Sunday, February 25, 2024

 

चॉकलेटच्या चांद्या !

 चॉकलेटच्या चांद्या

आमच्या लहानपणी चॉकलेट्सना गुंडाळलेल्या रंगीबेरंगी चांद्या गोळा करून त्या वही-पुस्तकांत जपून ठेवायचे प्रत्येकाला जणू वेड असे. खूप वेगवेगळ्या सुंदर कलाकुसरींनी विनटलेल्या त्या चांद्या असत. साहाजिकच चाकलेट्स ही खूप चघळली जात. अर्थातस्टॅंडर्डअसे आजसारखेच केवळकॅडबरीज’  असे तेव्हाही


तसे पाहिले तर बालपणी अनेक वस्तू जमवायचा छंद असे बहुतेकांना. त्यांत विलक्षण वैविध्यही असे. अगदी खडूच्या तुकड्यांपासून अनेक रंगांचे दगडगोटे, भंवरे, पिना, पोष्टाची तिकिटे वगैरे कित्येक वस्तू लपवून ठेवल्या जात. त्यांची रवानगी नंतर साहाजिकच घरातल्या माळ्यावर किंवा अडगळीच्या खोलीत होई आणि नंतर कित्येक वर्षांनी त्या पुन्हा पाहिल्यावर प्रत्येकाच्या आठवणी ताज्या होत. तेव्हाही माझ्यासारखे अनेकजण त्या आठवणींत रमून जात आणि काहीजण त्यांवर चक्क कथा किंवा सिनेमा काढीत

खरंतर हे चलचित्र किंवा शेणिमा प्रत्येकजण कायम अनुभवत असतो पण काही दिग्दर्शक त्यांचे अक्षरश: सोनें करतात


खूप वर्षांपूर्वी ऐकल्या वाचलेल्या रबिन्द्रनाथ टॅगोरांच्या काही छोट्याशा कलाकृती खूप अंतर्मुख करीत. बचपन की वह यादें कभी कभी बहोत बेचैन किया करती थींआजही जुन्या जुन्या आठवणी सैरभैर करतात हे वास्तव कोणीच नाकारणार नाहीत. चॉकलेटच्या रॅपर्स प्रमाणे आपण त्यांना मन नावाच्या पुस्तकात किंवा खरेतर वहींत जपून ठेवत आलेले असतो. मग अचानक एखादे नातवंड आपल्या हातावर चिमणीच्या दातांनी तोडलेला पेरू ठेवते आणि त्याचिमणीच्या दातांचीचव आठवणींच्या रसात घोळवत आपण भूतकालांत रममाण होऊन जातो……….! ! 

रहाळकर

२५ फरवरी २०२५  



Tuesday, February 20, 2024

 

मांगिलाल आणि मुंगेरीलाल !

 मांगिलाल आणि मुंगेरीलाल

ही दोन नावें वाचताना कोणी आठवलेत काय तुम्हाला ? हिंदी असली तरी जरा विचार करून पहा, आपल्यातील प्रत्येकाचीच आडनावे आहेत तीं ! मला सांगा, बालपणापासून आजपर्यंत आपण प्रत्येकजण कुणा ना कुणाकडे काहीना काहीतरी मागतच आले आहोत की नाही, मग ते आईवडील असोत, सगेसोयरे, मित्रमैत्रिणी, किंवा अगदी देवीदेवता का असेनात ! म्हणून म्हटले आपण अजूनहीमांगिलालआहोत, होतो नि असणार आहोत. कितीही म्हटले की माझे आता काहीच मागणे नाही तरी देवाजवळ का होईना आपले काही ना काहीमागणेसतत चालूच असते की ! असे पहा, प्रत्येक स्तुतीपर स्तोत्रांत आधी ईश्वराची स्तुती करून शेवटीदेहि मे देहि मेअशी याचना असतेच ना ? फलश्रुति म्हणजे तरी नक्की काय हो ? विचारार्थ निवेदन केले हे

मुंगेरीलालहा शब्द अगदी राजकारण्यांतही कधीच रूढ झालेला तुम्हालाही जाणवेल. अनेक दशकांपूर्वीं दूरदर्शनवर एक झकास व्यंगमालिकामुंगेरीलाल के हसीन सपनेतुम्हाला आठवत असतील कदाचित पण जस्ट थिंक आपल्यापैकी कित्येकजण त्या रोलमध्ये चपखल बसत होतो की नाही, अगदी शेखचिल्ली नसलो तरी थोडेबहुत मुंगेरीलाल होतो किंवा आहोंत ना

रहाळकर

२० फेब्रुवारी २०२४ 


Sunday, February 18, 2024

 

प्रायोरिटीज !

 प्रायॉरिटीज !

आज अचानक पुतण्याने एक प्रश्न विचारून मला गडबडवून टाकले. त्याने विचारले की काका, आतां या वयात तुमच्या प्रायॉरिटीज काय आहेत ? तुम्ही आयुष्याबद्दल समाधानी आहात काय किंवा काही करायचे राहून गेले असे तुम्हाला वाटते काय ? मी संभ्रमात पडलो कारण मी आता नुसता उतारवयात नसून चक्क पंच्यैंशी कडे झुकत चाललोंय आणि आता मला पर्याय असे कितीसे असणार. तरी पण प्रसंगावधान ठेवत मी म्हटले की अर्थातच आजपर्यंतच्या माझ्या आयुष्याबद्दल मी पूर्ण समाधानी आहे आणि करायचे राहून गेलेल्या कितीतरी गोष्टी आहेत. साहाजिकच त्याचा प्रश्न की तर मग तुमच्या प्रायोरिटीज काय यावर जरासा विचार करणे आवश्यक वाटले मला. खरंतर आता या वयांत कोणावरही बोजा होऊन राहणे मलाच काय कुणालाच आवडणार नाही. स्वत: स्वत:ची दिनचर्या करत राहता आली पाहिजे एवढीच सीमित आकांक्षा आहे आता. 

 

राहून गेलेल्या गोष्टीं ऐवजी मला काय करता आले याचा लेखाजोखा घेताना जाणवले की ‘सेवे’च्या अनेकानेक संधी आपसूक माझ्याकडे येत गेल्या नि मी बऱ्यापैकी त्यांचा परामर्ष घेऊ शकलो. सुचले तितके, जमले तेव्हढे करू शकलो माझ्या तुटपुंज्या साधनसामग्रीतून. नंतर कधीतरी असेही वाटले की त्याच सामुग्रीत अधिक काही करणे शक्य झाले असते बहुधा. 

तथापि ‘राहून गेलेल्या’ संधींबद्दल बोलताना कुणी सहज विचारेल की सर्वात मुख्य बाब तुला जमली काय आणि ती म्हणजे तू तुझा स्वत:चा आणि पर्यायाने ईश्वराचा ‘शोध’ घेऊ शकलास काय ? यावरचे माझे प्रत्त्युत्तर ऐकून तुम्ही नक्कीच माझा हेवा कराल, कारण मी म्हणणार आहे की स्वत:चा पूर्ण थांगपत्ता मला लागला नसला तरी मी परमेश्वराला नक्कीचशोधू शकलो, पाहू शकलो, अनुभवू शकलो. कारण तो मला अणुरेणूंत, शत्रुमित्रांत, आसमंतांत सर्वदूर सदासर्वदा सतत दिसत राहिला. ओळखायला ऐंशी पंच्चांशी वर्षें गेली तरी तो माझ्याजवळ सतत असतच होता आणि आहेही ! ! 

मला वाटतं पुतण्याच्या त्या प्रश्नांना मी समर्पक उत्तर देऊ शकलो. तुम्हाला काय वाटले ! 

रहाळकर

१८ फेब्रुवारी २०२४


Wednesday, February 14, 2024

 

संस्थानिक !

 संस्थानिक

इन्दौर उज्जैनला जन्मलेले आणि लहानाचे मोठे झालेले आम्ही जेव्हा कधी मुंबई पुण्यास येत असूं तेव्हा इकडचे नातेवाईक आमचीसंस्थानिकम्हणून हेटाळणी किंवा अवहेलना करीत. कारण सोपे होते, आमचे सावकाश हिंदी मिश्रित बोलणे नि संथ गतींत होणारे सर्वच व्यवहार ! बोलण्यांत चटपटितपणा नसायचा , वागणूकस्मार्टनसायची (इकडच्या तुलनेंत ! ) आणि कपड्यांचा वापर देखील साधासुधा असे. साहाजिकच इकडच्या मानाने कधीकधी गबाळपण नजरेत भरणारे ! वास्तविक सर्वच बाबतींत आमचा तिकडचा प्रदेश अधिक सुजलाम सुफलाम असाच होता. खाण्यापिण्याची सुबत्ता किंवा रेलचेल, उत्तम शिक्षण व्यवस्था, सांस्कृतिक वारसा आणि एकंदर खुशहाली  निश्चितपणे उजवी होती


मात्र या नैसर्गिक सुबत्तेबरोबरच एक प्रकारचा खानदानीपणा देखील नजरेत भरावा इतका दृढ झाला नि त्याचे कारण पेशव्यांसमवेत उत्तर भारत काबीज करत असतांना तिकडच्या मातींत रूजून अधिक वैभवशाली झालेली अनेक संस्थाने. मोठमोठाली अशी बडोदा, धार, इन्दौर, ग्वाल्हेर अशी तर रतलाम, झाबुवा, देवास, बडवानी, अलिराजपूर सारखी छोटी छोटी संस्थानें. या सर्व लहानमोठ्या राज्यांतले बहुतांश नरेश किंवा राजे आपापल्या प्रजेंत विलक्षण आदरणीय आणि पूजनीय मानले जात. अर्थात त्यांत काही मॅडकॅप किंवा लांच्छनास्पद निफजले हेही वास्तव असले तरी बरेचसे उत्तम प्रशासक होते हे निर्विवाद. इंग्लंडच्या राजघराण्या प्रमाणेच वर नमूद केलेल्या काही संस्थानिकांवर प्रजेने अतोनात प्रेम केले


पुण्यश्लोक अहल्याबाई होळकर, थोरले माधवराव सिंघिया, सयाजीराव गायकवाड इत्यादि मात्तब्बरांनी आपापली राज्ये खरोखर उर्जितावस्थेत आणली हे वास्तव विसरतां येणार नाही. देशात इंग्रजी हुकुमत असूनही त्यांच्या तोडीस तोड अशा अनेक सोयी सुविधा आम जनतेसाठी खुल्या करण्यात आल्या. त्यांत विविध शैक्षणिक संस्था, उत्तम वैद्यकीय सेवा, साहित्य संगीत आणि इतर कित्येक कलांना उत्तेजन आणि संवर्धन अशी अगणित लोकोपयोगी कार्यें यासंस्थानिकांनीहातीं घेऊन तडीसही नेली हे मी जाणून आहे

स्वातंत्र्यप्राप्ती नंतर कित्येक वर्षेप्रीव्ही पर्सया नावाने प्रत्येक संस्थानाला रोखमुआइजाआदा केला जात असे आणि त्या त्या संस्थानाच्या मालकीच्या वाहनांवर लाल नि सोनेरी नंबर- प्लेट्स आणि बोनेटवर संस्खानचा ध्वज मिरवण्यास परवानगी असे. इंदिरा गांधींनी ही सर्व प्रथा मोडीत काढली. असो


आज पुन्हा एकदासंस्थानिकया शब्दावर मीनोस्टॅल्जिकझालो नि मनात येईल तसे लिहीत सुटलो. श्रोत्यांनी या आगळिकीबद्दल क्षमा केली पाहिजे !

रहाळकर

१४ फेब्रुवारी २०२४ 



This page is powered by Blogger. Isn't yours?