Monday, September 29, 2025

 

What is Paramarth (परमार्थ ) ?

 What is Paramartha (परमार्थ) 

Saints use single word ‘Paramartha’ for the three-some ‘Brahmam’, ‘Brahma-Jnyana’ and ‘Brahma-Sadhana’. Moreover, the word Paramartha consists of two words, ‘Param’ and ‘Artha’. One can easily understand exact meaning of ‘Paramartha’ when one tries to understand their inner meanings. 

A). Param means ‘the best’ and Artha means that which is to be known! A being may be able to thrive without food and water for once but he cannot live even for a moment without ‘experience’. Indeed, innumerable things worth knowing invade his experience. However, all of those are not of the same qualification. To find the best among those amounts to ‘Paramartha’! The enlightened ones (Atma-Jnyani) and Siddhas (Realised ones) possess unanimous and clear opinion of Brahmam being Best Thing to be ‘Known’!

 

B). Param means ultimate and Artha means its implied meaning, purport. A being knows, understands something; that means he understands its meaning. Entire human knowledge is indeed in the form of meaning. It revolves around the being and the world. Great poets, dramatists and scientists strive to understand the meaning of human life and the meaning of the visible world. They understand barely half of it. Only those Brahma-Jnyanis that possess experience of the Self understand the full meaning. Therefore, Knowledge possessed by Saints is verily Paramartha!

 

C). Param means incomparable, unique, excellent and Artha means aim or goal. The value of an object or thing is commensurate with the extent to which that object or thing has meaning. The worldly things do not possess full meaning; therefore, those do not have full value. The Brahma-Vastu (Brahman) has complete meaning and therefore it is extremely valuable. A being naturally likes a valuable ‘thing’; it becomes his aim, an obsession to earn it! Therefore, earning Brahma-Vastu is the best goal of a being and the Sadhana (spiritual practices) required to attain that is verily Paramartha!

 

D). Param means the final, eventual, ultimate and incomparable and Artha means the reason, motive, basis. The Universe that we experience is eventful and action-packed, an ocean of unending happenings. Human intellect is such that it does not rest content unless it unearths the root cause or basis of the event. Indeed, such attitudes towards search and research breed Religion, Logic, Reasoning and Science. Man is not content on discovering reasons for a few events since he cannot! He is obsessed with the thought of knowing the cause of everything that happens, that is, the very cause of the entire universe!

The Primordial Cause of the Universe is known as Divinity or Eeshvar; and Paramartha or Spirituality is the search of Eeshvar or Divinity.

 

E). Param means principal, the best and Artha means riches, wealth or fruit. Man requires wealth for fulfilling his needs. However, needs remain unending even while one keeps fulfilling those. Therefore, man runs after amassing lots and lots of wealth that is what economics proclaims. A common man regards the King to be happy by virtue of immense wealth the king possesses. Nevertheless, the King is not satiated with the impermanent wealth in this world. On the contrary, Saints who earn permanent wealth in the form of Brahman are happy and contented; they do not value even monarchy against it!

 

Sri Samartha out of his own experience very emphatically states, “the spiritual being is indeed the Monarch and the one who lacks it a pauper”! Therefore, life spent proudly in the affluence of detachment and selfless ness attains extreme satisfaction and bliss; and that exactly is ‘Paramartha’!

Any form of Knowledge (Jnyana) is powerful. Therefore, gaining   Knowledge of the Divine, thereby annihilating entire unhappiness and sufferings is indeed true characteristic of ‘Paramartha’!


(Adapted from Sri Dasbodh)

Dr. P. S. Rahalkar

29 September 2025      



Saturday, September 27, 2025

 

लीगसी - Legacy !

  लीगसी - Legacy - एक सांस्कृतिक वारसा


आज  काही नातेवाईक मुद्दाम भेटायला घरी आले होते. त्यांतील एका सात वर्षाच्या मुलीनेलीगसीम्हणजे काय ते सांगाल काय अशी पृच्छा करून सर्वांनाच बुचकळ्यात टाकले आणि विचार करायला भाग पाडले. कुणी त्याचा डिक्श्नरी अर्थ सांगितला तर कुणी अन्य काही. कायद्यानुसार वहिवाटीने मिळणारी रकम किंवा प्रॉपर्टी असा जरी शब्दश: अर्थ असला तरी आपण सहज संभाषणांत या शब्दाला वहिवाटीने  मिळालेले संस्कार किंवा सांस्कृतिक वारसा अशा स्वरूपात वापरत असतो


तर मग हासांस्कृतिक वारसाम्हणजे नक्की काय असेल हो ? आपल्याला माहीत आहे की कित्येक प्रकारच्या कला, मग त्या सांगीतिक असोत, चित्र-शिल्प असो, साहित्यिक क्षेत्रातल्या किंवा चक्क न्याय-व्यवस्थेतल्या. बऱ्याच बाबतींत पिढ्यानपिढ्या चालत येणारा वारसा असतो तो. आणि प्रत्येक क्षेत्रात अशी नामवंत घराणी सहज सापडू शकतील

मला आत्तां प्रकर्षाने याद येते आहे स्व. ताराशंकर बंद्योपाध्याय यांचे एक सुंदर पुस्तक - आरोग्य निकेतन’. त्यात त्यांनी किमान तीन पीढ्यांच्याकविराजीवारश्याचा सुरेख मेळ घातलेला आढळेल. अशी अन्य कितीतरी उदाहरणे आपण प्रत्यक्ष पाहात नि ऐकत आलेले आहोत. तसा सांस्कृतिक वारसा किंवा लीगसी कदाचित जन्मजात असली तरी ती प्रत्यक्ष अनुभवाच्या बळावर अधिक तेजाने, अधिक जोमाने वृद्धिंगत होत असावी. अर्थात काही वेळां ती जमीनदोस्त होतानाही आपण पाहिली असेल

मला कौतुक वाटलं त्या चिमुरडीचे जिने शाळेत कधीतरी ऐकलेल्या शब्दावर अधिक जाणून घेण्याची इच्छा बाळगली. शाब्बास शनाया

रहाळकर

२७ सप्टेंबर २०२५.    


Monday, September 22, 2025

 

वन् किमी वॉक् !

 वन् किमी वॉक…….!


आज सकाळी फेरफटका मारत असताना कोपऱ्यावरच्या घरात राहणाऱ्या एका वृद्धेची गाठ पडली. श्रीशने त्यांची ओळख करून देताना सांगितले की त्या रिटायर्ड जी. पी. म्हणजे एकेकाळी इथल्या एन् एच एस् अर्थात नॅशनल हेल्थ स्कीमच्या माजी डॉक्टर आहेत. साहाजिकच त्यांच्याशी पाच सात मिनिटे संवाद घडला. नुकतीच नव्वदी पार केलेली ती लेडी डॉक्टर विलक्षण शांत चित्त, सोज्वळ आणि बुद्धिमान जाणवली. मूळची वेल्श असलेली म्हणजे वेल्स या ब्रिटनच्या पश्चिम भागातील पण अवघे आयुष्य लंडनभरातल्या विविध हॉस्पिटल्स आणि ओपीडीत सेवा दिलेली होती. एक डॉक्टर असल्याचा सार्थ अभिमान आणि आनंद तिने बोलून दाखवला. दररोज चुकता ती सकाळ-संध्याकाळी एकएक किमी चालण्याचा परिपाठ पाळत आलेली आहे


तिच्या चेहऱ्यावरचा शांत प्रसन्न भाव खरोखर वाखाणण्यासारखा होताच पण डॉक्टर म्हणून केलेल्या सेवेने तिचे खूप समाधान झाल्याचे तिने आवर्जून सांगितले. मी जेव्हा तिला म्हटले की मी एकोणीसशे सहासष्ट साली एमबीबीएस झालो तेव्हा तिने मी एकोणसाठ साली झाले असे प्रत्युत्तर दिलेअर्थातच या जुजबी संभाषणांत तुम्हाला रस नसणार म्हणून या लेखाची मूळ संकल्पना आता सांगणार आहे, कृपया वाचत रहा

लेखाचा मायना पुन्हा एकदा पाहून घ्या, ‘वन् किमी वॉक्’ ! किती किती महत्वाचं आहे हे सूत्र. किमान एक किमी चालणे प्रत्येकाला आवश्यक आहेच पण सेवानिवृत्तांसाठी तर ते अधिकच. साठ-सत्तरीनंतर चालणे हा सर्वोत्कृष्ठ व्यायाम असल्याचे सर्वच सांगतात, मात्र त्यातील सातत्य अतिशय महत्वाचे आहे. चालता चालतां अनेक विचार मनात येत राहतात, कधी एखादे छानसे गाणे गुणगुणावेसे वाटते, कधी नुसते नामस्मरण आपसूक घडत राहते प्रत्येक पावलागणिक

हे सर्व करत किंवा घडत असताना एक बाब जाणीवपूर्वक करून पाहावी. समोरून येणाऱ्या व्यक्तीला निदान स्मितहास्य द्यावे, ओळखपाळख नसली तरी कसे आहात, केम छो म्हणावे, जय श्रीराम किंवा तत्सम शब्दाने अभिष्टचिंतन करावे. अगदीच तिऱ्हाईतासारखे वागणे टाळावे. अखेर माणसा-माणसातला साधा शिष्टाचार महत्वाचा नाही काय ? सतत फोनमधे पाहात राहणे बरे नव्हे. आजूबाजूच्या वातावरणाचा आनंद घ्यावा. मला स्वत:ला ओसाड रस्त्याने चालायला अजिबात आवडत नाही. पुरेशी वर्दळ तर हवीच पण गोंगाट सहसा नसावा असे वाटत राहते


त्या वृद्ध डॉक्टर आजींकडे पाहून मनस्वी आनंद झाला याचे आणिकही कारण आहे. त्यांचा शांत प्रसन्न चेहरा, अगत्यशील बोलणे, स्वकर्तृत्वाचा सार्थ अभिमान नि समाधान या सर्वच बाबी खूप भावल्या मला आणि निदान एवढे तरी तुमचेपर्यंत पोहोचवावेसे वाटले

कशी झाली गम्माडीगम्मत ?

रहाळकर

२३ सप्टेंबर २०२५.   


This page is powered by Blogger. Isn't yours?