Wednesday, April 23, 2025

 

आरती आत्मारामाची !

 आरती अंतर्यामी असलेल्या श्रीरामचंद्रांची


परम आदरणीय श्री चिमणपुरे सरांनी अशी सूचना केली की सोबत दिलेल्या आत्मारामाच्या आरतीवर काही चिंतनात्मक लिहावे. वास्तविक सरांचा स्वत:चा व्यासंग अतिशय दांडगा आहे, मात्र अख्खी हयात विद्यार्थी घडविण्यांत घालवलेल्या सरांना मज पामराची तोंडी परिक्षा घ्यावीशी वाटली असावी म्हणून पुन्हा एक धाडस करण्याचा हा प्रयत्न समजावा

तथापि आधी त्या आरतीचे शब्द पाहूं कारण ही  रचना प्रथमच नजरेसमोर आली आहे

उत्कट साधुनि शिळा सेतू बांधोनि लिंगदेह लंकापुर विध्वंसुनी / कामक्रोधादिक राक्षस मर्दूनी / देह-अहंभाव रावण निपटोनी //// जय देव जय देव जय निजबोघा रामा / परमार्थें आरती, सद्भावें आरती परिपूर्णकामा / जय देव // // प्रथम सीताशुद्धी हनुमंत गेला / लंकादहन करूनी अखया मारिला / मारिला जंबूमाळी भुवनीं त्राहाटिला / आनंदाची गुढी घेऊनिया आला // //   निजबळें निजशक्ती सोडविली सीता / म्हणुनि येणे झाले अयोध्ये रघुनाथा // आनंदें वोसंडे वैराग्य भरता / आरती घेउनी आली कौसल्या माता // जय देव //// अनाहतध्वनि गर्जती अपार / अठरा पद्में वानर करती भुभु:त्कार / अयोध्येस आले दशरथकुमार / नगरीं होत आहे आनंद थोर // // सहज सिंहासनी राजा रघुवीर / सोहंभावें तया पूजा उपचार / सहजांची आरती वाद्यांचा गजर / माघवदासा स्वामी आठव ना विसर / जय देव जय देव जय निजबोधा रामा / परमार्थें आरती सदभावें आरती परिपूर्ण कामा //“ 


प्रथमदर्शनी या आरतींत प्रभु रामचंद्र, सीतामाई, हनुमंत, भरत, कौसल्या माता, महाराज दशरथ आणि रावणाचा उल्लेख वाचतांना हेमिनी-रामायणवाटते खरे पण हीआत्मारामाचीआरती आहे हे विसरून चालणार नाही. प्रत्येकाच्या देहांत जसा तो आत्माराम विराजमान आहे तसेच कामक्रोधादि रिपु ठाण मांडून बसले आहेत. सर्वांत मोठा असा देहाहंकार, देहालाच सर्वस्व मानणारा तर क्षणोक्षणी फुत्कार सोडत असतोच

तथापि समर्थांचा आत्मारामसहज-सिंहासनावरविराजमान आहे. सर्व कोलाहला पासून अलिप्त अशा  सोहंहंस: या हिंदोळ्यावर डुल्लत असलेला हा परिपूर्ण  श्रीराम निजबोध, स्व-स्वरूपाची ओळख करून देत असताना भक्ताला आठवण नि विसर यांचे भानही राहात नाही इतका तो त्या आनंदांत मश्गूल होऊन राहतो


मला माहीत आहे की ही केवळ शब्दचावटी आहे. सरांनी विचारलेल्या प्रश्नावर मख्ख राहणे देखील शहाणपणाचे नाही. तथापि या निमित्त अघिक प्रगल्भ विचार कोणीतरी नक्की मांडेल या भरंवशावर हे धाडस केले. क्षमस्व

रहाळकर

२३ एप्रिल २०२५     


Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?