Monday, May 11, 2026

 

दाशरथी श्रीराम !

 दाशरथी श्रीराम


आज सकाळपासून एक जुने भजन सतत आठवत होते, जे रास्तापेठेतला रामन् खूप आळवून आळवून गात असे. आधीच वरच्या पट्टीत  गाणारा रमन् हे भजन अक्षरश: तारसप्तकांत नेत असे आणि प्रथेप्रमाणे तेफ़ॉलोकरताना प्रत्येकाची दमछाक होई. या भजनाचे शब्द होते- ‘अयोध्यावासी राम राम राम दशरथनंदन राम, पतितपावना राम हरे जय राघव सुंदर राम’ ! रामन उंच स्वरांत गात असला तरी त्याचा आवाज अतिशय तलम, गोड नि किंचित किनरा असा होता. सर्वांनाच ते भजन खूप आवडायचे आणि कधी क्वचित त्याने इतर भजने म्हटली तरी कुणी ना कुणीअयोध्यावासीची फर्माईश करायचा नि तोही ती विनंती सहर्ष मान्य करायचा. असो


आज हे सर्व सांगण्याचा उद्देश म्हणजे विलक्षण योगायोगाने मंजिरीताईंनी सुरू करत असलेला एक नवीन उपक्रम वाचण्यांत आला ज्यांत येणाऱ्यापुरूषोत्तमअर्थात अधिक मासाचे औचित्य साधून श्रीरामावर विविध विशेषणांनी विनटलेल्या रामचंद्रांच्या आणि श्रीकृष्णाच्याही  कित्येक नामावलींवर लेख, काव्य, चित्रें यांनी परिप्लुत साहित्य त्यांचेकडे ( समर्थ-आत्माराम ) पाठवून देण्याचे आवाहन केले आहे

खरंतररामरक्षेंतश्रीरामांना शेकडो नावांनी संबोधले आहे. मात्र आज रामन् चे वरील भजन आठवूनदाशरथी रामजवळ करावासा वाटला. ‘रामायणघडण्याची कित्येक कारणे विद्वान मंडळी सांगत असलीं तरी दशरथ-पुत्र श्रीराम केवळ पित्याची आज्ञा शिरसावंद करण्यासाठी चौदा वर्षें वनवासात गेला नि पुढचे सर्व रामायण घडले असे मला वाटते. खरंतर श्रीरामाच्या गुण-समुच्चयाला मर्यादा अशी नाहीच. जगाला माहीत असलेले सर्वच गुण रामचंद्रांत एकवटले होते, त्यामुळे अमुक एक सद्गुण श्रीरामांत नव्हता असे म्हणणे वेडगळ ठरेल. रामायणांत आलेल्या प्रत्येक पात्राशीं रामाचा संबंध आहेच, मग ते कौसल्यासुत असो, सीतापते असो, मारूतिसेवित असो, रावणमर्दन असो की थेट रघुकुल असो. आजतरी दाशरथी राम मला अघिक प्रिय वाटतो कारण खरं सांगू, पितृतुल्य वाटावी अशी मंडळी आतां भिंग लावून का बरं शोधावीशी वाटतात ? आपला दरारा कायम ठेवीत आदर्श पित्याची सर्व लक्षणे बाळगून असणाऱ्या पितृतुल्य माणसांची वानवा का असावी ? कदाचित आज असतील अशी मंडळी पण आदर्श एकच, श्रीराम आणि राजा दशरथ


(( हे लिखाणसमर्थ-आत्मारामसाठी नाही हे कृपया मान्य करावे, कारण त्यांत अनेक सदभक्तांचा आणि साधकांचा सहभाग असेल, त्या भरजरी शेल्याला हे ठिगळ नसावे ही नम्र विनंती ! )) 

रहाळकर

११ मे २०२६.      


Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?