Sunday, July 06, 2025

 

दण्डवते काका !

 दण्डवते काका


माझ्या वडिलांचे एक अंतरंग मित्र होते शामराव दण्डवते या नावाचे जे त्यांचे शालेय शिक्षणातच नव्हे तर पुढे शासकीय सेवेतही बरोबर राहिले थोड्याबहुत अंतराने. हे दण्डवते काका आजन्म ब्रह्मचारी राहिले, हरिसिद्धी मंदिराच्या शेजारी वरच्या माळ्यावर एका खोलींत जन्मभर राहिलेले. ते कायम विडी तरी ओढत नाहीतर तपकीर. अतिशय विनोदी स्वभावाचे आणि उत्तम पत्रिका पाहणारे नि जुळवून देणारे देखील ! आमच्या लग्नाची पत्रिका त्यांनीचजुळवूनदिली म्हणतात ! ! (असो). 


वडिलांचा नि त्यांचा स्नेह इतका बळकट होता की प्रत्येक भेटीचे वेळी लगेच नि परत निघतांना ते कडकडून मिठी मारीत एकमेकांना. वडिलांची ते कायम फिरकी घेत नि घरी आल्याआल्यावैनी फर्मास चहा टाका बुवा आधीअशी हरळी देत. आमच्या आईवरही व्यंग करायला ते मागेपुढे पाहात नसत. हरिसिद्धी नजीकच्या ज्या खोलींत ते राहात असत त्याच मजल्यावरील एक मावशी त्यांचे जेवण पाठवीत असे नि त्यावरून वडील त्यांची नेहमीच चेष्टा करीत निशाम्या तिच्याशी सरळ लग्न का करीत नाहीसअशी चेष्टाही करीत. पण शामराव या बाबतींत अतिशय गंभीरपणे नकार देत म्हणत की मला तिचे सुखी जीवन बर्बाद करायचे नाही, ती माऊलीसारखी मला रोज जेवण पाठवते इतकाच तिचा माझा ऋणानुबंध आहे

इन्गौरच्या कलेक्टोरेट मध्ये वडील तहसीलदार म्हणून कार्यरत असतांना दण्डवते काका त्यांचेच हाताखाली कारकून म्हणून काम करीत असत. एकदा कुठल्यातरी कामासाठी मी अण्णांच्या ऑफिसांत गेलो होतो. अण्णा कामात व्यस्त असल्याने अण्णांनी मला बसायची खूण केली नि फाईलवर लिहीत राहिले. तेवढ्यात दण्डवते काका काही अन्य फाईल्स घेऊन अण्णांचे खोलीत आले. अण्णांनी त्या टेबलावर ठेवण्याची खूण केली. काकांनी विचारलंसर मी जाऊ’ , तेव्हा वडील कडाडले, ‘तुम्हाला खुर्चीवर बसायला बोलावलं होतं का मी ! आऊट ! ‘

मीच दिंग्मूढ झालो तो प्रसंग पाहताना आणि लक्षात आले की एऱ्हवीचे अण्णा नि काकांचे संबंध वेगळे नि ऑफिसमधे केवळ वरिय्ट-कनिष्ट असेच होते

हे सर्व आज आठवण्याचे कारण म्हणजे दुसरा एक असाच प्रसंग आठवला. आमच्या खूप जवळचे एक नातेवाईक रेव्हेन्यू कमिशनर होते आणि त्यांचा सख्खा मेहुणा त्यांचेच हपिसांत पट्टेवाला चपराशी म्हणून सरकारी नोकरीत होता. सख्ख्या बहिणीचा नवरा असूनही दोघांचे संबंध फारसे चांगले नव्हते. पट्टेवाला म्हणून मोटारीचे दार उघडून उभे राहणे, त्यांची ऑफिसची पेटी दररोज गाडीत ठेवणे नि काढणे तसेच ऑफिसच्या दाराबाहेर स्टुलावर बसून आज्ञेची वाट पाहणे, तासातासाला टेबलवरील पाण्याचा ग्लास भरून ठेवणे वगैरे अतिशय शेलकी कामे हसतमुखाने करत राहणे पाहून आम्हालाच ते दृष्य पाहून कसेनुसे होई. मात्र त्या उभयतांनी सत्य परिस्थितीशी तडजोड केल्याचे स्मरत नाही


वरील दोन्ही प्रकार मी खूप जवळून पाहिले असल्याने माझे नि माझ्या कनिष्टांचे आपसातील व्यवहार कायम सौहार्दपूर्ण आणि मैत्रीपूर्ण राहिले याचा मला सार्थ अभिमान आहे

रहाळकर

जुलाब २०२५     


Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?