Saturday, November 26, 2022

 

दुर्मीळ ग्रंथ !

 दुर्मीळ ग्रंथ !

काल अचानक आळंदी संस्थान कडून फोन आला की तुमच्या इंग्रजी ज्ञानेश्वरीच्या सर्व प्रती संपल्या आहेत म्हणून आता तुमचेबिलसादर करा

मी चक्क उडालोच ! म्हणजे आता माझे (ही) पुस्तकदुर्मीळकॅटेगरीत गेले तर ! ! मागे काही वर्षांपूर्वी मला अचानक गुरूदेव रानडे यांचेबद्दल कोणीतरी काही पृच्छा केली होती. मी त्यांचेबद्दल अगदीच अनभिज्ञ असल्याने प्रथम पुण्यातला अप्पा बळवंत चौक पालथा घातला आणि नंतर मुंबईचा ठाकुरद्वार देखील. पण त्यांचे किंवा त्यांचे वरील एकही पुस्तक काही मला गावले नव्हते. मात्र काही दिवसांनी अचानक मला आपण होऊन कुणीतरी दोन ग्रंथ आणून दिले - कां, कसे ते ठाऊक नाही पण त्या विलक्षण योगायोगाची गंमत वाटली खरी ! यालाच तर म्हणतात नाचमत्कार’ ? 

ते असो. आजदुर्मीळ ग्रंथांवरविचार करताना कित्येक किस्से सहज आठवले

माझ्या आजोबांनी केशवसुत आणि त्यांची कविता यावर एक सुरेख प्रबंध लिहून तो पुस्तक रूपात छापला होता. ते पुस्तक त्या काळीं पुणे मुंबईच्या युनिव्हर्सिटींत एम् साठीरेफरन्स बुकम्हणून वापरले जाई असे ऐकून होतो. त्या पुस्तकाची एकुलती एक उरलेली प्रत वडिलांनी जिवापाड जपून ठेवली होती. मात्र खरेखुरे दानशूर असलेल्या पिताजींनी ती प्रत एका मराठीच्या प्राध्यापकांना वाचण्यासाठी दिली आणि ती कायमची विस्मरणांत गेली

असेच एकदा मला लहर आली म्हणून एबीसी मधल्या प्रभात टाकीजच्या समोरच्या बोळांत पटेल ब्रदर्स या दुर्मीळ पुस्तकांच्या दुकानांत शिरलो होतो. पन्नास वर्षांपूर्वी आम्ही मेडिकलला असताना पाचही वर्षें ज्या विनोदी एकांकिका वठवल्या होत्या ती पुस्तके मला पुन्हा चाळायची होती.. माझा उद्देश सफल झाला नि मी डझनभर पुस्तके शोधून काढलीच त्या जुन्या ढिगाऱ्यातून ! ती पुस्तके घेऊन मी लंडनला गेलो, मुलाच्या मित्र परिवाराने ती पुन्हास्टेजकरावी म्हणून, पण हाय, मुलाच्या मित्राने ती कुठे हरवून टाकली कळे. (यालाही म्हणतातयोगायोगअसे ! ) असो

खरंतर एखादा ग्रंथ दुर्मीळ होणे ही बाब नित्याचीच असते ना ? मला सांगा, आता जर मी कालीदासाचेशाकुंतलकिंवामेघदूतमवाचायचे ठरवलेच तर कदाचितनेट् वरशोधा, सहज मिळतील असे कुणी सांगितले तरी त्या ग्रंथांचाफीलपुन्हा सापडेल काय, त्यांचा तो विशिष्ट गंध, ती जीर्ण पाने नि त्यां मागे दडलेल्या अनेकानेक आठवणी ? अशी खासियत असते दुर्मीळ ग्रंथांची

आपली पीढी तसे पाहिले तर खूप भाग्यवान आहे कारण आपण कुठेतरी, केव्हातरी अनेक ग्रंथ हाताळले आहेत, त्यांचा आस्वाद घेतला आहे - नव्हे उपभोगला आहे. पुढच्या पीढ्यांना तो आनंद मिळेलच याची शाश्वती नाही. अर्थात्आनंदु ना निरानंदुया सर्व गोष्टी सापेक्ष असतात नाही का

रहाळकर

२६ नोव्हेंबर २०२२ (मुंबई


Thursday, November 24, 2022

 

चालणारी माणसं !

 चालणारी माणसं

गेले चार दिवस मुम्बैला लेकीकडे डेरेदाखल झाले आहोंत आणि ग्यालरीत बसून माणसेच माणसे पाहातोय्, सतत झपाझप चालत जाणारी नि येणारी ! पुण्यपत्तन मधल्या बावधन बुद्रुक ग्रामीं इतकी माणसं पायीं चालताना क्वचितच दिसतात आतांशा ! जो तो आपापल्याबाईकवर झूम करत दिसेनासे होतानाच आढळतो हल्ली हल्लीं. गेलाबाजार काही मोटारवाले धनिक एकदा बाहेर पडले की रात्र उगवेपर्यंत शोधूनही सापडणार नाहीत म्हणा.

ते असो. मला आत्तां सांगायची आहेत ती मुम्बैतली झपझप पायीं चालणारी माणसंच माणसं. बरं तीं सुध्दा झकपक पोषाखांत, जणूं आताच कुठेतरीदाखवायलाकिंवापाहायलानिघाल्यासारखी ! आमच्या पुण्यांत स्वत: किती गबाळे आहोत हे दर्शविण्याची जणू चढाओढ असते. जितका किंवा जितकी गबाळी तितका किंवा तितकी बुध्दिमंत आणिवेल् टु डूफ्यामिलीतली अशा गोड गैरसमजात असतात हल्लीचेनव-पुणेकर’ ! (जुने पुणेकर तसे नसतात बरं का ! हो, उगीच अपमान नाही करून घ्यायचाय् आपल्याला. तसे जुने काय नि नवे काय, अपमान करायला नि करून घ्यायला कायमच तत्पर असतात ते, नाही म्हणायला

बरं तेही असो. मुम्बैतली माणसं जितकी चालतात त्याची कोणी संगणकावर बेरीज केली तर कित्येक पृथ्वी प्रदक्षिणांचं गणित सहज मांडतां येईल. (‘रिसर्चसाठी एक फुकटचा सल्ला किंवा विषय ! तसेहीओरिजिनलपुणेकर फुकट सल्ला द्यायला कधीच मागेपुढे पाहात नाहीत. तसा मी काही व्होर्जिनल पुणेकर नाही, पण आतांशा माझ्या बेरकी लिखाणांमुळे मीच तो जन्मजात पुणेकर असा लौकिक मिळवून आहे ! असो

आत्तांच पुन्हा ग्यालरीत येऊन बसलोंय् नि पाहातोय खालीं सतत चालणारी असंख्य माणसं. कोणीच कुणाशी क्षणभर थांबून हवापाण्याच्या गप्पा मारत नाहीत हे पाहून मन जरा विषण्ण होते खरे. कारण लंडनच्या फूटपाथ वरून समोरून येणारा एखादा रिकामटेकडाव्हाट ॲन ॲट्राशियस वेदर, किंवा व्हाट ब्यूटिफुल मॉर्निंग वेदरअशी पुस्ती जोडायला कुचराई करत नाही ! इथे मात्र जो तो आपल्या घाईंत, नऊ त्रेपनची सीएसटी फास्ट सोडून चालणार नसते ना ! मज सेवानिवृत्ताला हल्लीची घडाळ्याशी चाललेली कसरत खरंच पाहावत नाही हल्लीं ! मग मी पुन्हा एकदा ग्यालरींत बसून चालणारी माणसं मोजत बसतो

रहाळकर

२४ नोव्हेंबर २०२२ (मुम्बई


This page is powered by Blogger. Isn't yours?