Thursday, November 06, 2025

 

गोस्वामी तुलसीकृत रामायण मराठीतून ! भाग.पहिला……

 गोस्वामी तुलसीकृत रामायण मराठीतून भाग पहिला……


माझे वडिलांचा अनेक ग्रंथांचा दांडगा व्यासंग होता.विशेषत: ज्ञानेश्वरी, दासबोध नि तुलसी रामायण या सद्ग्रंथांवर त्यांचे विलक्षण प्रेम होते. तुलसीकृतरामायण तर त्यांना मुखोद्गत झाले होते. आपणहीजेव्हा हा ग्रंथ वाचायला लागतो त्यावेळेस त्यांतील लय आपल्याला सहज जाणवते. बालपणापासूनआपण रामायणांतील कथा भक्तिभावाने ऐकतआलेले आहोंत. मात्र या ग्रंथातील ओव्या (दोहे)मराठी भाषिकांसाठी जरासे कठीण वाटणेसाहाजिक आहे. म्हणूनच या अमृतमय काव्याला मायमराठीतून सांगावेसे वाटले. अर्थात् हे धाडस आहे  याची कल्पना आहे. तरी पण म्हणतात ना की जिथे मोठमोठे  विद्वान संचार करायला बिचकतात तिथे मूर्ख मंडळी बिनधास्तपणेघुसतात’! तसेच काहीसे असले तरी अल्प वेळ माझे पंक्तीस आलांत तर तुम्हाला मूळ दोहे वाचावेसे वाटतील अशी माझी   भाबडी समजूत आहेअसो

गोस्वामी तुलसीकृत या सुंदर महाकाव्याचें सरळसुंदर भावान्तर श्रध्देय हनुमानप्रसाद पोद्दार यांनी समर्थपणे  केले आहे. या मराठीकरणासाठीं तोच आधार घेणे उपयुक्त नि प्रेरक ठरेल असा दृढविश्वास बाळगून आहे. इति प्रास्ताविक


बालकाण्डातील प्रथम सोपानांतील पहिले काहीश्लोक संस्कृतमधे आहेत, अगदी अमृतानुभावा प्रमाणे.

वर्णानां अर्थसंघानां रसानां छंदसाम अपि

मंगलानां कर्त्तारौ वन्दे वाणीविनायकौ   

शब्द, अर्थबोध, (नव)रस, छन्द आणि सकलमंगलकारक देवी सरस्वती आणि गणरायाला मी वंदन करतो


भवानीशंकरौ वन्दे श्रध्दाविश्वासरूपिणौ 

याभ्यां विना पश्यन्ति सिध्दा: स्वान्त:स्थम्ईश्वरम्   


श्रध्दा आणि विश्वासाचे प्रत्यक्ष रूप असलेल्या श्रीपार्वती आणि भगवान् श्रीशंकरांना मी वन्दन करतो.या दोघांशिवाय सिध्द मंडळीदेखील हृदयस्थ ईश्वराचे  दर्शन घेऊ शकत नाहीत


वन्दे बोधमयं नित्यं गुरूं शंकररूपिणम्   

यमाश्रितो हि वक्रोsपि चन्द्र: सर्वत्र वन्द्यते   


ज्ञानमय, नित्य, शंकररूपी गुरूंना मी वन्दन करतो,ज्यांचा आश्रय घेतला की डागाळलेला  चंद्रही सर्वत्र वंदनीय ठरतो


सीताराम-गुणग्राम-पुण्यारण्य-विहारिणौ   

वन्दे विशुध्दविज्ञानौ कवीश्वर-कपीश्वरौ   


श्री सीता-रामचंद्रांच्या सत्वगुण-समुच्चयरूपी पवित्रवनांत विहार  करणाऱ्या कविश्रेष्ठ वाल्मिकी आणि कपिश्रेष्ठ  हनुमंतांना मी वंदन करतो.


उद्भव-स्थिति-संहारकारिणीं क्लेषहारिणीम्  

सर्वश्रेयस्करीं सीतां नतोsहं रामवल्लभाम्    

उत्पत्ती, स्थिती (पालन) आणि संहार करणारी,दु:-क्लेष हरण करणारी आणि सर्वमंगलकरणारी अशा श्रीरामचंद्रांच्या प्रियोत्तमेला मी सादर नमस्कार  करतो


ज्या मायेच्या अधिपत्त्याखालीं संपूर्ण विश्व,ब्रह्मादि देवता आणि असुर आहेत, जिच्या सत्तेनें दोरीवरील सर्प दिसावा तसे सर्व दृष्य जगत् खरे असल्याचा  आभास होतो आणि जिचे केवळ चरण ही  भवसागर तरून जाण्याची इच्छा धरणाऱ्यांसाठी एकुलती एक   नौका आहेत, या सर्वकारणांचे’ ‘महाकारण’  असलेले प्रभू रामचंद्र या नांवानेओळखले जाणाऱ्या श्री हरिप्रत मी वंदन करतो. (मूळ श्लोक असा आहे - “यन्मायावशवर्त्तिविश्वमखिलं ब्रह्मादि देवासुरा यत्सत्त्वादमृषैवभाति संकलं रजौ यथाहर्भ्रम: यत्पादप्लवमेकमेवहि भवाम्भोधे स्थितीर्षावतां वन्देsहंतमशेषकारणपरं रामाख्यमीशं हरिम् ” ) 


नानापुराणा निगमागम सम्पतं यद रामायणे निगदितंक्वचिदन्यतोsपि

स्वान्त:सुखाय तुलसीरघुनाथगाथा-भाषानिबन्धमतिमंजुल मातनोति   

(अनेक पुराणें, वेद नि शास्त्रसंमत तसेच इतरही अनेक उपलब्ध  कथांचा आधार घेत तुलसीदास आपल्या स्वत:च्या अंत:करणाला आनंद मिळावाम्हणून अत्यंत सुमधुर भाषेंत श्रीरामचरित्र सांगतआहेत.) !! 


(दोहा)-   जो सुमिरत सिधि होइ गननायक करिबरबदन

           करउ अनुग्रह सोइ बुध्दि रासि सुभ गुनसदन   १॥

(ज्यांचे स्मरण करतांच सर्व कार्यें सुफलित होतात,जे सर्व गणांचे स्वामीसुंदर गजमुखाचे, बुध्दिची राशी  आणि शुभ गुणांचे धाम असलेले श्री गजानन माझ्यावर कृपा करोत). 


         “मूक होइ बाचाल पंगु चढइ गिरिबर गहन  

         जासु कृपा सो दयाल द्रवउ सकल कलिमलदहन २॥

(ज्यांचे  कृपेने गूंगा-मुका मधुर बोल बोलू लागतो, पंगु पर्वतावर  चढू शकतो त्या कलियुगातील सर्व पापें जाळून टाकणाऱ्या दयाळू भगवंताने माझेवर कृपा करावी ). 


         “नील सरोरूह स्याम तरून अरून बारिजनयन

          करउ सो मम उर धाम सदा छीरसागरसयन३॥

(नीलकमलाप्रमाणें श्यामवर्ण असलेले , पूर्णविकसित रक्तवर्ण कमलाप्रमाणे ज्यांचे नेत्र आहेत आणि जे कायम क्षीरसागरांत शयन करतात, ते भगवान् नारायण माझे हृदयांत निवास करून राहोत ). 


          “कुंद इंदुसम देह उमारमन करूना अयन  

          जाहि दीन पर नेह करउ कृपा मर्दन मयन४॥

(ज्यांचे अंग कुंदकळ्या आणि चंद्रम्याप्रमाणे शुभ्र आहे, जे देवी पार्वतीचें प्रियकर आणि दयासागर आहेत, जे दीनदुबळ्यांवर स्नेह करतात, ते कामदेवाचे  मर्दन करणारे  श्री शंकर मजवर कृपा करोत ). 


          “बंदऊं गुरूपदकंज कृपासिंधु नररूप हरि  

           महामोह तम पुंज जासु पचन रबि करनिकर  ५॥

(मी त्या सद्गुरूंना वन्दन करतो, जे कृपासागर आणि देहधारी  भगवंतच आहेत आणि ज्यांची वचनें सूर्य-किरणां प्रमाणे भ्रांतिरूप अंध:काराचा  नायनाट करतात ). 


          “बंदऊं गुरूपद पदुम परागा सुरूचि सुबाससरस अनुरागा

         अमिअ मूरिमय चूरन चारू समन सकलभव रूज परिवारू १॥

(मी सद्गुरू चरणांच्या धूलिकणांना वन्दन करतो, जे स्वादिष्ट, सुगंधित अनुराग-रसाने परिपूर्ण आहेत. ते संजीवन-मुळीचे जणूं सुंदर चूर्ण आहेत जे भव-रोगाच्या संपूर्ण कुटुंबाला नेस्तनाबूद करते ). 


सुकृति संभु तन बिमल बिभूती मंजुर मंगल मोदप्रसूती  

जन मन मंजु मुकुर मल हरनी किएं तिलक गुनगन बस करनी २॥ 

(ते धूलितण परम पुण्यवान पुरूष श्री शंकरांचे अंगांवर चर्चित विभूति होत, जे अतिसुंदर कल्याणप्रद आनंदाची प्रत्यक्ष जननी आहेत. ते धूलिकण भक्तांच्या मनरूपी आरशावरील मळ धुवून  काढणारे आहेत. त्या धूलिचा कपाळावर टिळा लावला की सर्व त्रिगुणांवर हुकुमत गाजवता  येते ). 


श्री गुरूपद नख मनि गन जोती सुमिरत दिब्यदृष्टि हियं होती  

दोन मोह तम सो सप्रकासू बडे भाग उर आवइजासू ३॥ 

(सद्गुरूंचे चरणांवरील नखाची ज्योत रत्नांच्या दीप्तिसारखी  आहे, जिचे स्मरण करतांच अंत:करणात  दिव्य दृष्टिचा उदय होतो. तो प्रकाश अज्ञानरूपी अंध:काराचा नाश करतो. असा ज्ञानप्रकाश ज्याचे हृदयांत प्रकट होतो तो पुरूष खरोखर भाग्यवान् होय. )  


उधरहिं बिमल बिलोचन ही के मिटहिं दोष दुःखभव रजनी के  

सूझहिं राम चरित्र मनि मानिक गुपुत प्रगट जहं जोजेहि खानिक ४॥

(तो प्रकाश अंत:करणांत प्रकट होताच हृदयांतील निर्मळ नेत्र    उघडतात आणि प्रपंचातील दु: दोष नाहीसे होतात. श्रीराम चरित्र ऐकत असतांना खाणींतील गुप्त माणिक रत्ने देखील सहज दृग्गोचर होतात ). 

क्रमश:…..


Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?