Friday, April 30, 2021

 

सिल्व्हर लायनिंग !

 सिल्व्हर लायनींग ! “ 


सकाळी नेहमीप्रमाणे गॅलरीत चहाचा लुत्फ घेत निवान्त बसलो असताना आकाशात गोळा झालेले काही गडद ढग नजरेस पडले नि किंचित उदास वाटले. मात्र पाहता पाहतां जसजसा सूर्योदय होऊ लागला तसतसे त्याच ढगांना चांदेरी सोनेरी किनार आली आणि चक्क केशरी गुलाबी छटा देखील

हरखून जावे असे ते दृष्य पाहून मन सुखावलें आणि ते तात्पुरते आलेले औदासिन्य कुठल्या कुठे गडप झाले. नि मग सुरू झाली विलक्षण विचार मालिका


प्रपंचातही असेच काळे पांढरे मेघ येतात नि जातात. वास्तविक स्वामी म्हणत तसे लाईफ इटसेल्फ इज लाईक पासिंग क्लाऊड्स ! आकाशाला त्यांचे सुखदु: नाही का देणेघेणे नाही


आपल्याला असे निरभ्र, मनमोकळे कसे राहतां येईल आकाशासारखे ? खरेंतर आपले मूळ स्वरूप असते निरागसआपण लहान बालक असतांनापण नंतर तहान नि भूक समजूं लागते, आवड-निवड पिंगा घालू लागते नि सुरू होतात सर्वप्रथम जिभेचे चोचले ! आपण चटकनरसनेंद्रियाचे गुलामबनतो. मग दृष्टी आपले खेळ दाखवू लागते, माझे नि परके असा भेद करीत. त्यातून निर्माण होते ईर्षा ! त्याचेजवळ आहे ते माझ्याकडे का नाही असा सवाल करताना दबा धरून बसलेला दंभ नि अहंकार कसा उफाळून येतो पहा. हवे ते मिळाले नाही म्हणजेच इच्छापूर्ती झाली नाही तर क्रोध येणारच आणि क्रोधाच्या अतिरेकाने भ्रम व्हायला वेळ का लागतो ? आणि मग गीतेंत म्हटले तसेप्रणश्यती’ - सर्वनाश ! ! 


नव्हे, मला असे चित्र अजिबात रंगवायचे नव्हते. स्वच्छ सुंदर आकाशांत मनोहारी रंगबिरंगी ढग पाहतांना मला खरंतर संसाराच्या कॅनव्हासवर स्पष्ट दिसत असलेले चित्र पाहायचे होते, त्या संसाररूपी रथावरून थेट आकाश-अवकाशापर्यंत मजल मारायची होती, नव्हे गवसणी घालायची होतीया संसारचक्राचे रहस्य समजून घ्यायचे होते



खरंच, संसार चक्राचे अगदी तसेच नाही काय ? मधेच लहानमोठी संकटें, भीती, हुरहुर या रूपात गडद ढग गोळा होतातएऱ्हवीं व्यवस्थित चालत असलेला हा संसाररथ मधेच लडखडतो, खुडबुडतो आणि जरासे वंगण घालताच पुन्हा कुरकुर करता धावायला लागतो

आतां या चालत्या रथात वंगण कोण पुरवतो ? परमेश्वर ? सदगुरू ? नशीब किंवा प्राक्तन ? नव्हे नव्हे, केवळ आपली इच्छाशक्ती ! नाही पटत ? सांगतोच तर मग, पटलं तर घ्या नाहीतर सोडून द्या परमेश्वरावर

मला सांगा, कुठे असतो हो हापरमेश्वर’ ? मंदिरांत, मसजिदींत, गुरुद्वारात आणि चर्चमध्ये पाहिलाय का तुम्ही ? मला तर शोधूनही सांपडला नाही आजवर. अर्थात मीही फारसे लक्षच दिलेले नाही त्या विषयावर हेही खरे आहे म्हणा ! मात्र एका सत्पुरूषाचे आश्वासक शब्द आठवले, ‘गॉड इज विदीन यू - अराऊंड यू - आऊटसाईड यू - ॲबोव्ह यू - बिलो यू - जस्ट बाय युअर साईड टू ss ! इन फॅक्ट यूS आर गॉड युवरसेल्फ !’ मात्र आपण त्याची दखल घेत नाही


त्याला खरोखर पाहायचेच असेल, अनुभववायचेच असेल तर बाहेर इतरत्र शोधतां आपल्यांतच तर तो दडून बसला नाही ना हे शोधावे. अरे, ‘तुझे आहे तुजपाशीं परी तू जागा चुकलासीअसे होऊं नये

मी म्हणतो की परमेश्वर एकटा असा कधी नव्हताच मुळांत, ‘एकोSहम बहुस्याम्ही थिअरी मला पटत नाही. कारण त्याचे सोबत किंवा खरे तर अंगभूत अशीत्याचीचमाया होती, जीअनेक होण्याची इच्छाशक्ती होती. त्याच दुर्दम्य इच्थाशक्तीचे बळावरपरमेश्वरानेब्रह्मांडाची रचना केली, त्याला आंजारले गोंजारले नि भातुकली सारखे विस्कटून टाकण्याचीप्रेरणादेखील तीच


खूप खूप विषयांतर झाले आहे याची मला नम्र जाणीव आहे, पण मुळांत विषय असा नव्हताच ! मेघांप्रमाणे विचार आले नि गेले, काही शिंतोडे या कागदावर उडवीत ! वाटले तर घ्या, नाहीतर पुसून टाका ! (माऊलींचा एक सुंदर दृष्टांत आहे - स्वातीचा थेंब शिंपल्यांत पडला तर त्याचा मोती होतो नि सर्पमुखांत पडला तर कालकूट ! ‘ ) 


मला इतकेच म्हणायचे होते की सोनेरी रूपेरी केशरी गुलाबी रंग पहांटेच्या अवकाळी मेघांत पाहावे आणि ते विरणारच याचेही भान असू द्यावे, या फालतू बडबडीसारखे ! ! 


थांबतो आता


प्रभु रहाळकर

२९ एप्रिल २०२१ 


Tuesday, April 27, 2021

 

पुणेरी अस्सल !

 पुणेरी खाद्यपदार्थ


आज आमच्या आदरणीय काकांनी मला माहीत असलेल्या पुण्यांत मिळणाऱ्याचमचमीतखादाडी केन्द्रांची यादी मागवली. वास्तविक ते माझ्याहून दोन वर्षांनी वडील आहेत, पण चवीने खाण्यासाठी वडीलकी नि धाकुटेपण गौण आहे असे माझे निश्चयात्मक मत आहे


चमचमीत पदार्थ म्हटले की भेळ- पाणीपुरी नि मिसळपाव ही नांवें जरी आधीं पुढे आली तरी चोखंदळपणा महत्वाचा आहेच ना ! वाटेल तिथे मिळणारी भेळ किंवा मिसळ मी तरी नक्कीच टाळीन. (या निमित्ताने इंदोर नजिकच्या एबी रोडवरील एका धाब्यावर लावलेले भलेमोठे होर्डिंग आठवले. खूप मोठे कोंबड्याचे रंगीत पोस्टर होते ते नि खाली लिहिले होते - See Me Anywhere, but Eat Me Here ! ) 


भेळ खायचे काही नियम असतात. मुख्य म्हणजे ती पुणेरी भेळ हवी. मुंबईची पापडी नि बारीक शेव घातलेला भेळपुडा मला (आम्हाला) मिळमिळीत वाटतो. पुणेरी कशी झणझणीत, पुणेरी टॉन्ट्स सारखी, काळ वेळ नसलेली. नुकत्याच चिरलेल्या कांद्याचा दर्प नाकात शिरतांच पाउलें तिकडे वळली पाहिजेत. विशेष करून टिळकरोड वरील सारसबागेकडे जाणाऱ्या रस्त्यावरचीकल्पना भेळकिंवा ग्राहक पेठेमागचीस्वाद भेळ’. शिवाजीनगर रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्र. एक नजिक केवळ सायंकाळ पाच ते सात या वेळेत बसणारा गलेलठ्ठ भैय्या ! खूप प्रेमाने नि विलक्षण सफाईने झटपट करून द्यायचा आपल्याला हवी तशी भेळ. संभाजी पार्क नि सारसबागेत मिळणाऱ्या भेळी त्या मानाने दुय्यम, ‘लिंबुटिंबूंसाठी’ ! भेळ हा काही बशी नि चमच्याने खाण्याचा प्रकार नाही ; तिथे  द्रोण आणि जाड कागदाचा आपण चमच्यासारखा वापर करायचा असतो (याला चमचेगिरी म्हणता येणार नाही ) . शिवाय भेळीचा द्रोण हातीं आल्यावर पहिला घास घेतांच पुन्हाजरा हिरवी चटणी किंवा मीठी चटणी’  मागितल्याशिवाय कार्यक्रमाची नांदी होतच नाही

जशी भेळ तशीच पाणीपुरी. भेळ खाऊ तिथेच पाणीपुरी घेण्याचा प्रघात नाही. नवशिक्यांनी यांतले मर्म समजून घेतले पाहिजे. भेळवाल्या समोरच इतरत्र कुठे जास्त चांगली भेळ-पाणीपुरी मिळते ते आपसांत मोठ्याने बोलत असतानाच त्याचापुणेरी पाणउताराकसा करता येईल ती काळजी घेणे अत्यावश्यक ठरते


मिसळपाव ची मला फारशी गोडी नाही, कारण मागे एकदा पहिलाच दणका जीवघेण्या ठसक्याने दिला होता. तथापि, नुमवि नजिकच्या अण्णांची पावमिसळ खूप प्रसिध्द होती म्हणतात. आता काटाकिर्र वगैरे नांवे वाचतो पण फिरकत मात्र नाही


वडापाव चे पेंव गेल्या काही वर्षांत फुटले असले तरी मूळचाप्रभाचा बटाटेवडा (.चिं.केळकर रस्ता) प्रथम पुण्यांत आल्यावर खाल्ला नि नंतर स्वीटहोम मधला जंबो वडा नि खोबऱ्याची चटणी. मात्र बालगंधर्व, भरत नाट्य किंवा टिळक स्मारक आणि कोथरूडच्या यशवंतराव नाट्यमंदिरांत नाटकाचे मध्यंतरात मिळणारे वडे हातोहात संपत


इडली खावी ती बाजीराव रस्त्यावरील वाडेश्वरची ! सत्तर बहात्तर सालीं आताचे जागेसमोरील गोखले मंडपवाल्याच्या बाहेर हातगाडीवर सुरू केलेला व्यवसाय आता चांगला जम बसवून आहे आणि इडलीचटणीची चवही अजून तीच, ताजी गरमागरम !  

वैशालीचा डोसा प्रसिध्द आहे म्हणतात, पण खरा दाक्षिणात्य मेदुवडा नि डोसा केवळ रास्तापेठेतच

उच्चभ्रू मंडळींना कर्नाटकी खादाडी करायची असेल तर बाणेरच्या डीमार्ट नजिकच्यावे डाऊन साऊथला भेट द्यावी


अस्सल पुणेरी किंवा खरेतर पेशवाई मेजवानी साठीश्रेयसजेवढे प्रसिध्द असेल तितकेच खजिनामहाल नजिक सदाशिव पेठेतलेफडके डायनिंगची मी शिफारस करीन - शिवाय तिथेमोफतअंडरग्पाऊंड पार्किंगची सोय आहे. (अजूनही लोकांनामोफतकाहीही मिळवण्याचा अट्टाहास का असतो नकळे ! ) असो


सामिष मंडळींसाठी एम् जी रोडनजिक दोराबजीची बिर्याणी टिळक रोडवरील एस् पीज् च्या तोंडांत मारते, तर बांगडा करी नि खेकड्यांसाठीकोंकण एक्स्प्रेसगाठले पाहिजे (कर्वे पुतळ्यापासून डावीकडे मुरकल्यावर पहिलाच मोठा चौक ! ) 

बाकी मस्तपैकी सॅंडविचेसचा समाचार घेण्यासाठी .गां. रस्त्यावरचेमार्झ--रिनआम्ही सत्तर सालापासून तुडवीत आले आहोंत . समोरचबुधानी वेफर्सचा कारखाना नि विकान पण आहे. तिकडे गेलाच तर कयानीची ब्रेड नि श्रूबेरी बिस्किटे घ्यायला विसरू नये


अगदी साधेसुधे चांगले भोजन बाहेर घ्यायचा कधी कधी प्रसंग येतो, तर बरेच वेळा मुद्दाम जावेसे वाटते आणि म्हणून पेरूगेट समोरचे पहिल्या मजल्यावरचेन्यू पूना बोर्डिंगआम्ही गेली पन्नास वर्षे बरेच वेळा सर केले आहे. आधी कुणा पाटणकरांचे ते असल्याने आम्हीपाट्याकडेजेवूंया असे आधीच ठरवून जातो - अगदी कालपरवां पर्यंतभात भाजी आमटी पोळी कोशिंबीर चटणी तसेच दह्याची उत्कृष्ट वाटी असे साधेसुधे चविष्ट जेवण तृप्त करते. (आम्ही प्रथम गेलो तेव्हा थाळीची किंमत होती रूपये चार फक्त. आतां तेच नि तेव्हढेच घ्यायला दीडशे मोजावे लागतात. मात्र तिथली  केवळ गुरूवारीच  मिळणारीडाळिंबी उसळ भाजीखरोखर लाजबाब असते, होय अजूनही ! ) 


माझा पहिला सेविंग बॅंक अकाऊंट टिळक रोडवरचा. तिथेच पेन्शन जमा होऊ लागली. सबब दर महिन्याला टिळकरोड वर जाणे गरजेचे तर होतेच, पण आम्हालाबी सदाशिव पेठेचे अप्रूप कायम राहिले. त्यामुळे गोपाळ गायन च्याखालच्या अंगाला असलेले बादशाही उपाहारगृह आमचा रेंडेव्ह्यू पॉइंटअसे. तेथील मस्कापाव विथ शुगर निफक्कडचहा घेतल्याशिवाय मला पेन्शन आदा केली जात नसे

एस् पी कालेज समोरचे लघाटे बंधूंचे उपहारगृह (नांव विसरलों ! ) एकाबाजून झकास पोहे नि मस्त चहा देई तर दुसऱ्या भागांत बॉईल्ड एग् सॅंडविचेस मिळत, एकदम झक्कास ! (ऑल इंडिया सायकल असोसिएशन सारखी संस्था तिथूनच कार्यान्वित होती


पावभाजीचा जमाना आमचे समक्ष सुरू झाला . मुंबई पावभाजी असे आधी नाव असले तरीजयश्रीची पावभाजी ओढून ओढून नेणारी


कधीमधी गुजराती जेवणाची लहर येई नि मग जंगली महाराज रोडवरच्यासपना आम्ही भोजन करीत असूं. मारवाडी पध्दतीच्या खानावळी अलीकडच्या. श्रेयस सारखेच पहिली वाढ मोअर दॅन पुरेशी असली तरी तळणीची व्यंजने दोन तीन वेळा तरी घेतली जात. पंजाबी इष्टाईल प्राठे  तोडण्यासाठी एफ सी रोडच्या वरच्या अंगाचे पराठा हाऊस एकदोन वेळा उध्दरले गेले, तर अस्सल कोल्हापुरीसाठी गुळवणी महाराज पथावरचे कोल्लापुरी


वरील सर्व जागांचा तपशील वाचून आमचा चॉइस खूपचमीडिओकरवाटणे साहाजिक आहे. खरेतर आम्ही अस्सल मध्यमवर्गीय आहोत नि होतो देखील. नव्या पीढीचे खातर कधीमधी चायनीज रूम, पिझ्झा हट, मॅकडोनल्ड वगैरे ठिकाणी अजिबात जात नाही असे नाही, पण फर्स्ट प्रिफरन्स असतो साधेसुधे मराठी जेवण नि इतर पदार्थ. आणि म्हणूनच काकांनी जेव्हा खादाडी केंद्रांची आमची फर्माईश विचारली तेव्हा लिहू का नको या संभ्रमांत होतो. त्यातला प्लस पॉइंट म्हणजे गतायुष्याची जरा उजळणी झाली आणि थोडक्यांतही कसे समाधानी होतो आम्ही चौघेही ही जाणीव अधिक प्रकर्षांने झाली


तस्मात्, धन्यवाद आदरणीय काका


रहाळकर

२६ एप्रिल २०२१ 


This page is powered by Blogger. Isn't yours?