Monday, September 16, 2024

 

अली ब्रदर्स !

 अली ब्रदर्स

माझे दोन चांगले वर्गमित्र होते नौशाद आणि इरशाद या नावाचेदोघेही इंदोरच्या एका प्रख्यात डॉक्टरांचे सुपुत्र. खानदानी मुसलमान कसा असावा यांचे मूर्तिमंत रूप असलेले हे दोघे सख्खे भाऊ अतिशय देखणे, सुसंस्कृत नि दरियादिल असेच होते. मी संघ-स्वयंसेवक म्हणून ओळखला जात असूनही आमचे मैत्र छानपैकी अबाधित  राहिले होते, नि त्याचे मूळ कारण त्यापैकी नौशादने चक्क . पू. गोळवलकर गुरूजींचे व्याख्यान प्रत्यक्ष ऐकले होते आणि त्यात त्यांनी विशद केलेल्या राष्ट्रभक्तीवर तो चांगलाच प्रभावित झाला होता. अनेकांना हे सत्य कधीच कळले नसले तरी नौशादने ते स्वत: मला सांगितले होते. अकरावी पासून आम्ही एकाच कॉलेजात शिकलो - पी एम् बी गुजराती कॉलेजात नि नंतर एम् जी एम् मेडिकल कॉलेजात देखील. एन सी सीत तो सीनियर अंडर-ऑफ़िसर होता आमचा

इंदोरच्या शक्कर बझार भागांत त्यांचे वडील गोरगरीबांचे डॉक्टर म्हणून प्रसिध्द होते. त्यांचा दवाखाना नेहमीच पेशंट्सनी ओसंडून वाहात असे. त्या जमान्यात इंदूरला डॉ. मुखर्जी हे सर्वोत्तम फिजिशियन असले तरी त्यांचे समकालीन डॉ. अकबर अली एफ सी पी एस्  ही इंग्लंडातून मिळवलेली उपाधी असलेले आणि अतिशय तिरसट, कंजूष नि वाह्यात प्रवृत्तीचे होते. ते अगदीच निराळे असल्याने नौशाद-इरशादशी त्यांचा काहीच संबंध नव्हता !

ते असो, कारण मला आज माझ्या मित्रांबद्दलच कौतुकाने सांगायचे आहे


मेडिकलला असताना आम्हा सर्वांचे जेवणाचे डबे घरून आणत असे डब्बेवाला. माझ्या आईच्या हातची भाजी नि कढी नौशादला खूप आवडायची नि त्याच्या घरून आलेला क्रीमभात मला ! कढी तर तो चक्क डब्याला तोंड लाऊन घटाघटा प्यायचा

दोन हजार सालीं आमच्या चाळीसाव्यारी-यूनियनदरम्यान त्याची पुन्हा भेट झाली होती इंदुरांत. त्याने बालरोगतज्ञ म्हणून छान नावलौकिक मिळवला होता नि त्याची दोन्ही मुलें भारतीय सैन्यांत कार्यरत होतीं. इरशाद  अमेरिकेत स्थायिक झाला आणि तिथे त्याने एम जी एमचा लौकिक नक्कीच वाढवला असणार

पंधरा मे या नौशादच्या वाढदिवशी आम्हाला फोनवर बरीच वर्षें संपर्कात राहता आले

आज अचानक जुन्या स्नेह्यांची नि वर्गमित्रांची याद आली आणि या अली ब्रदर्स विषयी तुम्हाला सांगावेसे वाटले

रहाळकर

१६ सितंबर २०२४.     


Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?