Thursday, November 27, 2025

 

प.पू.टेंबेस्वामी विरचित दोन स्तोत्रें !

 थोरले महाराज ऊर्फ  परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती अर्थात टेंबेस्वामींनी मराठी आणि संस्कृत भाषेत प्रचंड स्तोत्र-निर्मिती केली. त्यांतील अनेक स्तोत्रें दत्त-संप्रदायातील भक्तगण दररोज पठण करतात. त्या भल्यामोठ्या खजिन्यातून काही निवडक स्तोत्रें एकत्र छापून प्रसिद्धही केली गेली आहेत. आज तीं पुन्हा लिहून काढावीशी वाटली कारण त्यामुळे किमान तीन वेळां त्यांचे पठण केल्यासारखे होईल ! मी एकटा कधीच काहीही करत नसल्याने तुम्हां सुहृदांना बरोबर घ्यावेसे वाटले. असो



श्रीगणेशदत्त गुरूभ्योनम:

अत्रिपुत्रो महातेज: दत्तात्रेयो महामुनि:

 तस्य स्मरणमात्रेण सर्वपापै: प्रमुच्यते ।।

 ‘अनुसूयात्र्रिसंभूतो दत्तात्रेयो दिग्मबर:

 स्मर्तृगामी स्वभक्तांनाम् उद्धर्ता भवसंकटात् ।।


सर्वप्रथम लक्ष वेघून घेते तेचित्तस्थैर्यकरं स्तोत्रम् ! ते असे आहे

अनसूयात्रिसंभूत दत्तात्रेय महामते / सर्वदेवाघिदेव त्वं मम चित्तं स्थिरीकुरू //// 

   शरणागत दीनार्त तारकाsखिलकारक / सर्वचालक देव त्वं मम चित्तं स्थिरीकुरू //// 

   सर्वमंगलमांगल्य सर्वाघिव्याधिभेषज / सर्वसंकटहारिन् त्वं मम चित्तं स्थिरीकुरू //// 

   स्मर्तृगामी स्वभक्तांना कामदो रिपुनाशन: / भुक्तिमुक्ति प्रद: सत्वं ममचित्तं स्थिरीकुरू //// 

   सर्वपापक्षयकरस् तापदैन्यनिवारण: / योsभीष्टद: प्रभु: त्वं मम चित्तं स्थिरीकुरू //// 

   एतत्प्रयत: श्लोकपंचकं प्रपठेत्सुधी: / स्थिरचित्त: भगवत्कृपापात्रं भविष्यति //// 


इति श्री .पू. श्रीवासुदेवानंदसरस्वतीविरचितं चित्तस्थैर्यकरं स्तोत्रं संपूर्णम् “ 


दुसरे स्तोत्र आहे संकट-विमोचनार्थ - ‘संकष्टहरण स्तोत्रम्. ते असे

श्रीपाद श्रीवल्लभ त्वं सदैव श्रीदत्ताsस्मान् पाहि देवाधिदेव भावग्राह्य क्लेशहारिन् सुकीर्ते घोरात्कष्टाद् उद्धरास्मान् नमस्त।।१।।

त्वं नो माता त्वं पिताssप्तोsधिपस्वत्वम् त्वं सर्वस्वं नोप्रभो विश्वमूर्ते घोरात्कष्ठात उद्धरात्मान् नमस्त ।।२।।

पापं तापं व्याधिमाधि दैन्यं भीतिं क्लेशं त्वं हराsशुत्वदन्यम् त्रातारं नो वीक्ष ईशास्तजूर्ते घोरात्कष्टात् उद्धरास्मान्नमस्ते ।।३।।

नान्यस्त्राता नापि दाता भर्ता त्वत्तो देव त्वं शरण्योsकहर्ता कुर्वात्रेयानुग्रहं पूर्णराते घोरात्कष्टात् उद्धरास्मान् नमस्ते ।।४।।

धर्मे प्रीतिं सन्मतिं देवभक्तिं सत्संगप्रातिं देहि भुक्तिं मुक्तिम्। 

भावासक्तिं चाखिलानन्दमूर्ते घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते।।५।।

श्लोकपंचक एतद्यो लोकमंगलवर्धनम् / प्रपठेन्नियतो भक्तया श्रीदत्तप्रियो भवेत् //


इति श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य श्रीवासुदेवानन्द सरस्वती यतिविरचित घोरकष्टोद्धरण स्तोत्रं सम्पूर्णम् // “ 


ता.

मंडळी, हे श्लोक तोंडपाठ असले तरी ते लिहून काढणे अजिबात सोपे नाही याची पुन्हा प्रचिती आली ! यातही अनेक चुका असणे शक्य आहे, सबब भूलचूक लेनीदेनी ! ! 

रहाळकर

२७ नोव्हेंबर २०२५.   



Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?