Wednesday, July 15, 2026

 

गुणग्राही - Connoisseur !

 गुणग्राही - Connoisseur ! 


Connoisseur या शब्दाचा मला काही केल्या मराठीत अर्थ काढता येत नव्हता. रसिक, रत्नपारखी वगैरे शब्द योजून पाहिले पण समाधान होत नव्हते. आज अचानकगुणग्राहीहा शब्द कुणीतरी जणू कानात सांगून गेला नि माझे तरी समाधान झाले आहे आज

आतां, गुणग्राही म्हटल्यावर गुण म्हणजे सत्व-रज-तमात्मक  असे संतांनी सांगितले असले तरी माझ्यासारख्या सामान्य माणसाला फक्त सद्गुण आणि दुर्गुण हे दोनच शब्द अघिक भावतात. तसं पाहिलं तर प्रत्येकाच्या जडणघडणीनुसार, संस्कारांनुसार आणि प्रकृतीनुसार कुणाला इतरांचे दुर्गुण आधी नजरेस पडतात तर कुणाला त्यांचे चांगले गुण. जो जशा चष्म्यातून पाहेल तसे त्याला दिसून येईल. संतांची दृष्टी निर्दोष असल्याने त्यांना चष्मा लागतंच नाही, मात्र आपल्या सारख्यांनी तो एकदा चढवला की तो उतरवता येत नाही. तथापि संत, सत्पुरूष, सद्गुरू, सद् ग्रंथ त्या चष्म्याचे पर्याय समोर ठेवत असतात. ते उचलणे किंवा दुर्लक्ष करणे निव्वळ ज्याच्या त्याच्या प्राक्तनात असते. कुणाचेही दोष पाहू नकोस, त्याचे गुण शोधून काढ असा सल्ला वर नमूद केलेले सर्वच देत राहतात

खरंतर सद्गुण-दुर्गुणांवर श्रीसमर्थांनी अनेक समास लिहिलेत. प्रत्यक्ष भगवंतांनी आख्खा सोळावा अध्याय त्यासाठी खर्तिला आहे. आपण फक्त ते वाचतो नि विसरून जातो. सद्गुण आणि दुर्गुणांची यादी करू गेले तर सद्गुण कितीतरी पटीने अधिक भरतील. मात्र अल्पसंतुष्ट म्हणून आपण तुलनेने कमी असलेले इतरांतील दुर्गुणच पाहावेत काय ? गौर करनेवाली बात है यह, कृपया तबज्जोह दीजियेगा

रहाळकर

१५ जुलाय २०२६

 ( माझा अंतरंग मित्र डॉ. पारोळकरचा आज  वाढदिवस ! तो नेहमी सांगे प्रभू, दूसरोंकी खामियां ढूंढना बहुत आसान है, उनकी अच्छी बातोंपर नजर डालियो- तो नेहमीच शुद्ध माळवी हिंदींत बोलत असे ! ! ) 


Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?