Wednesday, March 15, 2023

 

सिल्व्हर लायनिंग !

 सिल्व्हर लायनींग ! “ 


सकाळी नेहमीप्रमाणे गॅलरीत चहाचा लुत्फ घेत निवान्त बसलो असताना आकाशात गोळा झालेले काही गडद ढग नजरेस पडले नि किंचित उदास वाटले. मात्र पाहता पाहतां जसजसा सूर्योदय होऊ लागला तसतसे त्याच ढगांना चांदेरी सोनेरी किनार आली आणि चक्क केशरी गुलाबी छटा देखील

हरखून जावे असे ते दृष्य पाहून मन सुखावलें आणि ते तात्पुरते आलेले औदासिन्य कुठल्या कुठे गडप झाले. नि मग सुरू झाली विलक्षण विचार मालिका


प्रपंचातही असेच काळे पांढरे मेघ येतात नि जातात. वास्तविक स्वामी म्हणत तसे लाईफ इटसेल्फ इज लाईक पासिंग क्लाऊड्स ! आकाशाला त्यांचे सुखदु: नाही का देणेघेणे नाही


आपल्याला असे निरभ्र, मनमोकळे कसे राहतां येईल आकाशासारखे ? खरेंतर आपले मूळ स्वरूप असते निरागसआपण लहान बालक असतांनापण नंतर तहान नि भूक समजूं लागते, आवड-निवड पिंगा घालू लागते नि सुरू होतात सर्वप्रथम जिभेचे चोचले ! आपण चटकनरसनेंद्रियाचे गुलामबनतो. मग दृष्टी आपले खेळ दाखवू लागते, माझे नि परके असा भेद करीत. त्यातून निर्माण होते ईर्षा ! त्याचेजवळ आहे ते माझ्याकडे का नाही असा सवाल करताना दबा धरून बसलेला दंभ नि अहंकार कसा उफाळून येतो पहा. हवे ते मिळाले नाही म्हणजेच इच्छापूर्ती झाली नाही तर क्रोध येणारच आणि क्रोधाच्या अतिरेकाने भ्रम व्हायला वेळ का लागतो ? आणि मग गीतेंत म्हटले तसेप्रणश्यती’ - सर्वनाश ! ! 


नव्हे, मला असे चित्र अजिबात रंगवायचे नव्हते. स्वच्छ सुंदर आकाशांत मनोहारी रंगबिरंगी ढग पाहतांना मला खरंतर संसाराच्या कॅनव्हासवर स्पष्ट दिसत असलेले चित्र पाहायचे होते, त्या संसाररूपी रथावरून थेट आकाश-अवकाशापर्यंत मजल मारायची होती, नव्हे गवसणी घालायची होतीया संसारचक्राचे रहस्य समजून घ्यायचे होते



खरंच, संसार चक्राचे अगदी तसेच नाही काय ? मधेच लहानमोठी संकटें, भीती, हुरहुर या रूपात गडद ढग गोळा होतातएऱ्हवीं व्यवस्थित चालत असलेला हा संसाररथ मधेच लडखडतो, खुडबुडतो आणि जरासे वंगण घालताच पुन्हा कुरकुर करता धावायला लागतो

आतां या चालत्या रथात वंगण कोण पुरवतो ? परमेश्वर ? सदगुरू ? नशीब किंवा प्राक्तन ? नव्हे नव्हे, केवळ आपली इच्छाशक्ती ! नाही पटत ? सांगतोच तर मग, पटलं तर घ्या नाहीतर सोडून द्या परमेश्वरावर

मला सांगा, कुठे असतो हो हापरमेश्वर’ ? मंदिरांत, मसजिदींत, गुरुद्वारात आणि चर्चमध्ये पाहिलाय का तुम्ही ? मला तर शोधूनही सांपडला नाही आजवर. अर्थात मीही फारसे लक्षच दिलेले नाही त्या विषयावर हेही खरे आहे म्हणा ! मात्र एका सत्पुरूषाचे आश्वासक शब्द आठवले, ‘गॉड इज विदीन यू - अराऊंड यू - आऊटसाईड यू - ॲबोव्ह यू - बिलो यू - जस्ट बाय युअर साईड टू ss ! इन फॅक्ट यूS आर गॉड युवरसेल्फ !’ मात्र आपण त्याची दखल घेत नाही


त्याला खरोखर पाहायचेच असेल, अनुभववायचेच असेल तर बाहेर इतरत्र शोधतां आपल्यांतच तर तो दडून बसला नाही ना हे शोधावे. अरे, ‘तुझे आहे तुजपाशीं परी तू जागा चुकलासीअसे होऊं नये

मी म्हणतो की परमेश्वर एकटा असा कधी नव्हताच मुळांत, ‘एकोSहम बहुस्याम्ही थिअरी मला पटत नाही. कारण त्याचे सोबत किंवा खरे तर अंगभूत अशीत्याचीचमाया होती, जीअनेक होण्याची इच्छाशक्ती होती. त्याच दुर्दम्य इच्थाशक्तीचे बळावरपरमेश्वरानेब्रह्मांडाची रचना केली, त्याला आंजारले गोंजारले नि भातुकली सारखे विस्कटून टाकण्याचीप्रेरणादेखील तीच


खूप खूप विषयांतर झाले आहे याची मला नम्र जाणीव आहे, पण मुळांत विषय असा नव्हताच ! मेघांप्रमाणे विचार आले नि गेले, काही शिंतोडे या कागदावर उडवीत ! वाटले तर घ्या, नाहीतर पुसून टाका ! (माऊलींचा एक सुंदर दृष्टांत आहे - स्वातीचा थेंब शिंपल्यांत पडला तर त्याचा मोती होतो नि सर्पमुखांत पडला तर कालकूट ! ‘ ) 


मला इतकेच म्हणायचे होते की सोनेरी रूपेरी केशरी गुलाबी रंग पहांटेच्या अवकाळी मेघांत पाहावे आणि ते विरणारच याचेही भान असू द्यावे, या फालतू बडबडीसारखे ! ! 

रहाळकर

१५ मार्च २०२३




Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?