Thursday, August 31, 2023

 

शुचौ देशे - उत्तरार्ध !

 शुचौ देशे - उत्तरार्ध 


मागील भागांत चित्त एकाग्र करीत सद्गुरूस्मरण करावे असे म्हटले होते. वास्तविक साधकानेसोsहंभावांतमग्न राहात आसनस्थ असावे असे माऊलींना सांगायचे आहे. नाथ संप्रदायानुसार असलेला योगमार्गाचा संपूर्ण आराखडा माऊली आपल्या विवेचनात मांडतात. त्यात सर्वप्रथम येतेआसनसिद्धी’, जिचे वर्णन आपण मागील भागांत पाहिले. ‘षट्चक्रेंआणि त्यांना पादाक्रान्त करीत ब्रह्मरंध्रापर्यंत पोहोचणारीकुंडलिनी शक्तीयांचे विवरण श्रीज्ञानेश्वर महाराज सहाव्या अध्यायात विस्तृतपणे करतात. खरेतर भगवद्गीतेतील मूळ श्लोकांत याचा फारसा उल्लेख नाही. तथापि माउलींची लोकोत्तर प्रतिभा या अध्यायांत अतिशय उत्कटपणे मुखरित झालेली आढळते

नाथ संप्रदायवेद उपनिषदांनी प्रकट केलेला आणि श्रीमत् आदिशंकरांनी नि शंकराचार्यांनी प्रतिपादलेल्याअद्वैतसिद्धान्ताला अनुसरून योगमार्गाने त्याचा अनुभव घेण्यास उद्युक्त करतो

आदिनाथांपासून चालत आलेल्या धर्मतत्वांचा अनुभव मिळवण्याची विशिष्ट पद्धत अनुसरणारा हा पंथ होय. या संप्रदायांत गुरूपदिष्ट अशा प्रामुख्याने राजयोगाने कुंडलिनी जागृत करून आत्मानुभव घ्यायचा असतो. आदिनाथ, मच्छिन्द्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ, निवृत्तिनाथ आणि ज्ञानदेव अशी नाथ परंपरा ज्ञानेश्वरांनी सांगितली आहे


तथापि, वरील प्रमाणे योगसाधनेद्वारा ब्रह्मप्राप्ती करून घेण्यासाठी देखील साधकात तेवढीयोग्यताअसावी लागतेच ना ! अर्जुनाप्रमाणे सर्वसामान्यांनाही पडणारा हा प्रश्न आहे, मात्र भगवंत अत्यंत दयाळूपणे तो सोडवण्याचा मार्ग सांगतात. वास्तविक, ते म्हणतात, योग्यता किंवा पात्रता मिळवणे फारसे अवघड नाही जरी ती बाजारात मिळत नसली किंवा तिच्या खाणी नसल्या तरी

खरंतर जो थोडासाही विरक्त झाला नि देहधर्माच्या बाबतींत अधिक नियमित झाला तर तें अशक्य नाही. मुळातविरक्तम्हणजे  आत्मस्वरूपाविषयीं विशेष प्रेम असलेला आणि बाह्य विषयांबाबत निर्विकार, अलिप्त असलेला, बाह्य विषयांचा वीट आलेला, विषयांत मन रमत नाही तो विरक्त समजावा

साहाजिकच सर्व नीतिनियम बासनांत बांधून मनमानी करणारा, जोरसनेचाचा अंकिला आणि निद्रेला आपले सर्वस्व देणारा सर्वस्वी अपात्र ठरतो. या सर्वांच्या उलट जो तहान-भुकेला दुराग्रहाने दाबून निद्रेला थाराच देत नाही असा देखील अयोग्य ठरतो. म्हणजेच विषयांचे अतिसेवन आणि पूर्ण निरोधनही नसावे ! योग्य तेवढा क्रियाकलाप आणि परिमित आहार, मोजके बोलणे, पुरेशी झोप, जागणे झाले तरी तेही परिमित असावे जेणेकरुन शरीर निरोगी राहील. सर्व इंद्रियांना पुरेसे खाद्य मिळाल्यास मनाचा संतोष नि समाधान वृद्घिंगत होईल आणि अंतरंग सुखावह होईल

ज्याप्रमाणे उद्यमीपणाच्या निमित्ताने भाग्योदय होऊन सर्वप्रकारचे वैभव प्राप्त होते, तद्वत् जेव्हा एखादी संयमी व्यक्ती योगाभ्यासास प्रवृत्त होते तेव्हा साहाजिकच त्याला आत्मानुभावाचा प्रत्यय येतो आणिनिर्वातींच्या दीपाप्रमाणे तेवणारास्वस्थचित्त असतो

भगवंत अर्जुनाला आवर्जून सांगतात की योगाभ्यासासारखे अन्य उत्तम साधन नाही. स्थिर आसन वगैरे अभ्यास केवळ इंद्रियांना वळण लावण्यासाठी असतो, त्यांना मर्यादेत ठेवण्यासाठी ! मात्र अशाप्रकारें इंद्रियनिग्रह झाल्यावर चित्त चैतन्यास भेटू पाहते आणि सर्व विषयसुखांना पाठमोरे करून आपणच आपणांस पाहू लागते आणिमीच तें तत्वअशी ओळख पटून संपूर्ण सुखाची प्राप्ती होते.

अशा वेळी शरीरावर दु:खाचे डोंगर कोसळले तरी त्याची चित्तवृत्ती दडपून जात नाही, शरीरावरील वज्राघात किंवा अग्नीचेही भान तो स्व-सुखात रमलेला असल्याने त्याला राहात नाही ; एऱ्हवीं प्रपंचात गुंतवून ठेवणाऱ्या इच्छाआकांक्षा ब्रह्मसुखाची गोडी लागल्याने सोडून जातात आणि तो पूर्ण संतोषींचा धनी होऊन राहतो

अशा विरक्त पुरूषाची बुद्धी सर्व संकल्प-विकल्पांपासून , म्हणजेच वासना, तर्कवितर्क यांपासून अलिप्त राहून केवळ आत्मसुखात रममाण होऊन राहते


अर्जुनाला केलेला हा उपदेश सर्वसामान्यांना कितपत पचनी पडेल याची कुणकुण लागून भगवंत दुसरा एक मार्ग सांगतात आणि तो म्हणजे एकदा केलेला निश्चय जीवाभावाने जपावा, तो ढळूं देऊ नये. चित्त कितीही भरकटले तरी त्याला आवरण्याच्या फंदात पडतां त्याला भरकटू द्यावे. स्वैर भटकल्यानंतर तेच दमूनभागून परत येईल आणि अंतर्मनात स्थिरावण्याची त्याला संवय लागेल. असे स्थिरावलेले चित्त आपसूकच स्व-स्वरूपाशी येईल आणि दोहोंतील द्वैत संपून ते अद्वैतात विलीन होईल.   स्वस्वरूपाशी तद्रूप झालेले चित्त विश्व-ऐक्याच्या तेजाने उजळून निघेल

श्रीज्ञानदेव या ठिकाणी एक विलक्षण दृष्टांत देतात - ‘आपल्याच पाठीवर आपल्या पायांनी चालण्यासारखेतुला हे अशक्य वाटत असेल तर अर्जुना, अजून एक उपाय सांगतो. आणि तो म्हणजे सर्व प्राणिमात्रांत सर्व विश्वात असलेले ऐक्य पाहणे नि अनुभवणे ! वस्त्रात एकच एक धागा असतो किंवा अलंकारांत केवळ सोने असते तसा सर्वांठायींमीच मीभरून आहे हा दृठ विश्वास आणि तशी समदृष्टी प्राप्त झाली तर या जगात दुसरे काहीच प्राप्त करणे राहात नाही ! ! 

रहाळकर

सप्टेंबर २०२३



This page is powered by Blogger. Isn't yours?