेटीस येऊ शकत नाही कायमला कृपाकरून पाहू द्या त्याला.”  तो अर्धवट बेशुध्दावस्थेत होता, ग्लानींत नि मोठाले श्वासोच्छ्वास करीत. भाद्रपदांतल्या उमस आणणाऱ्या उकाड्यांत त्याला गरम पांघरूणांत दडपून ठेवले होते. ‘न्युमोनियाचे लक्षण दिसतेंय्,’ नव्या डॉक्टरने माहिती पुरवली. ‘त्याचा ताप एकशे तीन डिग्रीच्या पुढे गेलाय्. मी वेळेवर उपचार केलेत, नाहीतर बिकट प्रसंग होता. पण मला कळत नाही की त्याचा ताप उतरायचे नाव कां घेत नाहीये


जीवनने निवांतपणे दोन्ही मनगटें तपासली, डोळे नि जीभ पाहिली नि पोट देखील. आपले हात धुतल्यावर ते पुसतापुसतां ते कृष्णदासना म्हणाले, ‘हा ताप एकविसाव्या किंवा चोवीसाव्या दिवशी उतरेल. काळजी करू नका. कृष्णदासदादा, ताप कठीण आहे, टायफॉईड असला तरी फार गंभीर स्वरूपाचा नाही. आणि हे डॉक्टर म्हणतात तसा न्युमोनिया असला तरी ते दुय्यम लक्षण आहे, मूळ कारण नाही.’ 

जीवनपेक्षा डॉक्टर हरीष फार लहान नव्हते नि जीवनला त्यांना दुखवण्याचा हेतु नव्हता. तथापि आपल्या मेडिकल डिग्रीचा आब राखण्यासाठी तो ठासून म्हणाला, “ नाही, मी माझ्या स्टेथोस्कोपने तपासले आहे. हा टायफॉईड असणे शक्यच नाही, न्युमोनियाच मूळ आजार आहे इथे ! “ 


आपल्या निदानाची खात्री असल्याने जीवनने नकारार्थी मान हलवली नि स्मितहास्य केले. आणि त्याचवेळी पालखी वाहणाऱ्या भोईंची आरोळी ऐकू आली. डॉक्टर रंगलालांचे आगमन झाले होते. डॉक्टर हरीष लगबगीने बाहेर गेला. जीवनलाही बाहेर स्वागतासाठी जावेसे वाटले. पण त्याची नजर किशोरच्या आईवर पडली. तिने आपला चेहरा पदराने झाकलेला होता. जीवन तिला म्हणाले की तिने काळजी करू नये. किशोरचा ताप एकवीस किंवा पंचविसाव्या दिवशीं नक्कीच उतरेल

मात्र या मुदतीवरून डॉक्टर रंगलालशी वादंग माजलेच

सर्व प्रथम खोलीतली गर्दी पाहून त्यांनी नाराजी दर्शवली. केवळ इलाज करणारा डॉक्टर नि नर्सने खोलींत थांबावे, वाटल्यास एखादा जवळचा चालेल. पण बाकी सर्वांनी आधी बाहेर जावे.

जीवन बाहेर पडूं लागले पण कृष्णदासांनी त्यांना हाताला धरून थोपवले. कृष्णदासांचा तळवा घामाने ओला झाला होता. त्यांना धीर देत काळजी करू नका असे त्यांना समजावले जीवनने

रंगलालांनी आपली तपासणी पूर्ण केली मात्र बोलले काहीच नाही त्यांनी आधींची प्रिस्क्रिप्शन पाहिली नि स्वत: दुसरी लिहायला घेतली. डॉक्टर हरीषकडे ती देत म्हणाले की ही औषधें सुरू करा. पेशंटला बार्लीवॉटर, डाळिंबाचा रस नि ताकावरील निवळ फक्त देत चला. टायफॉईड झालाय किशोरला


हरीषवर जणू आभाळ कोसळले होते. सर्वांच्या नजरा जीवनवर केंद्रित झालेल्या..... ! जीवनला अजूनही तो प्रसंग ठळकपणे आठवतोंय् ! हरीषला चोरट्यागत वाटू नये म्हणून त्यांनी आपली नजर जाणीवपुर्वक दुसरीकडे वळवली होती


डॉक्टर रंगलाल पेशंटच्या खोलीबाहेर आले आणि त्यांनी डॉक्टर हरीषला विस्ताराने सूचना दिल्या. त्यांतील कांही आयुर्वेद प्रणालींत बसण्यासारख्या नव्हत्या. तथापि जीवन दत्त त्यावेळीं गप्प राहिले. तसेही त्यांना आपले मत मांडण्याची ती वेळ नव्हती

डॉक्टर रंगलालांनी खाली बसत बरोबर आणलेल्या सामानातून औषध तयार करायला सुरूवात केली. औषध स्वत: तयार करण्याचा त्यांचा दंडकच होता तसा, कारण त्यांचा इतर डॉक्टर्स वा दवाखान्यांवर अजिबात भरंवसा नव्हता

आपत्कालीन व्यवस्था म्हणून ते विशेष औषध देखील देऊन ठेवीत. दर एक दिवस आड त्यांना पेशंटचा रिपोर्ट देणे त्यांनी बंधनकारक करून ठेवले होते. तथापि देखरेख ठेवणाऱ्या डॉक्टरला मात्र ते हमखास विश्वासांत घेत असत. त्याचेवर पुरेसा भरंवसा असला तर ते प्रिस्क्रिप्शन देखील त्याचे हातीं देत आणि एवढेच नव्ह तर त्याला ते औषध बनविण्याचीही परवानगी देत

त्यांच्या या काहीशा विचित्र वागण्यावर त्यांचे स्पष्टिकरण देखील तितकेच मासलेवाईक असे. ‘शेवटी विषाला सुध्दां पैसे मोजावे लागतात, म्हणून माझी खात्री आहे की एका विषाला पातळ करण्यासाठी कुणी दुसरे विष त्यांत मिसळणार नाही ! ‘आफ्टर ऑल, एव्हरी ड्रग बाय डेफिनिशन इज पॉयझन,’ ते म्हणत. तरी पण भेसळीच्या या दुनियेंत पाण्याला पैसे मोजावे लागत नाही म्हणून कुणी त्या औषधांत पाणी मिसळले, तर मात्र माझा नाईलाज आहे. अशा वेळी मी माझ्या लौकिकाला कशी बाध येवू देऊं, ते विचारीत


त्यांनी दोन्ही बाटल्या जोरजोरात हलवून अपेक्षित रंग आल्याची खातरजमा करीत त्या डॉक्टर हरीषच्या ताब्यांत दिल्या. ‘दोन प्रकारच्या आहेत या. एकातून औषध चालू ठेव, मात्र ताप खूप चढला किंवा पेशंट ग्लानींत गेला तर दुसरीचा वापर कर. ग्लानी येणे म्हणजे ताप खूप जास्त वाढल्याची खूण आहे. आणि ती सर्व ब्लॅंकेट्स काढून फेक. सगळी दारें खिडक्या उघड्या ठेवा. या मुलाने गुदमरून जायला नकोय्. चांगली मोकळी हवा खेळू द्या त्याचे खोलींत. कळतंय् ना तुला हे

ते जाण्यासाठी उठले

त्याला टायफॉईड झालाय का ?” कृष्णदास त्यांचे जवळ जात बोलले

आय ॲम अफ्रेड सो, चिंताजनक आहे हे सर्व !” 

म्हणूनच तुम्हाला विचारले, पुढे सांगा ‘. 

तो मरेल का जगेल हे मी नाही सांगूं शकत, देवाच्या मर्जीवर अवलंबून आहे ते.” 

सर्वांनाच माहीत आहे ते’, कृष्णदास कडाडले, ‘मीही तसेच म्हटले असते. मला तुमचा अभिप्राय हवाय. शेवटी टायफॉईड काही असाध्य नव्हे, त्यांतही काही श्रेणी असतातच ना ?’ 

रंगलालने त्यांचेकडे रोखून पाहात विचारले, “तुम्ही त्याचे वडील ? कृष्णदास ? “ 

होय मीच तो” 

मी इतकेच म्हणेन की आजार खूप बळावला आहे. मी त्याला मध्यम श्रेणींत ठेवीन. मात्र तो कधीही बिघडूं शकतो. नियमित औषधपाणी नि उत्तम शुश्रुषा यांनी बराच फरक पडू शकतो

तेव्हढी काळजी आम्ही नक्कीच घेऊं. बरा व्हायला किती काळ लागेल ? “ 

भविष्यवाणी कशी करेन मी, मला कल्पना नाही”. 


जीवनला हे फार वेळ सोसवेना. तो पुढे होत उद्गारला, “कृष्णदास दादा, काळजी करू नका. मी सांगतो बावीस ते चोवीसाव्या दिवशीं उतार पडेल. “ 

आपली बॅग आवरण्यासाठी खाली वाकलेले रंगलाल उसळून उभे राहिले, सर्पाला डिवचल्यावर उसळतो तसे.

मला कळेल काय तुम्ही कोण आहांत ते ? भविष्य सांगणार ?” 

नव्हे, ते कविराज आहेत. जगत् बंधू महाशयांचे नांव तर तुम्ही ऐकलेच असेल ? “ 

अर्थात् ! एक निष्णात कविराज होके ते. उत्तम निदान करणारे. या गांवातल्या वरद बाबूंची केस माहीत आहे मला.”

त्यांचेच चिरंजीव आहेत हे - जीवन दत्त.” 

रंगलालने जीवनकडे निरखून पाहिले. “बावीस ते चोवीस दिवस लागतील हे कशावरून म्हणतोस तूं , नाडी तपासून ?” 

होय, नाडी परिक्षेवरून मी तसा अंदाज बांधला. खरंतर चोवीसाव्या दिवशींच उतार पडेल, पण आपल्याकडे आजाराचे पहिले दोन दिवस दुर्लक्षित राहतात, म्हणून मी म्हटलं बावीस ते चोवीस !” 

तुझ्या या धिटाई बद्दल कौतुक वाटते तुझे मित्रा ! “ स्मित करीत रंगलाल उद्गारले, “मी ऐकलंय् की तुमच्या घराण्यांत हा वारसा चालत आलाय्. वरद बाबूच्या आजारांत पाहिलंय मी तें ! पण आमच्या डॉक्टरीच्या पलीकडचे आहे हे शास्त्र !” 


किशोरचा ताप ठीक चोवीसाव्या दिवशीं उतरला.

कृष्णदास बाबूंनी जीवनला घट्ट मिठी मारली. त्यांनी रंगलालना पत्र धाडले, “बरोब्बर चोवीसावे दिवशीं ताप उतरला. कृपाकरून पुढील सूचना द्याव्या. पेशंटला स्वत: तपासावे असे वाटत असल्यास कधीं येणार ते अवश्य कळवावे.” 

रंगलाल आले नाहीत मात्र त्यांनी पुढची औषधें तयार करून पाठवून दिली पथ्य-पाण्यासह आणि पुढे लिहिले, “जगत् बंधूंच्या चिरंजीवांना माझे आशीर्वाद जरूर सांगा .” 


अत्यानंदाने डॉक्टर रंगलालना अभिवादन करायला चार मैल चालत गेले जीवन  ! आणि रंगलालांनीही त्याचे पाठीवर थाप मारत मनापासून आशीर्वाद दिले होते जीवनला. एका तिरसट नि अहंकारी माणसाकडून मिळवलेली ती थाप खरंच अविश्वसनीय होती, कारण रंगलाल सर्वसामान्य शिष्ठाचार वगैरे पाळण्याची कधीच तसदी घेत नसत. त्यांचा देवधर्मावरही अजिबात विश्वास नव्हता. मयूराक्षी नदीतून वाहत जाणारे प्रेत ते ओढून बाहेर काढीत आणि मग त्याचे विच्छेदन करीत. जमीनींत पुरलेल्या लहान मुलाचे मृत शरीर उकरून काढायलाही त्यांना संकोच वाटत नसे. शिवाय एखादे मूल त्याचे आईचे कुशींत मेलेले पाहूनही त्यांना त्याची ढिम्म नसे ! ते कुणाच्याच समोर नतमस्तक व्हायला तयार नसत, असा विलक्षण होता त्यांचा पिंड

या प्रदेशांत तंत्र-मंत्रांचा विलक्षण प्रभाव होता लोकांत आणि डॉक्टर रंगलाल हे एक विस्मयकारक व्यक्तिमत्व तांत्रिक, जादूटोणा करणारे असल्याची काही लोकांची पक्की धारणा होती. अखेर ही तांत्रिक मंडळी आपले खरे रूप लपवित  समाजाचे सर्व-सामान्य नियम आणि आचार धाब्यावर बसवतात, अनेक स्त्रियांशी व्यभिचार करण्यास मागेपुढे पाहात नाहीत. कोणी म्हणत की रंगलाल पूर्ण नास्तिक आहे


तूं मेडिकलला जायला हवे होतेस मित्रा, तुझ्यासाठी तो सर्वोत्तम पर्याय होता. एक उत्तम डॉक्टर होण्याचे तुझ्यांत सर्व गुण आहेत. मला तुमचे उपचार पध्दतीवर कांहीच म्हणायचे नाही, पण अडचण अशी आहे की आपण भारतीयांप्रमाणेच ही पध्दत काळाबरोबर चालली नाही. शिवाय आयुर्वेदाच्या भरभराटीचे काळांत रसायन-शास्त्र, केमिस्ट्री, पुरेसे पुढे जाऊ शकले नाही. त्या वेळी कित्येक गोष्टी माहीतही नव्हत्या. कितीतरी परकीय जाति-जमातीचे लोक या देशांत आले आणि इथल्या लोकांत मिसळून गेले. मात्र त्यांनी अनेक प्रकारच्या रोगांचे विषाणू नकळत बरोबर आणले होते. इथल्या हवामानात त्यांचे मूळ स्वरूप बदलत गेले.

या शिवाय, आयुर्वेद ज्याला अगांतुक व्याधी म्हणून मोकळा होतो तिथे यूरोप मधील वैज्ञानिक मायक्रोस्कोप सारख्या उपकरणांनी त्या रोगांचे विष्लेषण करीत त्यांचेवर मात करण्याचा प्रयत्न करतात, केवळ लक्षणांच्या कितीतरी पुढे जात !” 


डॉक्टर रंगलालांचे आधुनिक पध्दतींवरील विवेचन जीवन अतिशय एकाग्रपणे ऐकत राहिला. मात्र ते ऐकत असतांना त्याला आपले गुरू आणि वडील जगत् बंधू महाशयांची सतत आठवण येत होती. ते शिकवीत असतांना ईश्वर, नशीब, प्रारब्ध यांचा वरचेवर उल्लेख असे. आजाराबद्दल काथ्याकूट चालू असतानाच तिथे काहीतरी अधिक असे, भाव-भावनांचे उत्कट दिग्दर्शन ! रंगलाल या बाबतींत सरळसोट होते. त्यांचे शब्द  नेमकेपणाने आपली मते सांगणारे असत. त्यांचे मतें ईश्वर आणि नशीबाला काहीच स्थान नव्हते.


तुला माहीत आहे, एखादा माणूस मरतो नि सर्व काही संपून जाते. त्याच्या आत्म्याच्या प्रवासाचे गूढ शोधण्याच्या भानगडीत आम्ही पडत नाही. खरंतर शुध्द वेडेपणा आहे तो ! तुझा जर असा समज असेल की आत्मा एखाद्या उडणाऱ्या पक्षासारखा असतो, तर त्याची शिकार करायला शिकारीही टपून बसलेला असणारच की ! म्हणून पुनर्जन्माला आमचा रामराम ! “ 

आपल्या या बोलण्यावर ते स्वत:शी मोठ्ठ्याने खदखदून हंसत


त्या दिवशी डॉक्टर रंगलाल विशेष खुशींत होते. जीवनने त्याचा फायदा घेत आपले म्हणणे पुढे दामटले. “माझेवर कृपा करीत मला डॉक्टरी शिकवाल ? “ 

तूं, तुला डॉक्टर व्हायचंय ?” तीक्ष्ण नजर रोखीत त्यांनी विचारले . ती खरोखर भेदक नजर होती त्यांची नि चेहऱ्यावर विविध भाव - आश्चर्य, कौतुक आणि उत्कंठा यांची सरमिसळ. “म्हणजे कविराजीला काही फारसे चांगले दिवस नाहीत आतां ?” 


शिकलेल्या लोकांत कविराजीला फारशी प्रतिष्ठा राहिलेली नाही हे खरंय् . मात्र सर्वसामान्य लोक त्यांना अजूनही मानतात.” 


मग ॲलोपॅथीक डॉक्टर होण्याचा प्रयत्न कशासाठी ?” 


मला पाश्चात्य मेडिसीन शिकायची नेहमीच इच्छा होती, पण -“ त्याने सुस्कारा सोडला


तुझे वडील तर सहज खर्च करू शकले असते, मग का नाही शिकलास ?” 


नशीबावर भंरंवसा होता आमचा ; माझे नशीब नव्हते तेव्हडे ! या व्यतिरिक्त दुसरे काही कारण नाही. खरंतर बालपणापासून हा विचार माझ्या मनांत घर करून होता.” 


तुझ्या वडिलांचा विरोध होता ?” 


नव्हे नव्हे, चूक सर्वस्वी माझी होती.” 


त्याने सगळी कथा ऐकवली, मंजरी प्रकरण काळजीपूर्वक टाळत. भप्पी बोसशीं झालेल्या मारामारी बद्दलही सांगितले.

मी गांवाकडे परत आलो. वडील म्हणाले, “बास झाले आतां. मला वाटतं तुला दूर पाठवून मी माझी शांती बिघडू देऊ नये. तुला पारंपरिक शास्त्रच शिकले पाहिजे. “” 


एऱ्हवीं स्मितहास्य देखील करणारे रंगलाल अचानक हंसण्याच्या गडगडांत लोटपोट होऊन गेले. हे अगदीच अनपेक्षित होते. एखादा निर्जन डोंगर फुटावा नि त्यांतून खळाळणारा निर्झर वाहू लागावा तसे दृष्य होते ते. रंगलालना असे हंसतांना कोणीच आधी पाहिले नव्हते. खरोखर लोटपोट झाले होते ते हंसतांना


अच्छा, तो तूं आहेस तर , ज्याने त्या तरूणाचे नाकाड फोडले होते,” हसण्याचा लोट कमी झाल्यावर ते उद्गारले. “तो माझा पेशंट आहे, माहिताय् तुला ? त्याच्या सासऱ्याने आणले होते उपचारासाठी माझ्याकडे. अति मद्यसेवनामुळे त्याच्या लिव्हरची वाट लागली होती. एक उमदा नि सुंदर पुरूष, फक्त पिचलेलं नाक सोडले तर !” 


रंगलाल आतां गंभीर झाले जरासे. “मला वाटलं ते पिचलेलं नाक सिफिलिस मुळे आहे. एका श्रीमंत बापाचा मुलगा, त्यातून अमर्याद पिण्याची खोड नि बाहेरख्यालीपणा - मग दुसरा काय निष्कर्ष काढणार म्हणा. मी विचारले त्याला खोदूनखोदून. आधी आढेवेढे घेतले नि मग सांगितलं सगळं. आपण सर्व किती विचित्रपणे वागतो नाही ?” 

रंगलाल उत्तेजित झाले होते. हातांतला सिगार खाली ठेवत पुढे बोलू लागले, “ते सगळे लज्जेपोटी खूप काही लपवतात नि पुढची पीढी बर्बाद होते, आपला आजार लपवून इलाज केल्यामुळे. अर्थात् त्यांना स्वत:ला त्रास होतो ते वेगळेच. त्यांना हे कळत नाही की कुठलाच माणूस परमेश्वर नसतो, रक्त-मांसाचाच बनलेला असतो प्रत्येकजण. त्याला तहानभूक असते, स्वार्थ असतो नि विकार पण !” 


उत्तेजना वाढून ते उभे राहिले. “तुला ऐकायचंय तो डुक्कर काय म्हणाला ते ? ‘मी माझ्या पत्नीशिवाय इतर कुठल्याही बाईशी शरीरसंबंध केलेला नाही’. माझ्यासाठी ते अति होत होतं. मी त्याला लगावून देणार होतो, ‘ तुला बदडून काढीन मीयू रास्कल !’ 


काही येझारा घातल्यावर ते पुन्हा आसनस्थ झाले. सिगारचे दोनतीन झुरके मारून ते हलकेच हसले. “तर मग तुझ्या भारी मुक्क्याचा प्रसाद तू त्याच्या नाकाडावर ठेवलास तर ! तू खरंच लई भारी आहेस. मात्र मला हे सांगणे भाग आहे की ती कृती एका मित्राची होती, त्याच्या दडलेल्या आजाराला जाहीर करण्याची.” 


रंगलालांनी आतां जीवनचे प्रस्तावावर विचार सुरू केला. “होय, शिकवीन मी तुला. माझ्यापासून जितके घेण्यासारखे असेल तेवढे शीक. तुला काही अडचण नाही ना ?” 


रंगलाल भप्पी बद्दल बोलत असतांना जीवन जरी टक लावून त्यांचेकडे पाहात असला तरी त्याचे मन भूतकाळ धुंडाळत होते, भप्पी नि मंजरीचा मागोवा घेत. आणि जेव्हा रंगलाल आपले बोलणे संपवीत त्याला शिष्य म्हणून स्वीकारायला तयार झाले त्यावेळीं तो इतकेच उद्गारला, ‘तर भप्पीचे लिव्हर निकामी झालंय्, कसा आहे तो आतां ?’ 


रंगलालना आश्चर्य वाटले. “तुला त्याचे बद्दल वाईट वाटतंय् ? काय झालंय् तुला ?” 

जीवन चक्क लाजला

तुम्ही वैष्णव आहांत ना ?” 

होय, आहोंत”. 

आतां सगळं स्पष्ट होतंय. भप्पी आताच्या घडीला ठीक आहे. पण तो पुन्हा आजारी पडणार. तो माणूस काही जास्त जगणार नाही. मी सांगतो कसे ते. तुला अशी मायाळू आई माहीत आहे, जी आपल्या आजारी मुलाला चोरून नको ते खायला देते ? भप्पीची बायको तसली आहे. डॉक्टरने मना केले असूनही ती त्याला दारू पुरवते, कारण भप्पी एका थेंबासाठी सुध्दा वेडापिसा होतो. कृपा करून थोडीशीच घे असे ती त्याला विनवत राहते. आश्चर्य म्हणजे त्याचे दारूसाठी तिने चक्क आपले दागिनेही विकून टाकलेत. विश्वास बसेल तुझा ? पुराणांत वर्णन केलेल्या पतिव्रता स्त्रियांना आठवून पहा. अरे, प्रत्यक्ष यमदूतांशी दोन हात करायला धजावल्या होत्या त्या, पतीचे मृत्यूपासून रक्षण करण्यासाठी. मात्र या बाईने तर चक्क मृत्यूलाच निमंत्रण देऊन टाकलंय् ! तरीही तिचे नवऱ्यावरचे प्रेम तसुभरही कमी ठरत नाही. खरोखर विस्मयकारक आहे हे

काळ आणि वेळ आले तसे निघूनही गेले. जीवनला त्याचे कांहीच वाटेनासे झाले होते. डॉक्टरांच्या बोलण्याने तो भानावर आला. ‘त्या घाणेरड्या श्रीमंत-पुत्रांविषयीं नको बोलूयात आतां. ते नखशिखांत सडलेले आहेत. त्यांचे जीवनच व्यर्थ आहे

आतां माझे ऐक. तुला मेडिकल सायन्स खरंच शिकायचंय् ? तुला ते कठीण जाईल असे मला नाही वाटत. तूं या आधीही पेशंट्सवर उपचार करतो आहेस, रोगनिदान करणे तुला येतेच आहे. मी भाषांतर केलेली इंग्रजी पुस्तके वापरू शकतोस. शिवाय मीही तुला शिकवायला नि मदत करायला हाताशी आहेच. “


या संवादामुळे जीवनची द्विधा मनस्थिती बदलली होती, तो लगेच कार्यप्रवण होण्यासाठी आतुर झाला


मागे भप्पी बोस आणि मंजरीने मिळून त्याच्या ज्वलंत महत्वाकांक्षेवर थंडगार पाणी ओतले होते. पण ती आग अजून विझली नव्हती, तिने पुन्हा पेट घेतला. मंजरी आणि भप्पी विषयीं सर्व विचार त्याने झटकून टाकले, इतकेच नव्हे तर अतर बहू देखील मागे पडली. केवळ रंगलाल आणि त्यांचे मेडिकलवरील ग्रंथ त्याने आपल्या पुढ्यांत ठेवले, उज्वल भविष्याचे स्वप्न उराशी बाळगीत


क्रमश



This page is powered by Blogger. Isn't yours?