Thursday, March 30, 2023

 

परप्रांतीय !

 परप्रांतीय !

आज सकाळी दोन गाणी सहज कानावर पडली, एक होते गुजराती गीत नि दुसरे बंगाली. दोन्ही गाण्यांचे स्वर, सूर आणि शब्द खरोखर मंत्रमुग्ध करणारे होते आणि मला खूप खूप उंच भिरभिरायला भाग पाडणारे

त्या उंचीवर विहरत असतांना मला गुजराती, बंगाली आणि इतर सर्वच प्रांतांतील -अगदी दाक्षिणात्य देखील - गाणी, संस्कृती, सौहार्द्र, बोलीभाषा आणि राष्ट्रप्रेमाची प्रखरतेने जाणीव झाली, याद आली आणि अगदी अंत:करणापासून प्रेम आणि आपुलकी उफाळून आली. हा अनुभव विलक्षण होता


खरोखर, आपण भारतीय किती भाग्यवान आहोत नाही ? एवढी प्रचंड विविधता असूनही सर्व प्रांतांतील, सर्व बोलीभाषांतून, सर्व साहित्यातून, सर्व प्रकारच्या कलाविष्कारांतून, अगदी खेळाचे मैदान किंवा सैन्यदलात त्या विविधतेतील एकत्वाचे किती सुंदर दर्शन घडत असते नाही


वास्तविक या अनेकत्वातील एकात्मभाव आपण नेहमीच बोलत ऐकत आलो आहोत. मात्र त्याची प्रत्यक्ष अनुभूती येण्यासाठी असे काही दुर्मीळ क्षण यावे लागतात. आज तशा अनुभवाने मी चिंब चिंब आहे, गीतेतल्यामुहुर्मुहूसारखा

हा आनंद तुमचेपर्यंत पोहोचवावा म्हणून केलेली आजची ही धडपड

रहाळकर

३० मार्च २०२३

(श्रीराम आणि दासनवमी



Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?