Monday, December 23, 2024

 

किरीटिनं गदिनं चक्रिणं च !

 किरीटिनं गदिनं चक्रिणं …….! 


भगवंतांनी दहाव्या अध्यायांत आपल्या स्वत:च्या किमान पंचाहत्तर विभूतींचे वर्णन करताच अर्जुनाला तें दिव्य स्वरूप प्रत्यक्ष पाहण्याची घोर उत्कंठा निर्माण झाली. त्याला त्याच्या मानवी नेत्रांनी ते विराट नि विलक्षण तेजोमय रूप पाहणे अशक्य असल्याने त्याला दैवी दिव्यदृष्टी बहाल करण्यात आली. तथापि ते अतिविराट आणि प्रखर तेजाने तळपणारे किंवा चकाचौंध करणारे रूप पाहताना अर्जुनाची भीतीने गाळण उडाली आणि त्याने भगवंताला आपले सुपरिचित गोजिरे स्वरूप पुन्हा परत आणण्याची विनंती केली, नव्हे हट्ट धरला

भगवद्गीतेतील वर दिलेला श्लोक प्रसिध्द आहेच पण माऊलींनी भगवंताच्या त्या रूपाचे दर्शन मोजक्या नि बहारदार शब्दात घडवले आहे


अर्जुन म्हणतो की हे वैकुंठ-नायका, तुमचे मस्तकावर विराजमान मुगुट तोच आहे, पण त्याची दीप्ती नि तेज अधिकच विलक्षण झालेले पाहतोय मी. आणि तुम्ही करंगळीवर लीलया फिरवीत असलेले सुदर्शन चक्र पेलण्यासाठी अम्मळ मागे रेलून तुम्ही उभे आहांत. खरोखर, ते मनोहर दृष्य कधीच विसरणे शक्य नाही. दुसऱ्या हातात धरलेली गदा देखील खिळवून ठेवणारी आहे. तुमचे रिक्त असलेले दोन्ही हात मात्र अतिशय चपळाईने आणि विलक्षण कुशलतेने लगामांना मागेपुढे ओढताना दिसत आहेत. हे नीलवर्ण प्रभो, तुझे हे गोजिरे स्वरूप तू माझ्या विनंतीचा अव्हेर करतां क्षणार्धात विराट करून दाखवलेस आणि पुन्हा सगुण साकार स्वरूपात आपले दिव्य दर्शन दिलेत हे केवळ त्या दिव्यदृष्टीमुळेच मी पाहूं शकलो


विश्वरूप दर्शनाबरोबरच मला भावले ते किंचित मागे रेलून सुदर्शनचक्र पेलणारे भगवंताचे गोजिरवाणे सांवळे रूप ! तुम्हाला

रहाळकर

२३ डिसेंबर २०२४.  


Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?