Wednesday, September 18, 2024

 

स्वाध्याय-यज्ञ !

 स्वाध्याय यज्ञ

विषयाचे नाव पाहून चमकलात ना, पण आज जरा एका गहन विषयावर चर्चा करूया  काय ? भगवंताने कर्ममार्गाचे अधिक सखोल विवरण करताना चौथ्या अध्यायांत विविध यज्ञांविषयी उल्लेख केला. त्यांत द्रव्य-यज्ञ, तपो-यज्ञ, योग-यज्ञ, तसेच स्वाध्याय-यज्ञ आणि ज्ञान-यज्ञाचाही आवर्जून उल्लेख येतो. अर्थात्वाग्यज्ञहा सुध्दा महत्वाचा आहेच, जिथे शब्दानेच शब्दाचे हवन म्हणजेच वेदमंत्राचे उच्चारण होते. आणि ज्ञान-यज्ञाने होणाऱ्या यज्ञाने ब्रह्म म्हणजे नक्की काय ते उलगडते.


वास्तविक यांतील सर्वच यज्ञांचे अनुष्ठान अतिशय कठीण नि दुर्घट असले तरी  ‘जितेन्ग्रियअसतील तेच अशा यज्ञांचे अधिकारी ठरतात असे माऊली सांगतात


तर मग आपल्यासारख्या सामान्य जीवांनी काय करायचे हा प्रश्न शिल्लक राहतोच की. मुळात या सर्व यज्ञांचे प्रयोजनच  काय असा आळशी प्रश्नही कुणाला पडला तर तो वाउगा म्हणता येत नाही. तरीहीमीकोण, ‘ईश्वरम्हणजे काय नि या जगाचा पसारा तरी काय म्हणून, असे विचार कधी ना कधी प्रत्येकाच्या मनात येत असणारच


अगदी थोडक्यात नि स्पष्ट सांगायचे तर ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. अर्थात मी कोण, परमेश्वर म्हणजे तरी नक्की कोण आणि हे जगडंबर कशासाठी याची उकल करणारे ज्ञान तेच आत्मज्ञान होय. इतर सर्व प्रकारचे प्रापंचिक ज्ञान याला विज्ञान अशी संज्ञा आहे. अर्थात हे सर्व तुम्हाला आधीच माहीत आहे हे मलाही माहीत आहे. तथापि विषयाच्या ओघात बोलून गेलो इतकेच. असो


तर मग तेआत्मज्ञानहोण्यासाठी काय करायला हवे ते भगवंत पुन्हा पुन्हा अतिशय कनवाळूपणे सुचवतात


मात्र त्या आधी द्रव्य-यज्ञ वगैरे ज्ञान-यज्ञापुढे किती गौण आहेत याची जाणीव करून देतात. माऊली उदाहरण देतात सूर्यापुढे जसे नक्षत्रांचे तेज सहज लोप पावते तसे इतर सर्व यज्ञ दुय्यम ठरतात


आत्मज्ञान होण्यासाठी म्हणजेचत्याअनाकलनीयतत्वाचाशोध घेण्यासाठी एका सुंदर श्लोकातून ते उघड करतात - ‘तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवयावगैरे. ज्यालाते ज्ञानमिळवण्याची उत्कंठा असेल त्यांनी काय करावे यावर मार्गदर्शन आहे त्यांत. अर्थात हेही तुम्हाला आधीच माहीत आहे म्हणा


प्रारंभी आपणस्वाध्याय-यज्ञअसा नामनिर्देश केला होता. आणि आतांपर्यंत आपण जो केला तोचस्वाध्याय-यज्ञनाही का  ! ! ! 

रहाळकर

१८ सप्टेंबर २०२४      


Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?