Friday, May 01, 2026
बरखुरदार !
बरखुरदार !
बरखुरदार हा एक फारसी शब्दप्रयोग असून तो सहसा पुत्र किंवा होतकरू तरूणांसाठी आदरार्थी वापरला जातो हे कित्येकांना माहीत नसेल. अर्थात कुणावर व्यंग करताना किंवा त्यांची नकळत हजामत करतानाही काही महानुभाव पाहिलेत मी. हजरत, जनाब वगैरे शब्द मूळ उर्दूतले. अर्थात ते नेहमीच आदरपूर्वक उच्चारले जातात.
बरखुरदार हा शब्द आमच्या भागांत सर्रास वापरला जाई. अगदी आमचे मेडिकलचे प्राध्यापक देखील हिंदींत आलेच तर बरखुरदार म्हणत, मात्र ते बहुधा खरडपट्टी काढण्यासाठीच !
आज ‘हरफनमौला’, ‘बरखुरदार’, हजरत, जनाब वगैरे शब्द का पिंगा घालत आहेत मनात ते माहीत नाही, पण यानिमित्त तुमची व्होकॅब्युलरी म्हणजे शब्दभांडार जरासे समृद्ध करायचा उपद्व्याप केला. सांगा आवडला असेल तरच ! कारण त्यामुळे माझेही अज्ञानात थोडीशी भर पडेल, अज्ञान म्हणजे भ्रम बरं का ! !
रहाळकर
१ मे २०२६.