Wednesday, September 16, 2020

 

संघ स्वयंसेवक ते आरोग्यप्रमुख

 संघ-स्वयंसेवक ते आरोग्यप्रमुख


 एका धडपड्या तरूणाची गाथा आहे ही. मात्र तो तरूण बराचसा उतावळा आणि इंपल्सिव्ह निफजला. बालपणापासून सत्य, सचोटी आणि चारित्र्याचे बाळकडू मिळाले आणि संघशाखेने ते रुजवले, म्हणून आपल्या आयुष्यांत बऱ्यापैकी प्रगती करू शकला. या तरूणाला आपण केवळतोम्हणून संबोधणार आहोत


 तो जेमतेम तिशी सुरू होत असतांना आपले घरदार, गरोदर पत्नी आणि मुलगी, व्यवसाय वगैरे मागे ठेवून एका मोठ्या शहरीं, पुण्यांत, दाखल झाला. केवळ एकच कारण होते, संघाने अत्यल्प दरांत सतरा वर्षें चालवलेला दवाखाना नि त्यांना हवा असलेला एक पूर्ण वेळ काम करू शकणारा डॉक्टर. त्याला ही माहिती त्याचेच एका मित्राने पोस्टकार्ड लिहून कळवली होती. त्याने क्षणाचाही विलंब करता हे धाडस करायचे ठरवले आणि आठव्या दिवशी वर सांगितल्या प्रमाणे पुण्यपत्तनीं डेरेदाखल झाला. मात्र या पुढचा प्रवास साहाजिकच बराच खडतर ठरला

मूळ अडचण होती निवासाची. पुण्यांत पागडी, डिपॉझिट वगैरे भरण्याची ऐपत नव्हती नि मानधनही तुटपुंजेच ! म्हणून थेट चिंचवडला एक खोली हजार रुपये ॲडव्हान्स नि शंभर रुपये महिना या दराने हस्तगत केली. अदमासें चार महिन्यांनी त्याची पत्नी दोन्ही मुलांना घेऊन आली निसंसारसुरू झाला

सकाळी सातला बाहेर पडून गुरूवार पेठ, तिथून बारा वाजता निघून परत चिंचवड, दुपारी चारला पुन्हा गुरूवार पेठ नि संध्याकाळी सातला चिंचवड

चिंचवडलाच संघाचे माध्यमातून संध्याकाळी साडेसात ते साडेनऊरूग्णसेवा मंदिरया नांवाचे मोफत चिकित्सालय सुरू केले आणि त्याचा लाभ स्टेशन जवळच्या झोपडपट्टी-वासियांनी बऱ्यापैकी घेतला. हा सर्व खटाटोप जवळजवळ सहा महिने केला आणि त्याचे लक्षांत आले की कुठेच धडपणे न्याय देतां येत नाहीये


दरम्यान, त्याचे दोन धाकटे बंधू पुण्यांत नोकरीचे निमित्ताने आले होते. एका दुपारीं चारचे सुमारास तिघेही डेक्कनवरच्या एका रेस्ट्रांत चहा पीत असताना समोर पडलेलादैनिक प्रभातचा शिळा अंक दिसला नि धाकट्याला त्यांत एक जाहिरात दिसली. पुणे कॉर्पोरेशन मधे डॉक्टर भरती व्हायची होती नि अर्ज करण्याचा तो शेवटचा दिवस होता. तिघांनीही एकमेकांकडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहिले नि काही बोलता तडक रिक्शा थांबवली. कॉर्पोरेशन ऑफिसला पावणेपांचला तिघे पोचले, चार आण्याचा फॉर्म घेतला नि उभ्याउभ्या भरला. वर ठळक अक्षरांत लिहिलेइंटरव्ह्यूसबोलावले तर सोबत प्रमाणपत्रे वगैरे हजर केली जातील


पुणे महापालिकेला त्यावेळेस डॉक्टरांची बरीच चणचण असावी, कारण पंधरा दिवसांत मुलाखतीस बोलावले गेले ! आमच्या त्या तरूणाची मुलाखत झक्कास झाली नि पुढच्या पंधरा दिवसांतच नेमणुकीचे पत्र मिळाले वैद्यकीय अधिकारी म्हणून. पगारही चांगला घसघशीत मिळणार होता, महिना रुपये पांचशे नव्व्यांणौ ! (आधीच्या दुप्पट !) 


राष्ट्रकार्यवगैरे भाव तात्पुरता बासनांत ठेवून तो म्युन्सिपाल्टींत रूजूं झाला ! म्युन्सिपाल्टीत त्याने चक्क बावीस वर्षें आपली सेवा आरोग्य खात्याला दिली. आधी म्हटल्याप्रमाणे आमचा हा गडी बेधडक काम करण्यांत कुशल होता. मिळेल ती संधी घेत किंवा मागून घेत तो नवनवीन आव्हानें स्वीकारत गेला आणि अखेर पुणे शहराच्या मेडिकल युनिट्स चाआरोग्य प्रमुख’ (मुख्य वैद्यकीय अधिकारी) म्हणून सन्मानाने सेवानिवृत्त झाला


मात्र या दरम्यान अनेक रंजक प्रसंग घडले, त्याला खूप काही शिकायला मिळाले, असंख्य मित्र नि चाहते मिळत गेले आणि ज्या ट्रेड-यूनियन्सशी अनेक अधिकारी टरकून असतात त्या तिन्ही यूनियन्सनी एकत्रितपणे त्याचा सत्कार करून फेअरवेल दिला. मुख्य म्हणजे अप्पासाहेब भोसले नि प्रभाकर गोखले या सारख्या मातब्बर नेत्यांनी त्याचीखरा कामगार मित्रअशी वाहवा केली


खरंतर रूग्णसेवा करतांना त्याला असंख्य पेशंट्स नि त्यांच्या नातेवाईकांच्या दुवा, आशीर्वाद नि शुभेच्छा मिळाल्या आणि त्याच त्याचे आत्तांचे शान्त, सौख्यमय, निवान्त  आणि परिपूर्ण आयुष्य जगण्याची ताकद आहे अशी त्याची दृढनिष्ठा आहे


नौकरींत असतांना अनेकानेक इलेक्टेड मेंबर्सशी संपर्क आला  आणि त्यांतील बहुतांश मंडळी त्याचे जणू मित्र झाली. क्वचित् एखादा आग्रही नगरसेवक कुठल्या तरी अयोग्य कामासाठी दबाब आणत असे, पण आमचा गडी कधींच बधला नाही ! कधी कधी मनोरंजक किस्से घडत नि त्या आठवणींनी तो अजूनही खळखळून हंसतो


खरंतर त्याचे नांवावर अनेकफर्स्ट्सआहेत. नायडू रूग्णालयांत मुख्य अधिकारी असतांना त्याने तिथल्या सर्व स्टाफला बरोबर घेऊनसर्व्ह्ंट्स क्वार्टर्समधे साफसफाई अभियान चालवले, हातांत झाडू घेऊन पत्नी मुलांसमवेत त्याभंगी कॉलनीचीसफाई केली

एके काळी नायडू सांसर्गिक रोगांचे रूग्णालयांत काम करायला अनेक डॉक्टर्सना भय वाटे. अतिशय भयाण नि डिप्रेसिंग माहौल असे आधी. साप विंचू तर आपलेच साम्राज्य समजत. शिवाय मृत्युदर मोठा असे. कॉलरा, गॅस्ट्रो, देवी, कांजिण्या, टी.बी., हायड्रोफोबिया सारखे रोगी केव्हाही दाखल होत नि दगावत. त्यामुळे दिवसादेखील तिकडे फिरकणे भयावह असे

मात्र डॉक्टर डोंगरे यांच्यासारखा शिस्तप्रिय नि कडक माणसाचा विश्वास आमच्या गड्याने सहज संपादन केला आणि त्यांचे मार्गदर्शनाखाली अनेक सुधारणा घडवून आणल्या. तिथे खास वाचनालय सुरू केले नि स्वखर्चाने त्यावेळचे चार मराठी नि एक इंग्रजी दैनिक सुरू केले. पुरूष स्टाफ साठी त्यांचेच मदतीने सुंदर व्हॉलिबॉल ग्राऊंड तयार केले नि बॉल आणि नेट् विकत घेऊन दिले. इतर मोठ्या खाजगी हॉस्पिटल्स सारखे छोटेखानी इन्टेन्सिव केअर युनिट उभारले, उपलब्ध स्टाफ नि उपकरणांच्या साहाय्याने. ते वेळी नायडू रूग्णालया सारख्या दुर्लक्षित आणि ओंगळ रूग्क्णालयाला जणू नवसंजीवनी दिली. त्याचा दरारा नि धाक विलक्षण असे सर्व सेवकांमधे, मात्र तितक्याच प्रेमाने आणि कळवळ्याने तो त्यांच्या अडीअडचणींची दखल घेऊन मदतीसाठी तत्पर असे

याच रूग्णालयांत अहोरात्र काम करत असतांना त्याने दोन अटेम्प्ट नापास होऊन तिसऱ्या वेळी पोस्ट-ग्रॅज्यएट डिप्लोमा मिळवला नि त्या जोरावर क्लिनिकल पॅथॉलॉजिस्ट ही प्रथम दर्जाची (क्लास-वन्) पोस्ट पटकावली. तिथेही त्याने सलग अठरा वर्षेराज्यकेले. पुढे शेवटली तीन वर्षें आरोग्यप्रमुख ही अतिरिक्त जबाबदारी यशस्वीरित्या उचलली

त्यांतील काही रंजक प्रसंग पुढील भागांत


क्रमश:..... 


नायडू रूग्णालयातील यशस्वी  कारकीर्दीनंतर आमच्या गड्याला बढती मिळाली नि तो चक्कक्लास-वन् हपिसर’  झाला , आरोग्य खात्यातील पहिल्या पांचांत ! ते वेळीं आरोग्यप्रमुख, दोन सहायक आरोग्याधिकारी, रेडियॉलॉजिस्ट नि क्लिनिकल पॅथॉलॉजिस्ट इतकेच प्रथम श्रेणी अधिकारी होते त्या खात्यांत. (नंतर बेशुमार वाढ झाली म्हणा ! त्या वरून आठवले, इन्दौरच्या मेडिकल कॉलेजांत त्याचे वेळीं केवळ एकएमेरिटस प्रोफेसरहोते डॉक्टर मुखर्जी. आतां दीड डझन आहेत म्हणाला तो परवां !) असो


तर, या बढती बरोबरच जबाबदाऱ्या ही वाढल्या त्याच्या. महापालिकेच्यामेडिकल बोर्डचा चेअरमन म्हणून त्याला अनेक वेळा कठोर तर कधी नाजुक निर्णय घ्यावे लागले. सर्व नवीन सेवकांची मेडिकल तपासणी आणि फिटनेस दाखला, त्यांत पी.एम्.टी. चे ड्रायव्हर्स, कंडक्टर, अधिकारी नि बिगारी सेवकांचाही भरणा असे. त्याचप्रमाणे डिसप्यूटेड रजा प्रकरणे, मेडिकली अपात्र ठरविण्याच्या केसेस, पेन्शन कॉम्युटेशन्स वगैरे बरीच प्रशासकीय कामेंही असत. शिवाय लॅबोरेटरी कामांतली सुसुत्रता, गुणवत्ता नि क्वालिटी कंट्रोल अशी बहुविध जबाबदारी त्याचेवर असे आणि या सर्व कामांवर आमच्या पठ्ठ्याने अल्पावधींत घट्ट पकड घेतली


रूग्णसेवा, नि तीही मोफत, हा स्थायीभाव असल्याने त्याचा तोच प्रथम चॉईस असे आणि कदाचित म्हणूनच तो आध्यात्मिक बैठक असलेल्या एका सेवा संघटनेंत आपसूक ओढला गेला.. आणि त्या सेवा संघटनेशी पुढील चाळीस वर्षे तो संलग्न राहिला. अंगच्या कल्पक योजनांमुळे त्याने अनेकानेक वैद्यकीय प्रकल्प हातीं घेऊन यशस्वीरित्या पार पाडले. त्याने प्रत्यक्ष सहभाग घेत इतर अनेकांना बरोबर घेत डझनावर सेवाकार्यें हाती घेतली नि राबविली


खेडोपाडीं जाऊन मोफत औषधोपचार, वैद्यकीय शिबिरें, आरोग्य-शिक्षण, खेड्यांतली सार्वजनिक स्वच्छता, शोष-खड्डे, सुलभ शौचालयें, हेल्थ सर्व्हे, खरूज जंत नेत्रदोष यांवर विशेष शिबिरे तसेच कृषी मेळावे इत्यादींचे संघटनेच्यावतीने आयोजन केले

शहरांतील काही झोपडपट्यांत वैद्यकीय शिबिरे घेतली, कित्येक रक्तदान शिबिरें रेडक्रॉसचे सहकार्याने भरवली. लोकांना रक्तदानासाठी प्रवृत्त करत असतानाच त्याचे पत्नीने पंचवीस वेळा नि त्याने स्वत: पस्तीस वेळा रक्तदान केले ! (आधी केले नि मग सांगितले !) 

रूग्णांशी मोकळा संवाद साधण्यांत त्याचा हातखंडा होता आणि म्हणूनच इतर काही सोबत्यांना बरोबर घेऊन तो ससून हॉस्पिटल मधे नातेवाईकांनी भेटण्याचे वेळेत म्हणजे संध्याकाळी चार ते सहा या वेळेंत दर रविवारी चुकतां जात असे अनेक वर्षें. ज्या कुणा रूग्णाला कुणीच भेटायला येत नसे अशांशी तो मनमोकळ्या गप्पा मारून त्याचे दु: कमी करण्याचा प्रयत्न करी. कुणाला पत्र लिहून पाठवावेसे वाटले तर जवळ मुद्दाम नेलेल्या पोस्टकार्ड वर पत्र लिहून त्याचे गांवीं पाठवी. कधी कधी रक्ताची सोय होत नाही म्हणून लांबलेल्या शस्त्रक्रियेच्या रूग्णांसाठी रक्तदात्याची सोय करीत असे, स्वत: तयार केलेल्या रक्तदान करू शकणाऱ्या रक्तगट यादीप्रमाणे

आधी म्हटल्याप्रमाणे काही अतिशय धाडसी आणिहटकेकामे करण्यास्तव तो कायम तत्पर असे. मला आठवतेंय, त्याने पुण्यांतीलटॉपविशेषज्ञ डॉक्टर्सना प्रत्यक्ष भेटून पुण्यातल्याच ताराचंद हॉस्पिटल परिसरांत मेडिकलच्या पांचव्या वर्षातील नि नुकतेच मेडिकल डिग्री घेतलेल्या शिकाऊ डॉक्टर्स साठी सलग चाळीस दिवस दररोज तीन व्याख्याने असा कार्यक्रम हाती घेतला आणि तो अत्यंत यशस्वी ठरला. त्या अभ्यासक्रमाचे नांव होतेप्रॅक्टिकल मेडिसीन ॲंड वेदान्त” ! दोन व्याख्याने वैद्यक शास्त्रांतील नि एक वेदान्तावर ! या कार्यक्रमाची मूळ संकल्पना होती अकोल्याचे कार्डिऑलॉजिस्ट आणि आमच्या पठ्ठ्याचे ज्येष्ठ स्नेही डॉक्टर .रा.भागवत यांची आणि मुख्य मार्गदर्शक होते पुण्याचे प्रख्यात कार्डियाक सर्जन डॉक्टर अशोक कानेटकर. पुण्यांतीलटॉप  ब्रासत्या दोघांनी उपलब्ध करून दिला, आमचा पठ्ठे बापूराव प्रत्येक तज्ञ डॉक्टरला प्रत्यक्ष भेटला नि योजना सांगितली, संघटनेच्या इतर सर्वांनीही भरपूर कष्ट घेतले आणि हा कार्यक्रम भूतो भविष्यतिअसा बहारदार संपन्न झाला. कार्यक्रमाच्या सांगतेनंतर दुसऱ्याच दिवशी पठ्ठ्या पुट्टपर्थीला समग्ररिपोर्टलिहून घेऊन गेला आणि स्वामींनीही गेल्यागेल्या त्याचे कडून तो स्वीकारला. धन्य धन्य झाला आमचा गडी ! (वेदान्तावरील व्याख्याने महाराष्ट्र संघटनेतील ज्येष्ठ सदस्यांनी घेतली. वेदान्तातील मूल तत्वें सोप्या भाषेंत सांगितली गेली आणि मुळात अध्यात्म नि विज्ञान कसे एकत्साने नांदते, मानवी मूल्यांची जोपासना तसेचएथिक्सवर विशेष भर दिला गेला आणि भगवत् गीता नि स्वामींचे त्यांवरील स्पष्टीकरण असे विषय ओघाने आलेच. ) असो

आमच्या गड्याचे कुटुंब ही कधीच मागे राहिले नाही. मुलांसमवेत तीही बहुतेक सेवा कार्यांमधे हिरिरीने बरोबर राहात असे त्याच्या, मग ते खेडोपाडीं फिरणे असो, वृध्दाश्रम अंधशाळा वगैरे संस्थांना भेटी असोत कीं गरजूंसाठीफूड पॅकेट्सकरणे असो; तिची साथ त्याला कायम राहिली. खेड्यांत नुसतेच बरोबर येतां ती तिथल्या मुलांसाठी नियमित संस्कार वर्ग चालवी, महिलांना आरोग्य तसेच दैनंदिन व्यवहारात उपयुक्त माहिती निटिप्सद्यायची


खरंतर या कथानकातील नायक नौकरीपेक्षां या उचापतींत जास्त रमला. तरीही तो आरोग्यप्रमुखाच्या खुर्चीवर कसा बसला ते पुढे पाहूं


क्रमश


कदाचित् याउचापतींमुळेच त्याला दरवेळीं नवनवीन ऊर्जा मिळत असे, नवे नवे प्रयोग करावेसे वाटत आणि त्याचे आराघ्य दैवत असलेल्या श्री सत्यसाईंचे कृपेची त्याला खात्री वाटे. खरंतर नोकरी सांभाळून साधारण दर दोन महिन्यांनी पुट्टपर्थीला जाणे तितकेसे सोपे नव्हते, पण हा गडी बेधडक निघून जाई. (इकडची कामेंस्वामींवरसोपवीत ! ) 

तरीही, आपलीइथलीम्हणजे म्युन्सिपाल्टींतल्या नोकरीतही त्याने कुचराई केली नाही. त्याने जेव्हा क्लिनिकल पॅथॉलॉजिस्ट म्हणून पदभार स्वीकारला तेव्हा महापालिकेच्या एकूण तीन प्रयोगशाळा होत्या, गाडीखान्यांतली (डॉ. कोटणीस आरोग्य केंद्र, शुक्रवार पेठ) प्रमुख आणि कमला नेहरू नि नायडू रूग्णालयांत काही मोजक्या तपासण्या करणाऱ्यासाईड-लॅब्ज’. त्याचे अखत्यारींत त्याने त्या दोन्हीसाईड लॅब्जचे रूपांतर रूग्णालयासाठी अत्यावश्यक त्या सर्व तपासण्या करण्याची तरतूद करून केली. इतकेच नव्हे तर तेव्हा महापालिकेने चालवलेल्या बारा मॅटर्निटी होम्स मधेही साईड लॅब्ज सुरू केल्या. त्या वेळचा त्याचा अनुभव विलक्षण होता. म्हणजे पहिल्या दोन लॅब्जसाठी त्याने व्यवस्थित आंखणी करून एक लॅब टेक्निशियन आणि आवश्यक ती यंत्रसामुग्री आणि केमिकल्सची जुळवाजुळव केली मात्र नंतर हा प्रयोग यशस्वी होतोय असे पाहून उर्वरित नऊ दहा लॅब्ज हां हां म्हणता कार्यरत झाल्या दोन अडीच वर्षांचे कालावधीत

साधारण त्या सुमारास रेडीमेडकिट्सचा जमाना आला नि तपासण्या बऱ्यापैकी झटपठ होऊं लागल्या. असो


मात्र तो कालखंड होताएच् आय व्हीकिंवाएड्सने आपले पाय घट्ट रोंवण्याचा. त्यावेळेसनिदानासाठीकेवळएलायझाही एकुलती एक तपासणी उपलब्ध होती आणि भारतांत त्यावेळीं एकमेव अशी एन् आय व्ही (नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी) ही पुण्यांतली प्रयोगशाळा त्या तपासण्या करीत असे. तथापि त्या वेळच्या महापालिका आयुक्त आणि आरोग्यप्रमुखांच्या पुढाकाराने ही तपासणी गाडीखन्यांत केंद्राने पाठविलेल्या अधिकाऱ्याचे देखरेखीखाली सुरू झाली. दरम्यान आमचा गडी नि इतर काही टेक्निशियन्स ना प्रशिक्षण देऊन ही तपासणी नियमित सुरू झाली. हा कालखंड गाडीखाना लॅबसाठी क्रांतीकारक ठरला हे नि:संशय


मात्र त्याच सुमारास त्याला एका लोकोत्तर आणि  विलक्षण अशा सेवा कार्यांत सहभाग घेण्याची संधी चालून आली. त्या वेळेपर्यंत  तो गाडीखाना प्रमुख म्हणून काम करू लागला होता आणि त्याची इतर विभागांवरही देखरेख असे. त्यांतील एका विभागांतसेक्स वर्कर्सची नियमित तपासणी आणि मोफत औषधोपचार होई. त्याच विभागांत एक अतिशय तडफदार, कामसू, मनमिळाऊ प्रौढा मेडिकल सोशल वर्कर म्हणून कार्यरत होत्या, विजयाताई लवाटे ! आपल्या कर्तबगारीवर आणि उत्कृष्ठ कार्यामुळे त्यांना नंतर खूप नांवलौकिक मिळाला आणि सेवानिवृत्तीनंतर त्यांनी सुरू केलेलीमानव्यही संस्था आजही त्यांचे कार्य नेटाने पुढे चालवते आहे. त्यांनी सेक्सवर्कर्सच्या इच्छेनुरूप त्यांच्या मुलांना त्या ओंगळ रेडलाईट एरियातून बाहेर काढून शहराबाहेर एक वसतिगृह सुरू केले. सर्वप्रथम हडपसरच्या फ्लाईंग क्लबच्या मागे टिनशेडची दोन खोल्यांची उभारणी केली आणि मुलांच्या जेवणाखाण्यासाठी एका परित्यक्तेची नेमणूक केली स्वखर्चाने ! नंतर मुलामुलींची संख्या वाढली म्हणून सर्व लवाजमा भुकुमला स्थलांतरित झाला, थोड्या मोठ्या जागेत नि आतां चार सेविकांसमवेत. हळूहळू या कार्याला मदतीचा ओघ सुरू झाला आणि लवकरच त्याला लोकमान्यता नि राजमान्यता प्राप्त झाली. मात्र होऊं नये ते घडले आणि राजकीय पक्षांनी याचा स्वार्थापायीं उपयोग सुरू केला. निष्कारण तंटा करून सर्व मुलांना स्टाफसकट येरवड्याला स्थलांतरित करून संस्था काबीज करण्याचा उद्योग सुरू केला. या सर्व घडामोडींनी विजयाताई खचून गेल्या होत्या, पण लवकरचस्फिंक्सप्रमाणे त्यांनी पुन्हा भरारी घेतली आणि आज तीच मानव्य नामक संस्था एच् आय व्ही पीडित बालकांचे आश्रयस्थान झाली आहे. विजयाताईंच्या कष्टांना आमचे गड्याने डिस्क्रीटली हरसंभव साहाय्य केले


कालांतराने त्याला बढतीची संधी चालून आली आणि तो महापालिकेच्या वैद्यकीय युनिट्स चा तो विभागप्रमुख झाला. त्या दरम्यान महापालिकेनेएड्सची रोकथाम करण्यासाठी दमदार पाउलें उचलली. मुळांत दोन स्तरावर भरघोस निर्णय झाले, त्यांत हॉस्पिटल-दवाखान्यांतून बाहेर पडणाऱ्याबायोमेडिकल-वेस्टची परिणामकारक विल्हेवाट आणि सज्जड हेल्थ एज्युकेशन ड्राईव्ह यांचा विशेष उल्लेख करायला हवा. त्या रोगाचा संसर्ग कसा होतो नि त्या पासून बचाव कसा होतो याचे परिणामकारक लोकशिक्षण प्रभावीपणे राबविले गेले. मुळांत दोनच मुद्दयांवर भर होता नि तो म्हणजे हा रोग केवळ स्वैर, असुरक्षित संभोगामुळे किंवा बाधित व्यक्तींचे रक्त किंवा इतर आंतरिक स्त्रावांमुळे उद्भवतो, इतर कोणत्याही शारीरिक संपर्कामुळे नव्हे याची शास्त्रशुध्द माहिती देणे आणि अनाठायी भयाचे निर्मूलन करणे यांवर होता. असो


शहरातील रस्ते सफाईसाठी त्याने दिलेले सफाई सेवकांची जादा रात्रपाळीची सूचना युनियनचे मान्यतेने ताबडतोब अंमलांत येऊ लागली आणि शहर पहांटेसुध्दा बऱ्यापैकी स्वच्छ दिसू लागले


मेडिकल युनिट्स चा आरोग्यप्रमुख या नात्याने महापालिकेच्या सर्व डॉक्टर्स साठी (तेव्हा दीडशे डॉक्टर्स होते) दर महिन्यालाक्लीनिकल मीटींग्जसुरू केल्या, ज्यामुळे सेवेतील डॉक्टर्सना अद्यावत वैद्यकीय माहिती मिळत असे. त्याचप्रमाणे विविध रूग्लालयांना मानद सेवा देणाऱ्या तज्ज्ञ डॉक्टर्सना त्याने प्रथमच एका व्यासपीठावर आणून त्यांच्याही समस्यांचे निराकरण करीत त्यांनी केलेल्या प्रॅक्टिकल सूचना अंमलांत आणण्याचा प्रयत्न केला


तथापि, हे सर्व करत असतांना त्याचेतील संघ-स्वयंसेवक हमेशा दृग्गोचर होई. वेळेचे बंधन, पूर्वतयारी नि पाठपुरावा करण्याची शिस्त त्याने कधींच नजरअंदाज केली नाही

असा हा संघस्वयंसेवक कम वैद्यकीय आरोग्यप्रमुख पुढच्यामिशनसाठी आठ वर्षें आधीच स्वेच्छानिवृत्ती घेऊन सन्मानाने बाहेर पडला. त्या पुढील त्याचे मार्गक्रमणाचा इतिहास पुन्हा कधीतरी ! ! 


This page is powered by Blogger. Isn't yours?