Sunday, March 29, 2026
विड्यातं पान !
विड्याचं पान !
खूप वर्षांपूर्वी म्हणजे मी मेडिकल शिक्षण घेत असताना ‘विड्याच्या पाना’चे महत्व आमच्या एका ज्येष्ठ प्रध्यापकाने अधोरेखित केलेले आज अचानक पुन्हा आठवले ‘सकाळ’मधील एका बातमीने. हृदयरोगावर विड्याचे पान एक पूरक उपचार ठरू शकतो असे त्यांत विधान आहे.
तथापि आमच्या त्या प्राध्यापकाने तेच विधान आम्हाला वेगळ्याच पद्धतीने शिकवले होते. त्यांनी आम्हाला एक साधा सोपा प्रश्न केला होता की समजा तुम्ही थर्डक्लासच्या रेल्वे डब्यातून प्रवास करीत आहात आणि समोर बसलेल्या पोक्त गृहस्थाला अचानक छातीत जोरदार दुखूं लागले. तुम्ही स्वत: डॉक्टर असल्याने तुमच्या लगेच लक्षात आले की तो ॲन्जायना अर्थात हृदयविकाराचा झटका असू शकतो. दुर्दैवाने तुमची इमर्जन्सी बॅग तुमचेपाशी नाही. अशा वेळी तुम्ही कशी मदत करू शकता किंवा प्रथमोपचार करू शकता ? आम्ही जरी सीपीआर देऊ वगैरे म्हटले असले तरी त्यांनी प्रश्न नीट ऐका हे सुनावले. तुम्ही थर्डक्लासने प्रवास करीत आहात. डब्यांत कुणा ना कुणाजवळ पान-तंबाखूची चंची असणारच. तुम्ही एक विड्याचे पान मागवून त्याचा चोळामोळा त्या पोक्त माणसाच्या तोंडात भरवा. विड्याच्या पानात ‘व्हेजोडायलेटरी’ गुणधर्म असल्याने तो विडा सॉर्बिट्रेटचे काम करू शकतो !
माईंड यू, पासष्ट वर्षांपूर्वीचा हा धडा आजच्या सकाळमधील बातमीने पुन्हा जागा केला !
रहाळकर
२९ मार्च २०२६