Friday, March 22, 2024

 

राहुकालम् !

 राहुकालम्

काल कृत्तिका नि प्रशांत आमच्या घरी दुपारचे साडेतीन वाजण्याची वाट पाहात थांबले होते राहूकाल संपण्यासाठी. ते करणार असलेला महत्वाचा व्यवहार समोरील भिडूच्या विश्वासाला योग्य तो मान देण्यासाठी होता हे अधोरेखित करणे मला आवश्यक वाटते


खरेंतर साधारण चाळीस पन्नास वर्षांपूर्वी आम्हीही असा परिपाठ पाळत असूं. कालांतरानेराहूकालाची संकल्पना अम्मळ क्षीण झाली कारण सद्गुरूंनी त्यावर सुलभ उतारा सांगितला होता. मला ठाऊक आहे तुमचा लगेचच येणारा प्रश्न की या सर्व चऱ्हाचाचे अखेर प्रयोजन काय ? तर मग सांगतोच आतां


असे पहा आपण सर्वसामान्य माणसे सहसा ईश्वराला मानणारी असलो तरी अमंगळाची, अचानक येणाऱ्या संकटांची, दैवी अवकृपेची कायम भीती  बाळगणारे असे आपले वर्तन असते. शास्त्रांनी त्यावर हळुवार फुंकर घालण्यासाठी काही नीतिनियम घालून दिले जेणेकरून आपले उसने का असेना अवधान किंवा विश्वास टिकून राहावा. त्यांत प्रात:काळच्याकराग्रे वसते लक्ष्मी:’ पासून रात्रीच्याकरचरण कृतं वाक्पर्यंत सर्व प्रार्थना किंवा स्तोत्रे आली. माणूस सहसा मुद्दाम असे गैरवर्तन करायचे टाळतो आणि चांगले काही करावेसे वाटते तेव्हा योग्य वेळ पाहून पुढचे पाऊल उचलतो. शास्त्रांनी जशा सुयोग्य वेळा सांगितल्या तशीच ढोबळमानाने टाळण्याच्या वेळा देखील सांगून ठेवल्या आहेत, ज्यांनाराहू कालअसे म्हटले आहे. चोवीस तासातील केवळ दीड तास हा राहू काळ असतो असा समज आहे. या राहूकालात सहसा कोणतेही ईप्सित कार्य सुरू करू नये असा संकेत आहे, मग ते प्रवासासाठी घराबाहेर पडणे असो, एखादी नवी खरेदी किंवा व्यवहार करणे असो, एखादे मंगल कार्य योजिलेले असो. अनेक थोरामोठ्यांना आणि यशस्वी पुरूषांना तसा संकेत पाळताना मी पाहिले आहे

अगदी पहिल्यांदा जेव्हाराहुकालया विषयी ऐकले तेव्हा एका मित्राने मला एकफार्म्युलासांगितला होता. तो म्हणाला होता की दररोजचा राहुकाल बघणे खूप सोप्पे आहे. एक वाक्य पाठ कर आणि त्यातील प्रत्येक शब्द तुला मार्ग दाखवील. ते वाक्य होते - “  mother saw father wearing the turban suddenly ! “ 

आता यातील प्रत्येक शब्द पाहू आणि घड्याळ सुरू करू सकाळच्या साडेसात पासून. Mother चे पहिले शब्द आहेत  mo - म्हणजे Monday . सोमवारी सकाळी साडेसात ते नऊ असा दीड तास राहुकालाचा ! Saw मधले दोन शब्द Saturday म्हणजे शनिवारसाठी. म्हणजे दर शनिवारी नऊ ते साडेदहा राहुकाल. तसेच father मधील F हा फ्रायडे अर्थात शुक्रवार साठी, म्हणजे दर शुक्रवारी साडेदहा ते बरा पर्यंतराहुकाल’ ! अशा प्रकारे दररोज साठी केवळ दीड तासराहुकालम्’ ! ! 

सोप्पं आहे ना खूप ? पण सद्गुरूंनी सांगितलेलाउतारादेखील अनमोल म्हटला पाहिजे. ते म्हणाले होते की कोणतेही कर्म करताना आधी आणि नंतर ईश्वराचे किंवा आपल्या इष्टाचे मन:पूर्वक स्मरण करावे म्हणजे ते कार्य सुफलित होतेच होते. विशेषकरून जेव्हादानकरायचे तेव्हा ते डाव्या हातालाही कळणार नाही इतक्या तत्परतेने करावे


तथापि, जी मंडळी शास्त्रानुरूप आपले वर्तन ठेवतात त्यांचा नेहमी आदर करावा, निदान बुध्दिभेद अवश्य टाळावा ! ! ! 

रहाळकर

२२ मार्च २०२४ 


Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?