Friday, May 31, 2024

 

ऊपरवाला !

 ऊपरवाला…….! 


आजप्रभात वंदनमध्येंकुठे शोधिशी रामेश्वर अन् कुठे शोघिशी काशीहे बाबुजींचे सुंदर गाणे ऐकले आणि त्यांतील प्रत्येक शब्द अगदी आतून दाद देऊन गेला

खरेतर आपल्यातील प्रत्येकानेच आसमंतात भरून उरलेलादेवप्रत्यक्ष पाहिला आहे, अनुभवला आहे. मात्र त्याची शब्दांत किंवा गीतांतून अभिव्यक्ती करण्यासाठी काही निवडक मंडळींची योजना त्याच परब्रह्माने केलेली आपण पाहात आलोंय

अगदी बालपणापासून देव वर आकाशात असतो असे आपण मानत आले आहोत. स्वर्ग देखील वर आकाशाकडे बोट करून दाखवला जातो - आणि नर्क जमीनीखालीं ! या पृथ्वीला मात्र मृत्युलोक म्हणून संबोधले जाते. खरंतर हे तीनही प्रत्यक्षात असतच नाहीत हे वास्तव कळायला म्हातारपण यावं लागतं ! म्हातारपणीं जाणवतं की स्वर्ग, नर्क नि मृत्यू हा निव्वळ भ्रम असतो. येत असलेला नि आलेला प्रत्येक क्षण या तीनही नसलेल्या अवस्थांची अनुभूती देत असतो असे तुम्हाला कधी वाटले आहे काय ? गुगली पडली की काय, पण जरासे थांबून विचार करून पाहूया

मला सांगा, तुम्ही आम्हीच नव्हे तर जगातले सर्व भाविक आकाशाकडे पाहात त्यापरवरदिगारऑल हाय अल्लामियां, येशू, झोरास्टर, बौध्द, वगैरे वगैरे सर्वजण कुठे शोधतात आपापल्या इष्टानिष्ट दैवतांना

याउपरवाल्यालाआळवावं कां लागतं ? तो जर सर्वव्यापी, सर्वान्तर्यामी  असेल तर त्याला कोंदणात बसविण्याचा किंवा अडकवायचा खटाटोप कशासाठी ? खरेतर आपापले उपास्य दैवत कायम आपल्या जवळ असते, अगदी अंतरंगात ठाण मांडून बसलेले. त्याला शोधण्यासाठी ऊप्पर काय कू देखनेका

खूप वर्षांपूर्वी पाहिलेल्या एका हिंदी सिनेमातले गाणे होते मोहम्मद रफीचे, बहुतेक कालाबाजार मधले. ‘अपनी तो हर आह एक तूफान है, ऊपरवाला जानकर भी अनजान हैवगैरे. संदर्भ दुसरा असला तरी त्या गीतातले शब्द पुन्हा आठवले आज !   ‘ऊप्परवाला जानकर भी अनजान है ! ! 

रहाळकर

३१ मे २०२४ 


Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?