Tuesday, April 02, 2024

 

आदरणीय नि भादरणीय !

 आदरणीय नि भादरणीय !

आज सकाळी भाऊ तोर्सेकरांचा ब्लाग ऐकताना या दोन्ही शब्दांनी खूप मनोरंजन केले माझे. वास्तविक आदरणीय व्यक्तींना आपण आदरणीय असे संबोधणे योग्यच असले तरी भादरणीय ही मला अतिशय सुसंस्कृत नि सौम्य  अशी शिवी जाणवली

खरोखर कोणत्याही सन्माननीय व्यक्तीला केवळ आदरणीय असे म्हणता परम आदरणीय, श्रद्धेय वगैरे ॲडिशनल विशेषणे आपण सहसा जोडत असतो. श्रीसमर्थ सुद्धाअति आदरेंअसे संबोधतात. खरंतर आपला आदर व्यक्त करण्यासाठी केवळ एवढा एकच शब्द पर्याप्त नसतो तर त्या अनुषंगाने आपली देहबोली नि विनम्र आचरण तेवढेच महत्वाचे असते. थोडक्यात काया वाचा मनेन आपला आदरभाव व्यक्त झाला पाहिजे. एऱ्हवीं हा शब्दप्रयोग अतिशय गुळगुळीत झालेला आपण नित्य अनुभवत असतो


मात्र कित्येकदा अशा व्यक्तींशी आपला पाला पडतो ज्यांना आदरणीय सोडा, चक्क शिवी घालावीशी वाटते मनातल्या मनांत. अर्थात शिवीगाळ करणे किंवा नुसते तसे मनात येणे हे कितीही गर्हणीय असले तरी केव्हाना केव्हा मनात आल्याशिवाय राहात नाही. म्हणूनचभादरणीयही मला विलक्षण सुसंस्कृत शिवी वाटली. इथे कुणाच्या मायबहिणीचा उल्लेख नाही, बापाचा धिक्कार नाही किंवा जातीवाचक कोणताही अर्थ अभिप्रेत नाही ! भादरणीय —-- व्वा ! ! 

( नुकतीच होळी होऊन गेली असली तरी एऱ्हवीं त्या दिवशी बोंबाबोंब करणारे आता कुणी शिल्लक राहिले नाहीत हो……..! ! ! )

रहाळकर

एप्रिल २०२४ ( ! ) 


Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?