Monday, March 23, 2026

 

थोडक्यात पण महत्वाचे भाग तीन

 थोडक्यात पण महत्वाचे भाग तीन-

पुढे…..

) बालविकास या शैक्षणिक उपक्रमाबरोबरच वरच्या वर्गातील गरजू विद्यार्थ्यांसाठी मोफत कोचिंग क्लासेस, ग्रामीण भागात साक्षरता वर्ग,, प्रौढ शिक्षण, व्यवसाय मार्गदर्शन इत्यादि अनेक उपक्रम राबविले जातात. यापैकी आपण स्वेच्थेने कोणतेही क्षेत्र निवडूं शकतो. मात्र त्याचाही यथोचित अभ्यास करून सेवाभावाने सहभाग घ्यायला हवा


) सेवाकार्यें - खरंतर आपण आपला दररोजचा कितीतरी वेळ विनाकारण वांया घालवीत असतो. निजण्यापूर्वी क्षणभर दिवसातले आपले कार्यकलाप आठवून पाहिले की लक्षात येईल की दररोज असू देत, आठवड्यातून काही वेळ आपणइतरांसाठीदेऊ शकलो असतो की नाही ? सेवाकार्यांचा कदाचित मूळ गाभा आहे हा. आपला थोडा वेळ, थोडे श्रम, थोडे कौशल्य आपणइतरांसाठीखर्च करू शकतो काय ? तसे जर करता आले तर सेवेच्या असंख्य संधी आपल्यासमोर हात जोडून उभ्या असलेल्या आपल्या लक्षात येतील. कोणती सेवा कशी करावी हे ज्याने त्याने आपला वकूब ओळखून करायचे असले तरी संधटनेने आखलेल्या सेवेत आपण नक्कीच सहकार्य करू शकतो. सेवेसाठी काही गाईडलाइन्स देइनच पुढे


मला कित्येक थोर वक्त्यांची उद्बोधने ऐकायचे भाग्य लाभले. त्यांतील काही निवडक वेंचे - “काळीज हवे चांगल्याला चांगलं म्हणण्याची नि छाती हवी वाईटाला वाईट म्हणण्याची” ! ; “खिलाडू वृत्ती पाहिजे, विनोद बुद्धी पाहिजे” : “ जनस्तुती पासून दूर राहा, कौतुक केवळ स्वामींकडून “ ! “ परनिंदा टाळा, सर्वांशी प्रेमाने बोला” . 


यशाचा सोपान चढण्यासाठी- यशोगामी दृष्टी, स्पष्ट उद्दिष्ट, मनाची सर्व शक्ती लावा, साद्ध्यावरच सर्व लक्ष टेवा, आत्मविश्वास बाळगा, अपयश पचविण्याची तयारी ठेवा, वेळीच कार्य करा, स्वयंसूचना, इतरांना प्रेरणा द्या, विचार करून कार्य करा, उत्साही रहा, फिरून यत्न करा, सहास्य व्यक्तिमत्व हवे, परमेश्वरावर नितान्त श्रद्धा ठेवा ! “


स्वत:ची शक्ती ओळखून कार्य करा, ‘जो बोलेगा वह प्रॅक्टिस करो, जो कर सको वही बोलो’ !

पुरषार्थ को प्रार्थना के साथ जोडो’. 

बोलणेकसे असावे - प्रेममय, प्रेमाने ओथंबलेलं, केवळ सत्यच असं पाहिजे. शिवाय आपल्या विचारांशी सुसंगत असलं पाहिजे.

खरंतर मृदुवचन, सौम्य, सत्य आणि प्रेमपूर्वक संभाषण यालाच म्हणतातवाक् तपस’ ! 

अष्टसात्विक भाव ? - प्रेम, त्याग, अर्पणभाव, यज्ञ (कर्म) भाव, नि:स्वार्थ, निरहंकारी, निष्काम, एकात्म भगवत्भाव, दयाभावना, आषुतोष (नित्यतृप्त) ! 


मनाला ब्रेक लावता आला नाही तर त्यालावळवला’ ! 


काय नसावे ? - अहंगंड, न्यूनगंड नको ; अभिमान, मत्सर, तिरस्कार, क्रोध नको ; अनीतीचं आचरण नको . परनिंदा, परस्त्री, परद्रव्य नको, षड्रिपूंचे प्राबल्य नको

अपेक्षा नको, दु:संग टाळा ( जयाचेनि संगें समाधान भंगे- तो दु:संग ! ) 

थांबतो जरासा

क्रमश

रहाळकर

चैत्र शुद्ध पंचमी शके १९४८

२३ मार्च २०२६.      



Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?