Monday, September 15, 2025
झाडाचं खोड !
झाडाचं खोड !
काल दुपारी नजीकच्या एका भल्या मोठ्या पार्कवर गेले होतो सर्वजण. पार्क कसला, चांगले मोठ्ठे रान होते ते, अतिशय घनदाट, हिरवेगार, शेकडो झाडें नि झुडुपांनी विनटलेले. मात्र मधोमध एका विशाल वाळक्या झाडाच्या खोडाने लक्ष वेधून घेतले. किमान सत्तर ऐंशी वर्षांपूर्वी हा विशाल वृक्ष बहरांत असणार. या मोठ्ठ्या खोडाबद्दल कुतुहल वाटले आणि श्रीशला खालील फोटो काढून घ्यायला सुचवले. माझ्या उंचीच्या तिप्पट मोठे आहे हे खोड, झकासपैकी जपून ठेवलेले.
हे दृष्य पाहून माझ्या मनांत खूपसे विचार तरळून गेले. मात्र ते साझा करण्यापूर्वी तुमच्या मनात काय आले ते कळवलेत तर आणिक मजा येईल. पहा काही सुचतंय् का ते !
रहाळकर
१४ सप्टेंबर २०२५.