Tuesday, January 30, 2024

 

दहा नंबरचा पाना !

 दहा नंबरचा पाना

शीर्षक पाहून नवल वाटले ना ? पण हा शब्द कोणत्याही मेकॅनिकल इंजिनियर किंवा मेकॅनिकला नवा नाही. मी मेकॅनिक नसलो तरी घिसाडी म्हणून नक्कीच नावारूपाला येऊ शकलो असतो पण नशिबात माणसांचा (गुरांच्या ऐवजी ) डॉक्टर होणे विधिलिखित होते. ते असो


आमच्या फोर्ड गाडीचा स्टार्टर अचानक जॅम होई आणि बोनेट उघडून केवळ दहा नंबरच्या रिंग पान्याने बोल्ट ढिला करताच स्टार्टर लगेच सुरू होई. एकदा या रिंग पान्यासाठी बारा मैल पायपीट केली आहे मी नर्मदे कांठच्या बडवाहचे जंगलातून . त्या वेळी गॅडोर ही एकमेव कंपनी उत्तम प्रकारचे पाना-सेट बनवीत असे. मात्र दहा नंबरचा पाना खरोखर नंबरी होता कारण बहुतेक बोल्ट्सना तो चपखल बसत असे. बंडलबाजी करत नाहीये मी कारण हॉर्न, रेडियेटर, बॅटरीच्या केबल्स नि कार्ब्युरेटर सुद्धा या दहा नंबरी पान्याने मी लीलया खोलीत  किंवा टाईट करत असे. होय, ही सर्व कामें मी बरेच वेळा केली आहेत. प्रूफ काय विचारतां ? माझा शब्दच दगडावरील रेघ समजा ! शिवाय ती फोर्ड गाडी क्वचितच मेकॅनिकच्या गॅरेजमधे न्यावी लागे हे त्रिवार सत्य आहे. तेही असो


हा बेटा दहा नंबर खरंच विशेष म्हटला पाहिजे. दशरथ, दहातोंड्या रावण, दसनंबरी शिणेमा, दहा डाऊनिंग स्ट्रीट, अशा कित्येक दहा दहाच्या चलनी नोटा अस्तित्वात आहेत. बाप नंबरी - बेटा दस नंबरी हा सिनेमा मी कित्येक वेळा पाहिला असूनही पुन्हा पुन्हा पाहू शकेन

रहाळकर

३१ जानेवारी २०२४



Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?