Monday, October 23, 2023

 

इंग्लंडवारी २०२३ (उत्तरार्ध )

 इंग्लंडवारी २०२३ (उत्तरार्ध


आज इंग्लंडवारीचे वर्णन करायचा अजिबात इरादा नसून काही भावनिक नि दार्शनिक विचार मांडीन म्हणतो. तसा माझा पिंड भावनिक वा दार्शनिक नाही - दार्शनिक म्हणजेफिलॉसॉफिकलहे जाताजातां सुस्पष्ट केलेले बरे. असो


मी इंग्लंड किंवा अधिक प्रिसाइजली लंडन शहराचा एवढा चाहता कसा काय झालों हे मला उलगडलेले कोडें आहे. खरंतर मी कोणत्याही शहराचा, गावाचा अथवा जागेच्या सहज प्रेमात पडतो हे वास्तव मी नुकतेच प्रकर्षांने अनुभवले आहे. अगदी परवाच नाही का मी म्हटलं, ‘या रूग्बी शहराच्या मी जाम प्रेमात पडलोयअसे

खरेंतर अशा भुरळ पाडणाऱ्या जागांचे प्रेम आपल्याला आलेल्या अनुभवांवरून प्रकट होते किंवा उफाळून येते - बहरून येते म्हणा हवे तर. अनुभव कोणते असे विचारताय ? मला वाटतं बाह्य सौंदर्या बरोबरच आपल्याला ज्या शांतीचा, समाधानाचा आणि प्रसन्नतेचा  साक्षात्कार घडवतो - त्याला मी अनुभव, नव्हे चांगला अनुभव म्हणेन. वास्तविक असे अनुभव आपण सर्वच वेळोवेळीं घेत असतो, पण ते अंतर्मनात साठवून हवे तेव्हा प्रगट करता येणे सर्वांना जमतेच असे नाही आणि जमत असले तरी फारसे कोणी त्या भानगडीत पडत नाहीत. मला ते बऱ्यापैकी जमूं लागलंय आतांशा

मी आत्तां डोळे मिटून स्वस्थ बसलो तरी क्षणार्धात प्रशांति निलयम, सिख मोहल्ला, आदित्य शगुन किंवा टिंबक्टू ला सहज फेरफटका मारून येऊ शकतो. अगदी तसेच लंडन मघील राहते घर, एल्थॅम लुईशॅम ब्लॅकहीथ, ग्रीनिच किंवा कॅनरी व्हार्फ सारख्या माझ्या आवडत्या जागा सहज नजरेपुढून झरझर सरकत जातात. त्याचे कारण मी आत्तांच कथन केले आहे

अशा विविध जागांबरोबरच त्या त्या ठिकाणी भेटलेल्या व्यक्ती आणि त्यांचेशी घडलेला संवाद किंवा साधा दृष्टिक्षेपही अनुभवाची शिदोरी बांधायला पुरेसा ठरतो


हल्लीं भरपूर निवांतपण असल्याने शब्दचावटी करत राहण्याची खोड जडत चाललीय्  मला, म्हणून तुम्हीही निवांत असलात तरच हे चऱ्हाट वाचत असाल हेही मी जाणून आहे. एऱ्हवींअवधान एकलें दीजेअसे विनवणारा मी, ‘वेळ असेल तर वाचाअसा उद्दामपणा करायला मागेपुढे पाहात नाही आतांशा


तर मी सांगत होतो मला लंडन-इंग्लंड का आवडते तें. इथली स्वच्छता, टापटीप, शिस्तप्रियता, लहरी हवामान आणि प्रामुख्याने थंड गारवा बहुतेक वेळ प्रफुल्लित करणारा उत्साहवर्धक असतो हे निर्विवाद. घराबाहेर पडताच समोर आलेली प्रत्येक व्यक्ती तुम्हाला प्रसन्नपणे स्मितहास्य करीत ग्रीट करते, तुम्हालायू आर ऑराइटअसे उद्गारते, कधी हवापाण्याबद्दल खुशी किंवा नाखुशी दर्शविते. बरे वाटतात त्यांचे ओळखदेख नसताना असे संवाद. (आपल्याकडे ओळख असूनही पाहून पाहिल्यासारखे करणे विलक्षण खुपते मला. असो ! )

मी म्हटले इथल्ले लहरी हवामान. स्वामी म्हणतलव्ह माय अनसर्टंटी’ . आपल्याला, निदान मला तरी, क्रिकेट आवडते  त्यातील अनपेक्षित चढउतार किंवा निकालांमुळे. पूर्वीच्या काळींनेमेचि येतो मग पावसाळाअशी म्हण रूढ असे. आता त्या पावसाला कुठलाच नियम लागू होत नाही. म्हणूनच तर त्याची एवढी आराधना करावी लागते किंवा कंटाळा येतो ! ते असो, अनपेक्षितपण किंवासरप्राईईईजकसं हवहवसं वाटतं ना, तसं लंडन आवडतं मला. तुम्हीही इथे एकदा जरी आलांत तर तुम्हालाही नक्कीच आवडेल ते. आणि आलाच तर जराकंट्रीसाईडसुद्धा जरूर पालथी घाला म्हणजे उर्वरित इंग्लंडही आवडेल

काय म्हणता, केरळ राजस्थान काश्मीरही नाही पाहिलेत अजून ? अरेरे, ते तर आधी पाहून घ्या बाबा बिगिबिगी

रहाळकर

२२ अक्टूबर २०२३ 



Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?