Friday, March 08, 2024

 

न जमलेल्या गोष्टी !

  जमलेल्या गोष्टी

मागे कधीतरी माझ्याराहून गेलेल्यागोष्टींची मी यादी करण्याचा प्रयत्न केला होता पण आज असे वाटतेंय की त्याच राहून गेलेल्या गोष्टी प्रत्यक्षात आणण्याचा देखील थोडाफार प्रयत्न मी नक्कीच केला असेल. त्याच जमलेल्यागोष्टींची याद आली म्हणून हे अल्पधाारिष्ट्य

खरंतर त्या राहून गेलेल्या गोष्टी पूर्णत्वास नेण्याची माझी कुव्वतच नव्हती कधी ! मसलन्, व्यायामाचे भरपूर प्रकार करूनही मलामलखांबकरायला कधीच जमले नाही कारण शरीर तेवढे लवचिक आणि चपळ नव्हते. काही सन्माननीय अपवाद वगळतां बरीचशीपैलवानमंडळी संथ गतीची असत, आपल्याच मस्तींत चालणाऱ्या गजराजा सारखी ! मलागिऱ्यारोहणकधीच साधले नाही जरी मी कित्येक मैल सहज चालून जात असे. पोहतांना देखील संथ तरंगत राहणे मला आवडत असे. ब्याकस्ट्रोक, सूर मारणे, खूप उंचावरून उड्या मारणे मला कधीचजमलेनाही. धाकटे बंधू रविंद्रसाडे माडे तीनम्हणत खूप उंचावरून बेधडक छलांग टाकत असे. सलग पाच वर्षे एका पोरीकडे लक्ष असूनही तिच्याशी बोलणे जमलेच नाही मला कधी ! !  तेही असो ! ! ! 


प्रत्येक तरूणाची काहीना काही स्वप्ने असतात. अर्थात माझीही होती. मात्र बरेच वेळा ती अशक्य कोटीतली असत आणि मी ते जाणूनही होतो. स्वप्न पाहण्या ऐवजीं स्वप्नरंजन अधिक घडत असे कारण ती साकार करण्याचे कसब आणि साधनशुचिता कमी पडत राही. आर्म्ड फोर्सेस मधे जायचे माझे स्वप्न स्वप्नवत ठरले. मला उत्कृष्ठ चित्रकार आणि शास्त्रीय संगीताचा व्यासंग करायचा होता मात्र मूळ गुरूजींनीच त्या विचाराची राखरांगोळी करून टाकली. एक प्रभावी वक्ता होण्याचे माझे स्वप्न सभेसमोर हातपाय बधिर झाल्याने नेस्तनाबूद झाले


सदगुरूंचा अनुग्रह झाल्यावर एक शिष्योत्तम होण्याचे माझे मनोगत मनातल्या मनात जिरून गेले निव्वळ माझ्या आळसापोटीं ! सातत्याने अशी त्यांनी उपदेशिलेली वैयक्तिक साधना कधी घडली नाही, जमली ती अतिशय नगण्य


खरंच का मी इतका अपयशी ठरलो ? नव्हे नव्हे, जमेच्या अणिजमलेल्याअनेक गोय्टी माझ्या आयुष्यांत ठाण मांडून बसल्या आहेत. कृतार्थ आहे माझे जीवन आणि म्हणूनच आताराहून गेलेल्याकिंवा जमलेल्यागोष्टींवर जास्त विचार करणे नको

रहाळकर

फेब्रुवारी २०२४



Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?