Monday, November 03, 2025

 

तुझे गीत गाण्यासाठी….!

 तुझे गीत गाण्यासाठी…….!


आज सकाळी पुणे आकाशवाणीवर एकाहून एक सरस गीतें तसेच छान चिंतन ऐकले. वास्तविक आजचे मंगलाताईंचे  विचार लक्षपूर्वक ऐकण्यासारखेच होते कारण त्यात त्यांनीऐकण्यावरसर्व भर दिला होता ! ते असो

मला आज भावले नि नंतर सतत मनांत गुणगुणत राहिले ते सदाबहार गीत चिरतरूण मंगेश पाडगावकरांचे आणि तितक्याच तोलामोलाने सुधीर बाबू्ंनी गायिलेले - ‘तुझे गीत गाण्यासाठी….. ‘ हे छान शब्द-सूर-लय नि ताल सांभाळणारे मधुर गाणे ! खरंच चांगल्या गीताचे उत्कृष्ठ गाणे कसे करावे याचा सुंदर वस्तुपाठ जणूं. मागे एकदा मी सांगितलाय्  एक किस्सा, जेव्हा पं. उपेंद्र भटांनी पुलंची तारीफ केलीइंद्रायणी कांठीलिहिल्याबद्दल. तेव्हा पु.. म्हणाले होते की अरे भीमसेनच्या हातावर मी बर्फाचा गोळा ठेवला आणि त्याने त्याचा हिमालय केला

अगदी तसेच मला जाणवतेय्तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊं देहे गीत ऐकताना

सर्वप्रथम त्या शब्दांचा मागोवा घेऊया


तिन्ही लोक आनंदाने भरुन गाउं दे 

तुझे गीत गाण्यासाठी सूर लावुंदे 


शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा

रानफुले लेवुन सजल्या या हिरव्या वाटा


या सुंदर यात्रेसाठी मला जाउं दे

तुझे गीत गाण्यासाठी सूर लावुंदे


मोर केशराचे झुलती पहाटेस दारी

झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी


सोहळयात सौंदर्याच्या तुला पाहु दे 

तुझे गीत गाण्यासाठी सूर लावुंदे 


शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे

तुझे प्रेम घेउन येती गंध धुंद वारे


चांदण्यात आनंदाच्या मला न्हाउ दे 

तुझे गीत गाण्यासाठी सूर लावुंदे 


एक एक नक्षत्राचा दिवा लागताना

आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना


पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे 

तुझे गीत गाण्यासाठी सूर लावुंदे 

तुझे गीत गाण्यासाठी ! !”       


यांवर अधिक काहीही बोलणे, लिहिणे अप्रस्तुत ठरू नये म्हणून वेळीच थांबतो

रहाळकर

नोव्हेंबर २०२५     



Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?