Saturday, October 21, 2023

 

इंग्लंडवारी २०२३ पूर्वार्ध

 इंग्लंडवारी २०२३.  ( पूर्वार्ध ! ) 


यंदाही आमची इंग्लंडवारी भूतो भविष्यती अशीच म्हणायला हवी कारण जावे की जावे या संभ्रमात बराचसा पोस्ट-कोविद काळ खर्ची पडला. मात्र मुलांच्या दृढ निश्चयामुळे ते घडून आले. त्यातून लेक नि जावई आमचे मनोबल वाढवण्यात यशस्वी ठरले आणि तेवढेच नव्हे तर आम्हा उभयताना सुखरूप घेऊन आले इथे इंग्लंडांत

नेहमीप्रमाणे इथे येताच आमचे आळसावलेली कंटाळवाणे झालेली दिनचर्या पुन्हा ताजीतवानी टवटवीत झाली. रात्रभराच्या शांत निवांत झोपेनंतर दुसऱ्याच दिवसापासून इथल्ली भटकंती सुरू झाली आणि आम्हीफोकस्टोनच्या समुद्रकिनारीं कूच केले. अदमासें दोन अडीच  तासांच्या झकास मोटर प्रवासाने चित्तवृत्ती बहरून आल्या, किमान दहा वर्षांनी तरूण झाल्यासारखे वाटले

फोकस्टोनचा विस्तीर्ण सागरकिनारा विलक्षण भुरळ घालणारा ठरला. सोसाट्याच्या वारा नि शहारे आणणाऱ्या थंडीमुळे आम्हा दोघांची थोडी त्रेधातिरपिट उडाली खरी, पण जांवईबापूंनी माझी राहून गेलेली आणि माझ्याकडून मागे कधीतरी व्यक्त केलेली इच्छा आठवणीने पूर्ण केलीमलासिगारओढायचा होता कधीपासूनच ! मात्र तीहौसमीच नव्हे तर सर्वांनी, अगदी उषाने देखील, भागवून घेतली ! ! चकित झालात ना ? होय, उषानेही तीनचार झुरके मारले ठसकत ठसकत. खरंतर प्रत्येकालाच मस्तपैकी ठसका लागत होता, पण असे ॲडव्हेन्चर करताना ते अपरिहार्य होतेच की. असो

परत घरी आल्यावर रात्री गेलो प्रमोदच्या बर्थडे साठी पिझ्झा हाणायला. तिथे सर्वच जुने मित्र भेटले श्रीशचे, सपरिवार. मग काय, खूप गप्पाटप्पा नि शेवटी चाय ! अख्खा दिवस असा बीझी गेला पहा

तिसऱ्या दिवशी लेक नि जावई गेले एडिनबराला त्यांच्या धाकट्या लेकीकडे. तेथून ती दोघे स्विस ट्रिप करणार आहेत आठवडाभर. आम्ही नेहमीप्रमाणे सहज सेटल् होऊन गेलो इथल्ल्या हवामानांत नि दैनंदिन उठबशींत. ‘जॉयया पेट् ने लळा लावला नित्याचा नि वेळ कसा भरभर सरकूं लागला आपोआप

आशना मुद्दाम आली होती लॅमिंग्टन स्पा या तिच्या बसैऱ्यातून. खरंतर हीथ्रो विमानतळ तिच्या वास्तव्याच्या केवळ दीड तासांवर आहे. आपली कन्व्हर्टिबल् फोक्सवॅगन कार घेऊन ती देखील विमानतळावर हजर होती आणि तिच्या लाडक्या आत्त्तीला नि उर्वरित बॅगा घेऊन ती आमच्या कितीतरी आधी घरानजिक पोहोचली होती. असो

मी आत्तांच म्हटले आशनाच्या लॅमिंग्टन स्पा च्या बसैऱ्यातून. खरंय तें, कारण गेले वर्ष दीड वर्षें ती एका दुसऱ्या भारतीय मुलीबरोबर अपार्टमेंट शेअर करत होती. नुकतेच तिने वारिकशायर मधील रूग्बी या शहरात स्वत:चे घर विकत घेतले असल्याचे वृत्त मी या आधी दिले आहेच. असो

इथे लंडनमध्ये डेरेदाखल होताच अलकाने आमच्या तंदुरूस्तीचा विडा उचलला आणि दररोजहेल्दी डाएट नि भरपूर चालणेहा मंत्र आमच्यात रूजवण्याचा चंग बांधला. साहाजिकच जॉयला बरोबर घेऊन नजिकच्या मॉटिंघम पार्क, फेअरी हिल पार्क, ग्रोव्ह पार्क, एल्थॅम पार्क वगैरे अवाढव्य मैदानी बागांचा फेरफटका नियमित सुरू झाला. ‘हेल्दी डाएटचा परिणाम आम्हा दोघांवर चांगलाच दृग्गोचर होतोय नि परत भारतात आल्यावर तो पुन्हा अर्ध्यावर आणणे क्रमप्राप्त असणार आहे ! असो


इथे आल्यावर एक सुखद परंपरा ऐकीवात आली नि ती म्हणजे लंडननिवासी काही भारतीय तरूणतरूणींनी चालविलेले गीत गायनाचे दरमहा होणारे सांगीतिक कार्यक्रम. जवलजवळ दीडदोन वर्षांपासून ते अव्याहत सुरू आहे. मुख्य म्हणजे यांतील कोणीही या आधीं संगीताचे धडे गिरवलेले नाहीत. आपापल्या परीने कॅरिओकेच्या साहाय्याने ही मंडळी जुनी नवी गीतें गाऊन स्वत:चे नि इतर सर्वांचे भरपूर मनोरंजन करतात. साधारण चारपाच तास चालणाऱ्या या संगीत महोत्सवाची सांगता साहाजिकच चमचमीत खाद्य व्यंजनांनी होते. दर महिन्यालाहोस्टकिंवा यजमान वेगळा असल्याने प्रत्येकालाच आपापल्या घरी आदरातिथ्य करण्याची संधी मिळते. ही तरूणाई भारताच्या विविध प्रांतातून आलेली असल्याने अस्सल भारतीय वातावरणांत सर्वजण रंगून जातात. श्रीश-अलकाने आपल्या घरी दोन महिन्यांपूर्वी असा सोहळा केला नि आम्हा दोघांनाही त्यांत प्रत्यक्ष सहभागी करून घेतले. मजा आली खूप


भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून येथे स्थायिक झालेल्या सुमारे एक हजार भारतीय-ब्रिटिश महिलांनी भारतातील आपापल्या प्रदेशांची वेषभूषा नि साजश्रुंगार करीत लंडन शहराच्या मध्यभागीं, ट्रॅफल्गार स्क्वेअर ते पार्लमेंट स्क्वेअर पर्यंत काढलेली भव्यदिव्य दिंडी नेत्रांचे अक्षरश: पारणें फेडणारी ठरली. अलका आणि तिच्या येथील सर्व मैत्रिणींनी त्यांत सक्रिय सहभाग घेतला आणि आमच्यासकट कित्येक हजार पर्यटकांचे आणि स्थानिकांचे उत्स्फूर्त चिअरिंग मन:पूर्वक स्वीकारले. खरोखर एक भव्य आनंदोत्सव पाहता आला आम्हाला

तसाच पण किंचित लहान प्रमाणावर झालेला नृत्य-गायनाचा कार्यक्रम येथील चमूने किंग्ज क्रॉस या मध्यवर्ती स्टेशनच्या भल्यामोठ्या हॉलमध्ये सादर केला आणि तिथेही आम्ही आशीर्वाद नि चिअरअप करायला हजर होतोच. असो


इथे आल्यावर शिरस्त्याप्रमाणे चार दिवस एकत्र सहल काढणे हा जणू अलिखित नियम झालाय गेली पंधरावीस वर्षे ! यंदाही लॉंग वीकेंड पाहून वुर्सेस्टरशायर मधल्या एका दूरदराज खेडेगांवी चक्क दहा फ्यामिलीज नि एकूण पस्तीस जणांनी एका भल्यामोठ्याग्रेंजकिंवा फार्महाऊस वर चार दिवस धुडगूस घातला. अतिशय नयनरम्य, हिरव्यागार डोंगराळ भागातले ते फार्महाऊस सर्व सुखसोयींनी युक्त आणि निवांत होते. अर्थात बरोबरचच्या तरूणाईने नि मुलामुलींनी अपेक्षेप्रमाणे यथेच्छ दंगामस्ती केली हे ओघाने आलेच की. आमच्यासारखे इतरही तीनचार आजीआजोबा संगतीला होते आणि आम्ही कौतुकाने त्यांचे हसणे खिदळणे पाहून तृप्त होत होतो

क्रमश: ………



Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?