Tuesday, March 25, 2025
शब्द-सामर्थ्य !
शब्द-सामर्थ्य !
आज अचानक ‘अणोरणीयं महतो महीयान्’ ही उक्ती आठवली आणि शब्द-सामर्थ्याचे नवल वाटून गेले. शब्द वापरताना ते चढत्या आणि उतरत्या दोन्ही भांजणीत कसे वापरले जातात ते पाहू.
‘आकाश-अवकाश’, ‘सागर-महासागर’), विभूती योग नि विश्वरूप दर्शन योग, व्याज नि चक्रवाढ व्याज, (अंडे नि ब्रह्मांड) वगैरे चढत्या भांजणींत मांडले गेलेत तर लहानांतले लहान असे मॉलिक्यूल-ॲटम, इलेक्ट्रॉन-प्रोटॉन वगैरे सूक्ष्मातिशूक्ष्म देखील !
या सर्वांचे स्मरण होण्याचे आणखी एक कारण श्रीविष्णुसहस्त्रनामांतले कित्येक शब्द अर्थासकट पाहू गेल्यास नक्कीच ध्यानांत येतील. त्या निर्गुण निराकार परमेश्वराचे सगुण साकार स्वरूपांत शब्दांद्वारेच तर वर्णन करता येते ना ? माणिकताई म्हणाल्या तसे द्वैत नि अद्वैत हे देखील शब्दांतूनच मांडता येते ना. एऱ्हवीं निव्वळ अनुभवाचा प्रांत असलेले सिद्घान्त समजून घेण्यासाठी सुद्धा शब्दच महत्वाचे नाहीत काय ? अगदी आपली वाणी, जी सुप्तावस्थेत परा-अपरा असलेली पश्यंति मध्यमा वैखरी या स्वरूपात मुखरित होते की शब्द स्वरूपात !
बाप रे ! लई लई भारी होत चाललंय् हे सगळं, सबब शब्दविराम देणेच उचित होय !
रहाळकर
२५ मार्च २०२५.