Monday, August 17, 2026

 

शिवदिनकेसरी !

 शिवदिनकेसरी

शिवदिनकेसरी हे महाराष्ट्रातील पैठणचे संतकवी होऊन गेले असले तरी हे नाव मी प्रथम ग्वाल्हेरच्या श्रीढोलीबुवा महाराजांच्या कवनांतून ऐकले होते. आज कुठेतरी हे नाव पुन्हा कानांवर पडले आणि या संतकवींबद्दल तुम्हाला अवगत करून द्यावेसे वाटले

मंडळी, तुम्ही कदाचित्विंचू चावला विंचू चावला विंचू चावला हो !’ हे भारूड ऐकले असेल बालपणी. त्या भारूडाचे रचयिता म्हणजे शिवदिनकेसरी

वास्तविक ते नाथपंथीय आणि त्यांचे नाव होते शिवदिननाथ. त्यांचे सद्गुरू होते संत केसरीनाथ म्हणून त्यांनी आपले नामाभिघान शिवदिनकेसरी असे केलेसद्गुरूंवर नितांत प्रेम आणि अढळ श्रद्धा असलेल्या या संतकवीने केलेली गुरुवंदना चिरस्मरणीय राहील - ‘तो नयनांत वसेल जेव्हा, जग गुरूब्रह्म दिसेल तेव्हा’ !

योगमार्ग आणि भक्तिमार्गाचा सुरेख समन्वय त्यांच्या विपुल वांग्मयातून दृग्गोचर होतो.

विंचू चावलाया भारूडाव्यतिरिक्त त्यांनी अनेक पदें, अभंग आणि भक्तिज्ञानावर आधारित ग्रंथांची निर्मिती केली. एकवीस अध्यायी ज्ञानप्रदीप हा ग्रंथ उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे जवळजवळ पाचशे पदांचा संग्रहदेखील प्रचलित आहे

विंचू चावलाया भारूडातील विंचू म्हणजे अवांच्छित वासना, देहबुद्धी वगैरे विषारी नि विलक्षण क्लेश देणाऱ्या इंगळ्या होत हे तुमच्या चाणाक्ष नजरेतून सुटले नसेलच म्हणा ! ! 

रहाळकर

१७ ऑगस्ट २०२६ 


Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?