Thursday, February 19, 2026

 

बिल् ब्रायसन् !

 बिल ब्रायसन्

श्रीशकडे असताना मी तेथील लायब्ररींचा खूप छान उपयोग करीत असे. सहसा हट् के असलेली पुस्तकें पाहायचा मला छंद होता, त्यांत चांगली प्रवास-वर्णने मला विशेष आवडत. विविध देशांची नि शहरांची छायाचित्रें सुद्धा मला पाहायला आवडतात कारण मुळांत भटकंती-प्रिय असलेल्या मला सगळीकडे जाऊन येणे शक्य नाही, निदान या उतारवयांत

खरंतर ही गोडी लावली पुलंच्याअपूर्वाईनिपूर्वरंगमुळे. त्यात भर घातली मीना प्रभूंच्यामाय लंडनने ! मीना प्रभूंशी तर ओळख सुद्धा झाली खूप वर्षांपूर्वी

मात्र ब्रायसन् चे पहिले पुस्तकनोट्स् फ्रॉम स्मॉल आयलॅंडअर्थात ब्रिटन वरील पुस्तक वाचता वाचता मी या कलंदर माणसाचा चाहता झालो

मला विशेष भावली ती त्यांची वर्णन करतानाची विनोदी शैली. पु.. जसे वर्णनाच्याही पेक्षा स्वत:वर आणि इतरांवर कोट्या करायचे, स्वत:तीला नसलेली वैगुण्येही सहज सांगून जायचे तशी आहे बिल् ब्रायसनची लेखनशैली. हा कलंदर अमेरिकन जवळजवळ पंचवीस वर्षें इंग्लंडमधे राहिला नि परत अमेरिकेत गेला. मात्र त्याला तिथे चैन पडेना, सतत इंग्लंडच्या आठवणी बेचैन करीत. सबब तो पुन्हा एकदा ब्रिटन पालथे घालण्यासाठी एकटाच परत येतो, पाठीवर निव्वळ एक हॅवरसॅक घेत बहुतेक ठिकाणी पायीं हिचहायकिंग करीत आख्खे इंग्लंड पुन्हा तुडवून काढतो आणि या सुंदर पुस्तकाची निर्मिती होते. त्याचे हे निव्वळ प्रवासवर्णन नसून एकंदरच मानवी स्वभावांच्या विविधांगी पैलूंचे सुरेख दर्शनही आहे यांत. अशीच पुस्तकें त्याने ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अनेरिकेवरही लिहिलीत. मात्र मला विशेष भावले तेनोट्स् फ्रॉम स्मॉल आयलॅंड’, कदाचित माझेही तसेच अनुभव असावेत म्हणून

रहाळकर

२० फेब्रुवारी २०२६     


Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?