Monday, August 25, 2025

 

चर्चिलचे गांव !

  चर्चिलचे गांव


आज आम्ही एक दिवसीय सहल काढून सर विन्स्टन चर्चिलच्या मूळ गावींवेस्टरहॅमयेथे धावती भेट दिली. साहाजिकच चर्चिलच्या भव्य पुतळ्याजवळ उभे राहून काही स्नॅप्स देखील घेतले. मला गेले काही दिवस इंग्लंड मधल्याकंट्रीसाईडअर्थात ग्रामीण भागाला पुन्हा एकदा पाहण्याची उत्सुकता लागली होती, जी आज अनायासें पूर्ण झाली


माझे ग्रामीण भागाविषयीचे कुतुहल किंवा आकर्षण नवे नाही. सर्व आयुष्य शहरात व्यतीत झाल्यामुळे असेल कदाचित्, खेड्यापाड्यांचे अप्रूप मला कायम खुणावत असते. अर्थात शहरांतील सोयी-सुविधा तिथे नसल्या तरी ग्रामीण जीवनातील सहज साधे मोकळेपण कुठेतरी घर करून राहिले आहे मनात


खूप लहानपणी वडिलांच्या तोंडून आदर्श खेड्यांची संकल्पना ऐकली होती. वडील सरकारी नोकरीच्या निमित्त नेहमीच ग्रामीण भागांत दौऱ्यावर जात आणि सुट्यांदरम्यान आम्हीही त्यांचे बरोबर जात असूं. त्यामुळे असेल कदाचित्, खेडुतांशी संवाद साधायला मला अजूनही आवडते. आज सुद्धा येथील शेतकरी किंवा रहिवासी आपले दैनंदिन व्यवहार कसे पाळत असतील याची उत्सुकता अद्याप शमलेली नाही. असो


आजची वेस्टरहॅम येथील सहल खूप भावली कारण लंडनपासून अवघ्या तासावर हे गाव वसलेले आहे. मूळ मोठाले रस्ते मागे टाकतबी रोडवरून जातांना घनदाट अरण्यवजा लांबच लांब वृक्षराजींनी मोहून टाकले खरे. कितीतरी वेळा मला कोकणातील दापोली भागाशी यांची तुलना करावीशी वाटली. वेस्टरहॅम हे इटुकले गाव तसे एकाचहाय स्ट्रीटचेपण कित्येक कॅफेज , पब्ज, दुकाने, बारबर शॉप्स, ॲन्टीक दुकान, फार्मसी निसर्जरीयुक्त. रविवार असल्याने बऱ्यापैकी वर्दळ. अर्थातच मला हवा तो ग्रामीणटचनदारत. गांव नव्हे मिनि शहरच निघाले हे. तरीही नजरेसमोर सतत येत होते वीस वर्षांपूर्वी आम्ही भेट दिलेले पीक-डिस्ट्रिक्ट यॉर्कशायर मधलेस्प्रिंगडेलहे खेडेगाव. मुलांची नजर चुकवून त्या खेड्याचा मनसोक्त मुआयना केला होता मी आणि प्रचंड प्रचंड आवडले होते मला ते खेडेगाव ! गावाच्या मधोमध वाहणारा झुळझुळणारा स्वच्छ पाण्याचा झरा, त्यावर कमानीसारखे सुंदर पादचारी पूल, अख्खे गांव सुंदर सुंदर फुलांच्या ताटव्यांनी अक्षरश: गजबजलेले, तुरळक माणसें शतपावली करणारी किंवा पब् मधे निवांत विसावलेली, दैनंदिन गरजेची सर्व लहान लहान दुकाने, इतकेच नव्हे तर लहानसे फायर ब्रिगेड स्टेशन देखील ! इटुकले गाव असूनही रस्त्यांवर ट्रॅफिक सिग्नलचे कार्यरत दिवे पाहून चकित झालो होतो खरा ! त्यावेळी कुणाशीच संवाद असा साधता आला नव्हता कारण माझे तोकडे इंग्रजी संभाषण चातुर्य

तथापि, आम्ही आंबोली मार्गें कोकणात उतरत असतांना आंबोली नजीकच्या मळ्यावर अम्मळ विसावत आणि तिथला रानमेवा चाखत मी त्या बागाईतदार शेतकऱ्याशी केलेला मनमोकळा संवाद मी कधीच विसरू शकणार नाही. आम्ही खेडोपाडीं वैद्यकीय सेवेसाठी जात असताना सुद्धा माझा खरा भर असे तो तिथल्या खेडुतांशी केलेल्या मनमोकळ्या गप्पा


आज विन्स्टन चर्चिलच्या गावीं भेट देत असताना या सगळ्या आठवणी उचंबळून आल्या यांत नवल नाही !

रहाळकर

२४ ऑगस्ट २०२५ (अजूनही लंडनमधेच )     


Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?