Tuesday, July 30, 2024

 

व्यायाम आणि रियाझ !,

 व्यायाम आणि रियाझ

आज आकाशवाणीवर एका विदुषीची मुलाखत कानीं पडली आणि त्यांचा नाट्य-सरावाला किंवा तालमीचा उल्लेख त्या वारंवारव्यायामया शब्दाने करत असलेले ऐकून गंमत वाटली मला

खरंतर व्यायाम, मशक्कत, कसरत, स्वेटिंग आऊट वगैरे शब्द आपण शारीरिक हालचालींसाठी वापरतो तर रियाझ, दैनंदिन सराव वगैरे गळ्यासाठी किंवा गायनकलेसाठी वापरत असतो. मात्र त्यांच्या नाटकाच्या सरावांना व्यायाम म्हणताना ते बोल थोडेसे उचितही वाटले, कारण नाटकांत नटांच्या हालचाली आणि संवाद या दोन्हींचा कस लागत असतो

व्यायाम म्हटले की नजरेसमोर येणाऱ्या अनेकानेक व्यक्ती, ज्या एक विशिष्ट प्रकारचे संयमित, आंखीवरेंखीव, आदर्शवत जीवनक्रम जगत आलेल्या असतात. दररोजचा व्यायाम चुकला तर त्यांना चुटपुट लागून राहते. या ना त्या निमित्ताने व्यायामाची राहिलेली कसर त्या भरून काढत असतात. मी नि माझा आतेभाऊ विजू आमचे तरूणपणी भरपूर व्यायाम करीत असूं. माझा तो दिनक्रम कित्येक दशकांपूर्वी संपुष्टात आला असला तरी तो अजूनही वयाच्या चौऱ्यांशियाव्या वर्षी  देखील नियमितकसरतकरतो हे त्याने मला परवांच फोनवर सांगितले आणि मी करत नसल्याने माझी कानउघाडणीही केली त्याने. ( या वयांतही आपली कोणी कान-उघाडणी केली तर त्याचे वैषम्य वाटतां बरे वाटते पहा आतांशा ! ) असो


रियाझ बद्दल एक रंजक किस्सा आठवला. डॉ. वसंतराव. देशपांडे यांना आपल्या साथीदारां समवेत एकदा दिल्लीत बड्या बड्या मंत्री नि हपिसरां समक्ष गायन प्रस्तुतीसाठी पाचारले गेले होते. गायन सुरू करून दहापंधरा मिनिटे होऊनही कुणाचीचदादयेईना, सर्वजण मख्खपणे बसलेले किंवा रेललेले आपापल्या सोफ्यांत. तेव्हा साथीदारांना वसंतराव हळूच म्हणाले, ‘कोई बात नही, अभी रियाझ ही कर लेते हैं भई’ ! 


वडील देवासला असताना त्यांचे राहते क्वार्टर पं. कुमार गंधर्व यांचे घरासमोरच होते. दररोजचा पंडितजींचारियाझते बाहेर आरामखुर्ची टाकून निवान्तपणे ऐकत असत आणि त्या नादब्रह्मांत तल्लीन होऊन जात. अर्थात दररोजचाहाय हॅल्लोहोत असले तरी वडील त्यांचे नि:सीम चाहते होते हे निर्विवाद


आपण शाळाकालेजांत शिकत असताना विविध प्रकारचे प्रयोग किंवाएक्सपेरिमेंटस्शिकत वा करत असतो. त्यांना व्यायाम किंवा रियाझ हे दोन्ही शब्द लागू पडत नाहीत. आपल्यावर लादलेली एक सक्ती असते ती. रियाझ नि व्यायाम हे दोन्ही मात्र केवळ आपल्या मर्जीवर तग धरतात हे विसरतां येणार नाही, पूर्णत: ऐच्छिक ! ! 

रहाळकर

३० जुलै २०२४.      


Sunday, July 28, 2024

 

तुझ् आहे तुजपाशी !

 तुझे आहे तुजपाशी

महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्वअसे कायमस्वरूपी ब्रीद मिळवलेल्या पु. लं. चे हे गाजलेले, अजरामर असे नाटक प्रत्यक्ष नाट्यमंदिरांत जाऊन मी एक्केचाळीस वेळा आणि नंतर टीव्ही नि यूट्यूबवर किमान दहा वेळा पूर्णपणे पाहिले आहे यावर कुणाचाच प्रथमदर्शनी विश्वास बसणार नाही, पण ईश्वरसाक्ष नि मात्यापित्यांची सौगंध खाऊन सांगतो की हे त्रिवार सत्य आहे


अगदी पहिल्यांदा हे नाटक मी इंदौरच्या गांधी हॉलमध्यें पाहिले आणि लोकाग्रहास्तव झालेला सलग दुसऱ्या दिवशींचा प्रयोगसुध्दा मी पुन्हा पाहिला होता. त्यावेळी इन्दौरमधील प्रथितयश नाट्यकर्मी बाबा डिके यांनीकाकाजींची भूमिका साकार केली होती तरआचार्यहोते राहूल बारपुते, ‘नईदुनियाया हिंदी दैनिकाचे प्रधान संपादक. उषाचा रोल आदा केला होता सुमनताई धर्माधिकारींनी आणिश्यामहे अफलातून पात्र रंगविले होते त्या काळचा अतिशय नटखट नट बंडू देवलने ! डॉक्टर सतीश होते इंदौरमधले सर्वात हॅंडसम प्रा. मराठे, तर  ‘गीताचा रोल मधुवंती दांडेकर या (त्या काळच्या ) नाजुक साजुक सुस्वरूप युवतीने केला होता. अतिशय बेरका डिके घराण्यातल्या वासुअण्णांचा वट रंगवला होता तितक्याच बेरकी चंदू पारखीने

या सर्व पात्रांची नावे एवढ्यासाठी सांगितली की ती कदाचित तुम्ही या आधी ऐकली असावीत ( किंवा नसावीत ! ) 

पुण्यात आल्यावर मात्र हे नाटक मी लागले तितक्या वेळी पाहिले. अगदी राजा परांजपे, राजा नेने, राजा गोसावी, शरद तळवलकर, रमेश देव-सीमा, आशालता वाबगांवकर वगैरेंपासून थेट दाजी भाटवडेकरांपर्यंत सर्व सर्व दिग्गज कलाकार मला पाहता आले

नुकतेच अमेरिकेतील कुठल्यातरी महाराष्ट्र मंडळाने सादर केलेले हेच नाटक पाहून खरोखर डोळ्यांचे पारणे फिटले, मन तृप्त तृप्त झाले आणि इतकी वर्षे पाहात आलेल्या प्रयोगांवर कळस चढल्याचे जाणवले. तेथील हौशी कलाकारांनी या नाटकाचा गाभा समजून उमजूव केलेले, उत्तम अभिनय आणि सर्वोत्तम दिग्दर्शन असलेले हे नाटक मी यूट्यूबवर पाहिले खरे पण ती लिंकसेव्हकरू शकलो नाही ही खंत आहे.. बरे कोणत्यास्टेटमघले हे महाराष्ट्र मंडळ आहे तेही आता आठवत नाही. हा हन्त हन्त ! असो

या नाटकाच्या हिंदी आवृत्तीतील एक उतारा स्व. डॉ. मायाताईंनी काही वर्षांपूर्वी सादर केला होता. हिंदी असो वा मराठी, एकूणच ही कलाकृती विलक्षण आहे हे नि:संशय

आज पुन्हा एकदा गतकालीन रम्य स्मृती चाळवल्या आणि आत्तां आभाळ जसे भरून आले आहे तसे मनही भरून वाहते आहे………!

रहाळकर

२८ जुलै २०२४      


This page is powered by Blogger. Isn't yours?