Tuesday, July 30, 2024

 

व्यायाम आणि रियाझ !,

 व्यायाम आणि रियाझ

आज आकाशवाणीवर एका विदुषीची मुलाखत कानीं पडली आणि त्यांचा नाट्य-सरावाला किंवा तालमीचा उल्लेख त्या वारंवारव्यायामया शब्दाने करत असलेले ऐकून गंमत वाटली मला

खरंतर व्यायाम, मशक्कत, कसरत, स्वेटिंग आऊट वगैरे शब्द आपण शारीरिक हालचालींसाठी वापरतो तर रियाझ, दैनंदिन सराव वगैरे गळ्यासाठी किंवा गायनकलेसाठी वापरत असतो. मात्र त्यांच्या नाटकाच्या सरावांना व्यायाम म्हणताना ते बोल थोडेसे उचितही वाटले, कारण नाटकांत नटांच्या हालचाली आणि संवाद या दोन्हींचा कस लागत असतो

व्यायाम म्हटले की नजरेसमोर येणाऱ्या अनेकानेक व्यक्ती, ज्या एक विशिष्ट प्रकारचे संयमित, आंखीवरेंखीव, आदर्शवत जीवनक्रम जगत आलेल्या असतात. दररोजचा व्यायाम चुकला तर त्यांना चुटपुट लागून राहते. या ना त्या निमित्ताने व्यायामाची राहिलेली कसर त्या भरून काढत असतात. मी नि माझा आतेभाऊ विजू आमचे तरूणपणी भरपूर व्यायाम करीत असूं. माझा तो दिनक्रम कित्येक दशकांपूर्वी संपुष्टात आला असला तरी तो अजूनही वयाच्या चौऱ्यांशियाव्या वर्षी  देखील नियमितकसरतकरतो हे त्याने मला परवांच फोनवर सांगितले आणि मी करत नसल्याने माझी कानउघाडणीही केली त्याने. ( या वयांतही आपली कोणी कान-उघाडणी केली तर त्याचे वैषम्य वाटतां बरे वाटते पहा आतांशा ! ) असो


रियाझ बद्दल एक रंजक किस्सा आठवला. डॉ. वसंतराव. देशपांडे यांना आपल्या साथीदारां समवेत एकदा दिल्लीत बड्या बड्या मंत्री नि हपिसरां समक्ष गायन प्रस्तुतीसाठी पाचारले गेले होते. गायन सुरू करून दहापंधरा मिनिटे होऊनही कुणाचीचदादयेईना, सर्वजण मख्खपणे बसलेले किंवा रेललेले आपापल्या सोफ्यांत. तेव्हा साथीदारांना वसंतराव हळूच म्हणाले, ‘कोई बात नही, अभी रियाझ ही कर लेते हैं भई’ ! 


वडील देवासला असताना त्यांचे राहते क्वार्टर पं. कुमार गंधर्व यांचे घरासमोरच होते. दररोजचा पंडितजींचारियाझते बाहेर आरामखुर्ची टाकून निवान्तपणे ऐकत असत आणि त्या नादब्रह्मांत तल्लीन होऊन जात. अर्थात दररोजचाहाय हॅल्लोहोत असले तरी वडील त्यांचे नि:सीम चाहते होते हे निर्विवाद


आपण शाळाकालेजांत शिकत असताना विविध प्रकारचे प्रयोग किंवाएक्सपेरिमेंटस्शिकत वा करत असतो. त्यांना व्यायाम किंवा रियाझ हे दोन्ही शब्द लागू पडत नाहीत. आपल्यावर लादलेली एक सक्ती असते ती. रियाझ नि व्यायाम हे दोन्ही मात्र केवळ आपल्या मर्जीवर तग धरतात हे विसरतां येणार नाही, पूर्णत: ऐच्छिक ! ! 

रहाळकर

३० जुलै २०२४.      


Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?