Wednesday, September 10, 2025

 

हरफनमौला !

 हरफनमौला


हरफनमौला म्हंजे ज्याक् ऑफ ऑल ट्रेड्स् म्हंजे हरहुन्नरी म्हणजेच बहुआयामी अर्थात् विलक्षण प्रतिभावान् ! आता तरी कळला की नाही हरफनमौलाचा नक्की अर्थ ? एक उत्तम उदाहरण द्यायचं तर पुलंचानारायणआठवून पहा, कोणाच्याही लग्नसमारंभांत कायम पडद्यामागची आणि पडद्यापुढचीही सर्व कामें बिनबोभाट, बिनतक्रार, कुरकुर करता, हसतमुखाने धावतपळत करणारा नि स्वत:च्या बायको-पोरालाही तात्पुरते विसरून पडतील ती कामे उरकत जाणारानारायणनाsरायण


आपल्या अंवतीभोवती अशी कलंदर माणसं खरंतर वावरत असतात. मात्र त्यांना शोधून काढण्याचं कसब माझ्यासारख्या तिरळ्या प्रभाकराच्याच प्राक्तनांत असतं. ( तिरळा, अर्थात तिरप्या डोळ्यांचा प्रभाकर कोण म्हणून विचारतां ? चंद्रकांत काकोडकर कधीच वाचले नाहीत की  काय तुम्ही ? त्यांत या पात्राबरोबर गायतोंडे वगैरे गोवॅनीज नावांची रेलचेल असे ! ) असो


तर हरफनमौला ! जुन्या काळीं एकच डॉक्टर सर्व प्रकारचे आजार  पाहतापाहतां रिपेअर  करून देत असे, एखादा मेक्यानिक सर्व प्रकारची वाहने व्याधिमुक्त करून देई, एकच गवंडी घर बांधणीपासून डागडुजीपर्यंत सगळे कौशल्य बाळगून असे, एकच स्वयंपाकीण किंवा आचारी ( अय्या ! ) सगळे पाक-कौशल्य पणाला लावत असे. कारण यांतला प्रत्येकजणहरफनमौलाअसे ! आता नक्कीच समजला असेल तुम्हाला हा शब्द


आमच्या तिकडे, म्हणजे इंदोरबिंदोर च्या प्रदेशात कुणा तिऱ्हाइताचे कौतुक करावेसे वाटले तर त्याला हरफनमौला ही पदवी सहज बहाल करीत तिथल्ल्ले लोक. आताइकडच्यालोकांनी असा झक्कास शब्द शोधून काढलाच तर तो माझेसाठी वापरायला मागेपुढे पाहू नका बरे का

रहाळकर

१० सप्टेंबर २०२५     


Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?