Monday, February 16, 2026

 

भटकणे नि भरकटणें !

 भटकणे नि भरकटणें…….! 


नुस्ताच गॅलरीत बसून रस्त्यावरची वर्दळ पाहात बसलो होतो आणि मनात आलं की आपणही जरा फेरफटका मारून यावा. अर्थात कुठे जायचं ते अजिबात ठरिवलं नव्हतं. एऱ्हवी सुद्धा आम्ही कित्येक वेळा आधी काहीही ठरिवतां बस्निकल पडत होतो’ ! नवल म्हणजे हेनिकल पडणेबरेच वेळांलांबचा पल्लागाठत आलेले असे, मसलन् पांवस, प्रशांति निलयम किंवा औदुम्बर नृसिंहवाडी  वगैरे. सुरुवातीला फटफटीवरून, मग स्कूटर, नंतर एष्टी, आणखी नंतर कारने नि कधी मॅटॅडोरने देखील. तथापि सर्वात हुकुमी म्हणजे मनोमनीं ! ! 


आज कुठे कुठे जाऊन आलो म्हणता ? आज चक्क लंडनभर फिरून आलो की राव अर्ध्या तासात ! मस्तपैकी स्नॅक् ची पाकिटं, ज्यूसची छोटी कार्टन्स, छत्री नि मोफत प्रवासाचा पास घेऊन, बायको नि मुलांना सांगून  आणि अर्थातच मोबाईल घेत्साता बाहेर पडलो. समोर आली त्या बसमघे स्थानापन्न झालो आणिबसच्या शेवटल्या थांब्यावर उतरलो. समोरच ट्रॅमचे स्टेशन दिसले नि नुकतीच आलेली ट्रॅम परतीच्या प्रवासाला निघालेली पाहून सरळ आत घुसलो. चक्क विंबलडन् ला जाऊन थांबली की ती ट्रॅमगाडी ! दोनशे नंबरची बस दिसली म्हून मर्टनचं गणपती मंदिर पुन्हा एकदा फिरून आलो. अर्थात तिथे जरासा थांबून दर्शन वर्शन घेतलं, गंपतिबाप्पाला बाबाय् म्हणत पुन्हा तीच ट्राम पकडली आणि क्रॉयडनला ब्रेक जर्नी केला. कोण जाणे का पण मला तिथे फिरून यायला भारी आवडते. आजवर किमान दहाबारा वेळा फिरलोय तिथे मी. लुईशॅमची पंचाहत्तर नंबरची बस पकडून वाटेत नॉरवुडचे विस्तीर्ण जलाशय पुन्हा एकदा पाहून घेतले. तळीं, सरोवरें, तालाब, नद्या नि सागर-महासागर मला नेहमीच खुणावत राहतात. त्यांत दिसणाऱ्या निळ्या आकाशाचे हिरवे प्रतिबिंब मोहवून टाकते मला. असो


भटकंती करायला एकटाच बाहेर पडलो की मला इथल्ल्या कोणत्याही लायब्ररीत किमान दोन अडीच तास घालवल्याशिवाय चैन पडत नाही बघा. पायांची भटकंती अंम्मळ थांबवून त्या ग्रंथसंपदेंत हरवून जावेसे वाटते नि ते मी करतोही. दरम्यान घरी एकदोन वेळा कॉल करून माझी व्हेअरअबाऊटस् सांगायची तसदी मी क्वचित घेतो कारण त्याआधी माझी वेळोवेळी खबरबात त्यांनी आधीच मिळवली असते


थोडक्यात, ही मनोमनींची भटकंती नि भरकटणें सतत चालू असते, वानगीदाखल थोडेच कथन केले. कंटाळलात की नाही अजून

रहाळकर

१६ फेब्रुवारी २०२६.   


Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?