Monday, April 20, 2026

 

बखतगढ !

 बखतगढ

आत्तांच मथवाड-अलिराजपूरचे वर्णन पुन्हा वाचत असताना त्याच प्रदेशातील बखतगढ नि जोबट या सधन संस्थानांची याद ताजी झाली. वास्तविक मथवाड हेहिल स्टेशनमध्यप्रदेशच्या दक्षिण-पश्चिम भागाचे अखेरचे टोक असले तरी त्याच्या आधी येणारेबखतगढहे अधिक नयनरम्य होते कारण तें सातपुडा पर्वतरांगांच्या एका डोंगरावर वसलेले जुने गांव होते लहानसेच मात्र एक मिनि-संस्थान. फारसे श्रीमंत नसले तरी तेथील निसर्गशोभा लुभावनी होती खास. मला आठवतेय् आम्ही त्या भागांत एका ट्रक मधून फिरलेले. एका अवघड वळणावर मस्कऱ्या ड्रायव्हरने दाबून धरलेला ब्रेक सोडू काय असे आम्हा मुलांना विचारलेले स्पष्ट आठवतंय मला आणिनहीssss’ असे सर्वजण एकाच वेळी ओरडलो होतो कारण समोर चक्क दरी होती हो

खरंतर रात्रीचे दोन वाजले होते तेव्हा, कारण दिवसभर रणरणत्या उन्हातले ( ४८-५० डिग्री ! ) अण्णांचे दौऱ्याचे काम झाल्यावर परतीच्या प्रवासात होतो आम्ही. रात्री दोन वाजतांही गरम हवांचे झोक बेचैन करत होते. प्रत्यक्षात अतिशय घनदाट जंगलातून ट्रक जात असताना अचानक वाघोबा तर झडप घालणार नाही ना या भीतीमुळे सर्वजण जागे होतो. त्यातून आज अमावस्या असल्याचे आईने सांगतांच सर्व बालबच्चे एकमेकांना घट्ट धरून होते. असो


जोबटहे त्या मानाने अधिक सधन, मात्र तेही दाट जंगलांत वसलेले. कुणास ठाऊक कसे पण जोबट पुरती तिथली लाल माती आठवतेय मला. त्या जंगलांत असंख्य चारोळीची झाडे होती, तशीच काही साखरेची देखील. होय, त्याच्या प्रत्येक चपट्या फुलातून एकेक साखरेचा दाणा निघत असे आणि खाली पडलेली मूठमूठ फुलें गोळा करून तेसाखरेचेकण जिभेवर ठेवत असूं. तो भाग एऱ्हवी अत्यंत मागासलेला, मूळ भिल्ल वस्तीचा. कदाचित् म्हणून तिथे ख्रिश्चियन चर्च आणि रूग्णालय उभारले गेले असावे. ( माझा अंतरंग मित्र प्रभू खरे तिथे दोन वर्षें सेवेंत होता अमेरिकेतून परत आल्यावर. ) 

जोबट संस्थानची फारशी माहिती नाही मात्र इंदोरला जोबट नरेशची लाल नंबरप्लेटची कॅडिलॅक खूप वेळा पाहिलीय् मी

पुरे करतो आता हे चऱ्हाट

रहाळकर

२० एप्रिल २०२६.    


Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?