Monday, August 10, 2026

 

नेक् टाय !

 नेक् टाय

आज हॅंगरवाले कपाट उघडताच चारदोन नेकटाय खालीं घरंगळत आले. त्यांना पुन्हा स्थानापन्न करत असताना प्रत्येक टायच्या आठवणींत रमून गेलो पुन्हा एकदां


खरंतर पहिलावहिला नेक् टाय वापरायला सुरूवात झाली मेडिकलच्या तिसऱ्या वर्षापासून, कारण एका प्राध्यापकाचा दंडक असे प्रत्येक विद्यार्थ्याने हॉस्पिटलमध्ये शिरण्यापूर्वी व्यवस्थित परीटघडीच्या कपड्यांत आणि ॲप्रन बरोबरच नेक् टाय बांधूनच आले पाहिजे. त्यावेळी एकदोन टाईज पुरेशा असत. मात्र त्यानंतर हळुहळू त्यांची संख्या वाढत गेली कधी छान दिसला म्हणून किंवा बहिणींनी भेट दिल्यामुळे. ( होय, तेव्हांसुद्धा बहिणीच असे उपहार देत ! ) 

नेक् टायची सुरेख समोसा गाठ मारण्यात मी लवकरच तरबेज झालो नि माझ्या अनेक मित्रांनी माझ्याकडून त्यासाठी धडे घेतले. मी त्यांनासमोसा नॉटबरोबरचशिंगाडा नॉटबांधायलाही शिकवले होते जी किरकोळ शरीरयष्टीवर अधिक शोभून दिसत असे. त्याकाळीं इंग्रजी शब्दांना मराठी किंवा हिंदी फ़ॉर्मॅट देण्याची टूम निघाली होती आणि नेकटायला कंठलंगोट हा घाणेरडा शब्द प्रचलित झाला होता. असो


हे नेक् टायचे अप्रूप मला परवा परवांपर्यंत होते हो. वाढता वाढतां वाढे असे करता करतां तीनचार डझन केंव्हा कसे होत गेले कळे. मात्र प्रत्येक टाय अतिशय सुंदर होता हे निर्विवाद

या संख्येवरून आठवले आमचे ॲनॅटमीचे प्रोफेसर इंद्र भार्गव. त्यांचे वडील युधिष्ठिर भार्गव हे तेव्हाचे आयसीएस् सनदी अधिकारी, खूप माया जोडलेले आणि इंद्र भार्गव तर चक्क एचओडी देखील. अमाप पैसा होता घरात आणि इंद्र विशेष देखणा, हौशी आणि शो-मॅन ! ते दररोज नवीन सूट टाय परिघान करीत. आमच्या दोन वर्षांच्या ॲनॅटमी सत्रात त्यांनी कधी एकही सूट टाय रिपीट केल्याचे स्मरत नाही


या नेक् टाय बरोबरचबोआणिकॅव्हेट्देखील प्रचलित होत्या. विशेषकरून महूहून इंदौरला येणारे सैनिकी अघिकारी बहुधा कॅव्हेट वापरीत, एक मफलरवजा त्रिकोणी झबलं जे इंदूरच्या थंडींत आवश्यक असे. ‘बोचा वापर शंतनुराव किर्लोस्करांचा ट्रेडमार्क होता नै


आधी बहिणींनी, मग पत्नीने नि नंतर जांवई मुलगा आणि मुलीनेही छान छान नेक् टाय हौसेने खरेदी करून दिले ( मैत्रिणीच नसल्याने कुणाचे नाव घेणार ! ) असो


चारदोन नेकटाय काय घरंगळले, किती वेळ वेठीस धरले तुम्हाला पहा

रहाळकर

१० ऑगस्ट २०२६.     


Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?