Saturday, October 04, 2025

 

इन्दौरी भुक्कड !

 इन्दौरी भुक्कड’ ! 


थांबा, ही कोणतीही शिवी नाही तर अनेक अर्थ काढतां येतील असाभुक्कडहा शब्द आहेया शब्दाचे विविध अर्थ किंवा उपयोग सांगण्या आधी जे कोणी स्वत:ला अस्सल खवैय्ये समजत असतील त्यांच्यासाठी एक खुशखबर देतो

आमच्या बावधन महानगरातील एनडीए पाषाण स्ट्रीटवर घरापासून जवळच एकजॉइंटसुरू झालाय नुकताच. ज्या कुणी इंदोरच्या सराफा बाजार मधल्या, विशेषत: रात्री नऊ नंतर फुलत जाणाऱ्या खाऊ-गल्लीबद्दल ऐकले-वाचले-अनुभवले असेल त्याचेसाठी ही एक गोड जाहिरात समजायला हरकत नाही

आता भुक्कड या शब्दाची किंचित चीरफाड. भुक्कड म्हणजे खरंतर बेक्कार, फालतू, टाकाऊ वगैरे. भुक्कड म्हणजे भुकेने व्याकूळ हपापलेला वगैरे तर भुक्कड म्हणजे सतत भुंकत राहणारा देखील ! याच भुक्कड शब्दातहे अक्षर घुसडले तर ते होते भुलक्कड, विसराळू वगैरे

असो.

आम्ही आज प्रथमच त्या दुकानाला भेट देऊन आलो. सुजाता मस्तानीच्या शेजारचेच विकान आहे बरं का हे. दोन तीन लहान लहान टेबलं नि खुर्च्या असल्या तरी इन्दौरच्या सराफा बाजारात तशी सोय नसते बरं का. उभ्या उभ्या किंवा चालत फिरत खात फिरतात लोगबाग. तथापि आपण सुसंस्कृत पुणेकर पुडे बांधूनटेक् अवेचपसंत करतील हे माहीत आहे मला !

रहाळकर

अक्टूबर २०२५     


Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?