Tuesday, April 14, 2026

 

मंझिल से कहीं रास्ते होते हैं !

 मंझिल से कहीं, रास्ते होते हैं


आज एक व्हीडिओ क्लिप पाहात असताना ती बनवणाऱ्या व्यक्कीचे हे शब्द खूप आवडले आणि वाटलं यावर काहीतरी भाष्य करावे

खरोखर, आपण एखादी सहल, गंतव्य वगैरे ठरवून प्रवासाला निघतो. गंतव्यावर पोहोचतांच वाट संपते मात्र त्या प्रवासाची लज्जत कायम घर करून राहते मनात. ज्ञानेश्वर महाराजांनी फार छान ओंवी लिहिली आहे या संदर्भात. ते म्हणतात, ‘एखादे गाणे संपल्यावर त्याचे सूर आसमंतांत घुमत राहतातकिंवा गदिमांच्या एका कवितेंत रात्रीची महफिल संपल्यावर कोपऱ्यात उभी असलेली सतार, लोड-गाद्या नि जाजमांवरच्या सुरकुत्या, पानतंबाखूची उघडी पेटी वगैरे खूप काही बयॉं करून जातात. शिवाजीराव भोसले म्हणतात, ‘माणसांना पोहोचण्या आधी परत फिरायची घाई असते. वापरात नसलेली पायवाट त्यांना वारंवार बोलवत असूनही ती वाट वहिवाट करता येत नाही त्यांना’ ! 

अगदी तसंचमंझिल से कहीं रास्ते होते हैं’ ! खरंतर मंझिल येण्याआधी ती वाट कधी सरूंच नये असे वाटते. ‘वाटसरूहा शब्द कसा तयार झाला असेल ? सरणाऱ्या वाटेवर चालत राहणारा तोवाटसरूअसेल काय ? बोला, बोला काहीतरी

रहाळकर

१४ एप्रिल २०२६ 


This page is powered by Blogger. Isn't yours?