Tuesday, March 31, 2026

 

राल्स्, ऱ्होन्काय आणि क्रेप्स् !

 राल्स्, ऱ्होन्काय नि क्रेप्स्


स्टेथॅस्कोपने छाती तपासत असताना या तीन शब्दांचा वापर करत असूं आम्ही. राल्स् म्हणजे एखाद्या चिंचोळ्या बाटलीत पाणी भरताना किंवा काढताना येणारा आवाज, ऱ्होन्काय म्हणजे फुंकणीतून वारा घालावा तसा कोरडा आवाज, तर क्रेप्स् किंवा क्रेपिटेशन्स म्हणजे आपल्या कानाजवळ आपणच आपले केंस चिरडावे तसा खरखरीत पण सौम्य आवाज ! हे सगळे का सांगतोय तुम्हाला तेही सांगतो


असं पहा सर्वच डॉक्टर मंडळी आणि विशेषकरून मेडिकलचे विद्यार्थी स्टोथोस्कोप नामक आयुधाला गळ्याभोंवती मिरवण्यात धन्यता मानतात. खरंतर हे श्रवण-आयुध काय म्हणून वापरले किंवा वापरले जात असेल ? मानवी शरीरातील अंग नि अंग सतत काही ना काही हालचाल करीत असतं, मग ते हृदय असो, फुफ्फुसं असोत वा सगळ्या रक्तवाहिन्या आणि इंटेस्टीन्स सुद्धा. त्या चळवळींचा आवाज तर येणारच ना, मात्र तो अतिशय सूक्ष्म असल्याने स्टेथोस्कोप त्याला किंचित मोठा करून ऐकवतो. हे झाले ढोबळ वर्णन, मात्र खरी मज्जा पुढेच आहे कारण नुसती छातीच नव्हे तर पोट देखील ऐकतां येते बरं का. पोटातल्या गुडगुडण्याला आम्ही म्हणतोबार्बोरिग्मी’ ! कठीण आहे उच्चारायला पण ऐकतांना आपण पाण्याच्या तळाशीं आहोत असे वाटते. हृदयाचे ठोके तर अव्याहत लुब् डुब् लुब् डुब् असा आवाज करत असतात आपल्या जन्माच्या कितीतरी आधीपासून. याला आम्ही म्हणतोफीटल् हार्ट साऊंड्सजे गर्भवतीच्या पोटावर स्टेथोस्कोपने किंवाफीटोस्कोपने ऐकतां येतात. हृदयाच्या साध्या लुब् डुप् पेक्षा कधी कधीमरमरनावाचा आवाज ऐकताच आमचे कान उभे राहतात आणि कुछ तो गडबड है म्हणत पुढची पाऊलें उचलायला भाग पाडतात


या स्टेथोस्कोपच्या खूप दर्दभऱ्या कहाण्या मला सांगता येतील. खरंतर मेडिकलच्या तिसऱ्या वर्षीं स्वत:चा स्टेथोस्कोप खरेदी करायची लगबग किंवा चढाओढ लागे. स्वस्तवाले भारतीय बनावटीचे पंधरावीस रूपड्यांत मिळत तर जर्मन चिरूर्ग पंचेचाळीस पन्नास पर्यंत. त्यातही लांब नळ्यांचे नि आंखुड असे प्रकार असत. आपापल्या कुवतीनुसार आणि बुद्धीनुरूप ते विकत घेतले जात. जुनी टेक्स्टबुक किंवा बोनसेट् ऐवजी स्टेथोस्कोप मात्र ब्रॅंडन्यू असे जो पुढे कित्येक दशकें वापरात राही. ग्वालियरच्यामेळ्यांतपोरीसोरींवर भाव मारण्यासाठी तिथली तरूणाई खांद्यावर हॉकीस्टिक्मिरवत फिरायची तसे माझे काही सहकारी स्चेथोस्कोप मिरवीत पार्कमधे फिरायला जात. एकदा मात्र सुनील माकोडेला तसे फिरताना पाहून आमच्या ॲनॅटमीच्या लेक्चररने त्याची भंबेरी उडवलेली मला स्पय्टपणे आठवतेय्. असो

मी मघा म्हटले स्टेथोस्रोपचा वापर किंवा वापर ! होय, एकदा मित्राच्या कन्सल्टिंग रूमवर गेलो असताना तो पेशंट पाहात असलेला दिसला. माझ्याशी बोलत असतानाच त्याने पेशंटची पल्स पाहिली आणि स्टेथोस्कोप त्याच्या छातीवर सगळीकडे फिरवून आणला, मात्र तो आपल्या कानांवर लावता चक्क खांद्यावर रूळूं दिला होता. मी चक्रावलोच, म्हणतात तसे वापरलेला’ ! 

एक पन्नास वर्षें प्रॅक्चिस केलेले आणि अजूनही दवाखाना सांभाळणाऱ्या ज्येष्ठ डॉक्टरांचा स्टेथोस्कोप कायम खुंटीवर टांगलेला पाहिलाय मी ! एकदा त्यांच्या स्नेह्याने तो नळाखाली धरला तर त्या नळ्यांतून भसक् दिशीं माती बाहेर आली की राव

एकदा मात्र एका इंजीनियरने स्टेथोस्कोपचा वापर एक भले मोठे स्वयंचलित (ऑटोमॅटिक ) मशीन दुरुस्त करताना माझ्या मामाने टेल्कोमधल्या जर्मन इंजीनियरला पाहिले होते. अनेक पॅनल्सवर स्टेथोस्कोप लावून त्याने नेमके पॅनल शोधून काढल्याचे मामाने सांगितले होते


काहीही म्हणा, स्टेथोस्कोप हा स्टेटस सिम्बॉल आहे खरा. तो जवळ असताना समाजाची तुमच्याकडे पाहण्याची दृष्टी बदलते हा अनुभव नुसताच बोलका नसून चक्क गुदगुल्या करणारा असतो बरं का !

रहाळकर

३१ मार्च २०२६   


Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?