Monday, January 29, 2024

 

गच्छत: स्खलनं क्वापि ….!

 गच्छत: स्खलनं क्वापि……..!

संस्कृतमध्ये एक वचन येते - ‘गच्छत: स्खलनं क्वापि भवत्येव प्रमादत: / हसन्ति दुर्जनास्तत्र समादधति सज्जन्ना: // ‘ म्हणजे चालता चालतां कोणी पडला आणि त्याला इजा झाली तर दुष्ट प्रवृत्तीचा माणूस त्याला हंसेल ; मात्र सज्जन माणूस कळवळेल नि म्हणेलअरेरे’ ! 

वरील वचन आणि त्याचा अर्थ समजून घेत असतांना मनांत विचारांचे काहूर उठले आणि मानवी मनाच्या जडणघडणीकडे अधिक विचार करावासा वाटला. आपल्या मनावर संस्कारांचे किती विलक्षण स्वामित्व असतं नाही ! सर्वच संस्कार खरंतर आपण आपसूक आपल्या गाठीशी बांधून घेत असतो, जन्मजात म्हणा हवे तर किंवा पूर्वजन्मांपासूनही कदाचित्. मात्र काहींना रूजविण्यासाठी अनेक घटक, घटना, व्यक्ती नि त्यांच्या प्रकृती कारणीभूत ठरतात. सुसंस्कार रूजविण्यासाठीसंस्कार वर्गचालवले जातात हे खरे असले तरी मुळात ते अनुकरणाने रूजत असतात. थोर व्यक्तींचे अनुकरण करत असताना साहाजिकच त्यांची वर्तणूक ध्यानात घेतली जाते, निव्वळ शब्द नव्हेत. ‘बोले तैसा चाले त्याची वंदावीं पाऊलेंअशी म्हण आपण खूप लहानपणी ऐकलेली असते. कित्येक थोर पुरूषांची, संत सज्जनांची, देवी देवतांची चरित्रे ऐकत वाचत आपल्या मनाची जडणघडण होत जाते हेही खरेच आहे. तथापि आपला पिंड पोसला जातो अन्नाद्वारें, मग ते अन्न तोंडावाटे पोटात जाणारे असो वा कान नाक डोळे नि त्वचेच्या द्वारें ! मानवी शरीराच्या पंचकोषांपैकी अन्नमय कोष, प्राणमय नि मनोमय कोष यां सकट पाचही कोष किंवा आवरणें आत शिरत असलेल्या विविध प्रकारच्याअन्नावरच कार्यरत असतात. त्यांना निकोप, सुदृढ राखण्याचे भान किंवा तारतम्य असणे गरजेचे आहे

या साठी अगदी सोप्या वाटणाऱ्याट्रिक्सकामाला येऊं शकतील. एक - ‘हेल्प एव्हर, हर्ट नेव्हर’ (जमेल तेवढी मदत करा, निदान कुणाला दुखवूं नका ) आणिलव्ह ऑल, सर्व्ह ऑल’ ( सर्वांवर निर्व्याज प्रेम करा, सर्वांची यथायोग्य सेवा करा ) !

पहा गाडी कशी रूळ बदलत गेली ! ! 

रहाळकर

२९ जानेवारी २०२४ 



Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?