Wednesday, October 22, 2025

 

तुम इतना जो…..!

 तुम इतना जो……! 


कालपासून एक छान गझल सतत कानांवर पडत गेली आणि वाटलं काहीतरी चांगलं लिहिलं जावं म्हणून कदाचित ती भुणभुण करीत असावी

मुळांत त्या ओळी आहेत, ‘तुम इतना जो मुस्कुरा रहे हो - क्या गम है जिसको छिपा रहे हो’ ! 

अचानक आठवलं एक नाट्यचित्र ज्यात एकाच मुखवट्याच्या अर्ध्या भागात हसूं नि दुसऱ्यात आंसू दाखविले होते. एखादे लहान बालक भोकाड पसरून रडत असताना त्याच्या पुढ्यात त्याला आवडणारे खेळणे ठेवले तर तो कसा खुदकन् हसायला लागतो, अगदी तसेच नियती आपल्याशी असा लपंडाव सतत खेळत असते

खरंतर अश्रू आणि गाणें यांचे विलक्षण नातें असावे. ‘डोळ्यांमधले आंसू पुसती ओठावरले गाणेकिंवामाझ्या अश्रूंत गाणें येईल, तुझ्या गाण्यांत अश्रू राहीलया पाडगावकरांच्या पंक्ती बरेच काही सांगून जातात


दुसरं असं की चेहऱ्यावरचे हास्य अंतरंगातली खळबळ किंवा औदासिन्य कितीही लपवूं पाहील तरी त्या व्यक्तीचे डोळे खूप काही सांगून जातात. लक्षपूर्वक आणि आपल्या संवेदना जाग्या ठेवून पाहता आलं तर समोरच्या व्यक्तीची लपवलेली व्यथा लक्षात येऊ शकते

खूप खूप वर्षांपूर्वी, कदाचित सत्तर पंचाहत्तर, एक अप्रतिम मराठी सिनेमा पाहिला होताअबोलीनांवाचा. जन्मत: मुकी असलेल्या त्या मुलीचे काम करणाऱ्या नटीने निव्वळ डोळ्यांच्या उघडझापीने आपल्या भावना अतिशय सुंदर पद्धतीने साकारल्या होत्या. फार जुनी कशाला, नुकतीच किमान वीस वेळा पाहिलेलीशंभरावं स्थळही लघु फिल्म पाहतांना शेवटल्या तीनचार मिनिटात अनुजा ऊर्फ दीप्ती देवी केळकरने निव्वळ डोळ्यांच्या हालचालींनी बहार आणलेली पाहता येईल

विषयांतर बहू जाहले, क्षमस्व

रहाळकर

२२ ऑक्टोबर २०२५   


Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?