Sunday, February 23, 2025

 

सागर दर्शन !

 सागर दर्शन !


इंदौरचं आमचं राहातं घर सुटल्यावर बहुधा प्रथमच आम्ही केवळ भावंडं एकत्रपणे सलग पाच दिवस कोंकणातल्या सागर-किनारीं मुक्काम केला. कल्पना होती सर्वात धाकट्या बंधूची की आपण सडी भावंडें कोंकणात काही दिवस एकत्र राहूं एखाद्याहोम-स्टेमधें. मात्र लेक नि जांवयांनी उत्तमातल्या उत्तमरिसार्ट्सचे आगावू बुकिंग केले आणि आम्ही घरच्या दोन मोटारींनी तिकडे कूच केले

नुसते बुकिंगच नव्हे तर पूर्वतयारी म्हणून त्यांनी नवीन पोषाख आणिस्लिपऑनबूट खरेदी करून दिले आणि सोबत वाटेत जातायेतांना खायची प्यायची प्रचंड प्रमाणात खादाडी पियाडी  पॅकेट्स भरून दिली


अतिशय उत्साहांत नि रंगबिरंगी जर्किन बर्म्युडांमधे आमचा प्रवास सुरू झाला नि पूर्व अनुभवांच्या जोरावर मस्त भजीं आणिचायचा लुत्फ घेत मार्गस्थ जाहलों. जातांनासरपंच ॲंड सन्सया अतिउच्च शिक्षित मुलामुलींनी म्यानेज केलेले रेस्ट्रां पाहून थक्क झालो कारण विलक्षण स्वच्छ, सुंदर, सुबक  नि भव्य स्थळ निघाले तें


कोकणातल्या नागमोडी वळणदार रस्त्यांवरून सुसाट जात असताना श्रीवर्धन नजिकच्यासी-व्ह्यू रिसार्टवर डेरेदाखल झालो. अगदी सागर किनाऱ्यावरील हे आणि नंतर गाठलेले दापोली नजीकचे रिसार्ट अक्षरश: पंचतारांकित असेच होते आणि सागर दर्शन म्हणावे तर समुद्राकडे तोंड करून उभे राहिले असतां आपले दोन्ही हात आडवे पसरले तर डाव्या हाताच्या बोटांपासून उजव्या हाताच्या बोटांमधे जेवढा सागर सामावतां येईल इतका लांबच लांब सागर किनारा असलेले ! (कळले ना मला काय म्हणायचंय् ते ?) असो


दिवसा नि रात्री सागराचीभरती आणि ओहोटीसहज ओळखतां येऊं लागली, लाटांच्या कमीजास्त होणाऱ्या आवाजावरून. रात्रंदिवस सतत वाहात असलेला घोघावणारा वारा उन्हाळ्याची चाहूल सहज लपवून ठेवू शकला

केवळचिल् आऊटसाठी आलेले असल्याने दुसरे कोणतेही व्यवधान नव्हते. अधूनमधून बालपणींच्या आठवणी पुन्हा शेअर करण्या व्यतिरिक्त संवाद असा क्वचित् रंगला मात्र या सहलींत स्वत:शी स्वत:चा संवाद किंवा चिंतन भरपूर घडले इतके मात्र खरे

खरोखर खराखुरा एकान्त अनुभवायचा असेल तर सागरकिनारीं निवान्तपणे राहून यावे असे मला निश्चितपणे जाणवले खरे ! ! 

रहाळकर

२३ फेब्रुवारी २०२५.   


Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?