Friday, September 30, 2022

 

रिले रेस !

 रिले रेस !

काल अहमदाबाद येथील नरेन्द्र मोदी स्टेडियमवर झालेला अतिशय दिमाखदार सोहळा - छत्तीसाव्या अखिल भारतीय क्रीडा महोत्सवाचा - अनिमिष डोळ्यांनी पाहात असताना एका पाठोपाठ आठवणींनी अक्षरश: ‘रिले रेससुरू झाली मस्तकांत

केवळ दहा वर्षांचा असतांना शिवपुरीला गणतंत्र दिवसाचे निमित्त शाळेतर्फे कलेक्टर किंवा पोलिस परेड ग्राऊंडवर अनेक खेळांच्या स्पर्धा ठेवल्या होत्या, त्यांत चारशे फूट रनिंग रेस मधे मी चवथा आल्याने बक्षीस काही मिळाले नव्हते पण तो एकंदर माहौल मनांत घर करून गेला एवढे नक्की. त्याच दिवशीं इतर शाळांसोबत झालेलीरिले रेसपण पाहता अनुभवता आली होती

आज मात्र तशाच अनेक रिले रेसेस मनांत दाटून आल्या. खरोखर, पिढी दर पिढी आपण अनेकानेक संस्कार, चालीरीती, संवई वगैरे किती सहजपणेरिलेकरत आलो आहोत नाही ! प्रत्येक राष्ट्राचा, धर्माचा, परंपरेचा वारसा बहुतेक वेळा आपसूक पुढिलांसाठीपास ऑनकेला जात आलाय. अर्थात त्याला कम्यूनिझम् वा इस्लामचा अपवाद असेल कदाचित, जेव्हा ते पर्याय लोकांवरथोपवलेगेले असतील. तथापि बहुतांश परंपरांना परंपरागत म्हणणे क्रमप्राप्त ठरते. असो

याप्रंप्रागतचालीरीती कधीकधी खूप मनोरंजन करून जातात. कित्येकांना कुठलाच तात्विक किंवा ऐतिहासिक वारसा वा आधार नसतो, कारण-मीमांसा देतां येत नाही तर कित्येक अनाकलनीय, तर्काच्या पलीकडील असतात. अर्थात सगळ्याच परंपरांना तार्किक बाजू असेलच असे नाही, त्या जस्ट पाळल्या जातात ! उदाहरणे देऊ म्हणतां ? हात्तेच्या अनेक सांगता येतील की. पण नकोच, कोणीतरी कुठेतरी दुखावले जातील कदाचित नि केवळ मनोरंजन मागे पडून निष्कारण वादविवाद उद्भवतील. नकोच तो धोका, कारण परंपरा सांगते की असे बेसूर स्वर आळवणे टाळणे हेच भलें

रहाळकर

३० सप्टेंबर २०२२


Saturday, September 24, 2022

 

अनघड शब्द नि अनवट राग !

 अनघड शब्द नि अनवट राग

खरंतर या दोन्हीकार युक्त शब्दांचे अर्थ मलाच नीटसे माहीत नाहीत, पण नेहमीप्रमाणे शब्दचावटी करीन आज पुन्हा. मला वाटतंअनघडम्हणजे अनाकलनीय, अवघड किंवा सहजासहजीं समजणारे शब्द असा अर्थ असेल कदाचित आणिअनवटम्हणजे बहुधा अप्रचलित, नाविन्यपूर्ण किंवाहट् केअसा अर्थ काढूंया

तुम्हाला हा प्रश्न पडणे साहाजिक आहे की या बाबाला आज हे नवीनच काय सांगावेसे वाटत असेल. तर मग ऐकाच आतां फालतू वेळ असेल तर

आधीं शब्द आठवले ते बालपणापासून नकळत वापरत आलेले - जसे भंकस, बंडल, बेक्कार, चुगल्या, शेळपट, नालायक, शेंगदाण्या वगैरे वगैरे ! नंतर शाळेत आणि अखेर महाविद्यालयांत अनेक शब्दांची भर पडत गेली. अर्थात त्यांसाठी डिक्शनरीचा वापर कधीच केला नाही. मेडिकलला आल्यावर मात्र मी चक्क मेडिकल डिक्शनरी विकत घेतली होती पण त्यांतून निश्चित असा अर्थबोध क्वचितच होई, कारण सहसा रोजचे वापरातून त्यांचा मतलब समजत असे

खरी पंचाईत झाली ती ज्ञानेश्वरी, दासबोध, अमृतानुभव वगैरे ग्रंथ वाचू लागल्यावर आणि नंतर भाषांतर करताना. तथापि अब्दुस सलाम चाऊस यांची मराठी-इंग्रजी डिक्शनरी आणि रेफरन्स लायब्ररींत पाहता आलेलीवेदान्त डिक्शनरीयांची खूप मदत झाली एवढे मात्र खरे. आणखी एक गौप्यस्फोट म्हणजे त्या महान् ग्रंथांवर भाष्यें किंवा सरलार्थ सांगणाऱ्या महानुभावांच्या लेखणीद्वारां मिळालेले अर्थ


आज मात्र एक विचार चमकून गेला की अशा अनघड शब्दांची आधी यादी तरी करून पाहूया , अर्थ शोधतां आला तरसोने पे सुहागा’ ! 

काही शब्द वानगीदाखल लिहिणार आहे आज, नाहीतर माझा सर्व खटाटोप आत्तांच नाही का उताणा पडणार ? मात्र खाली दिलेले शब्द त्या त्या जमान्यांतल्या  जनमानसांत रूढ असावेत हे निर्विवाद. मला गंमत वाटते ती माऊली, समर्थ किंवा तुकाराम महाराजांनी वापरलेल्या यमक जुळणींची देखील. मला वाटतं ते ग्रंथ नंतर लिहिले गेले असावे, आधी बोलून वा गाऊन सांगितले असावे कदाचित्. कारण ग्रंथ वाचत असतांना ते जर एखाद्या लयींत किंवा ठेक्यांत वाचता आले तर वरील विधानाचे सत्यत्व पटेल तुम्हाला


या संभाव्य यादीतील काही शब्द बोलण्या आधीं तुम्हाला एक कळकळीची विनंती आहे नि ती म्हणजे जरी असे प्रयोग आधी झाल्याचे तुम्हाला ज्ञात असले तरी ते कृपया मला कळवूं नका ! त्याचे कारण असे की त्यामुळे माझे अर्धे अवसान खच्ची होईल आणि जग एका उत्कृष्ठ संशोधनाला मुकेल ! ! 

मला वाटतं नमनाला एवढें तेल पुरेसे आहे


मला स्पष्ट आठवते ती नवव्या अध्यायांतली माऊलींची ओंवी - ‘तैसीं अहंममतेच्या लवडसवडी मातें पवतीचि बापुडीं म्हणौनि जन्ममरणाचिये दुथडीं डहुळितें  

किंवा, ‘हें असो आंगीं भरलिया भवंडी जैशा भोंवत दिसती अरडीदरडी तैशी आपुलिया कल्पना अखंडीं गमती भूतें वगैरे

(लवडसवडी, अरडीदरडी , भवंडीं, डहुळितें……लई भारी. असो ! ) 

रहाळकर

२४ सप्टेंबर २०२२


This page is powered by Blogger. Isn't yours?