Friday, February 24, 2023

 

मूसाखेडी !

 मूसाखेडी

इन्दौर नजीक, खरंतर इन्दौर मधेच वसलेलं हे टुमदार खेडें एकेकाळी विलक्षण चेष्टेचा विषय झाला होता इन्दौरच्या वैद्यकीय क्षेत्रांत ! त्याचे मूळ कारण म्हणजे माझ्याहून किमान पाच वर्षे सीनियर असलेले, फायनल एमबीबीएसला प्रथम श्रेणींत प्रथम आलेले गोल्ड मेडॅलिस्ट डॉक्टर डी. मुखर्जी यांचेमूसाखेडीला मेडिकल हपिसर या हुद्द्यावर झालेलीनेमणूक’ ! वास्तविक फर्स्टक्लास फर्स्ट असल्याने त्यांना कोणत्याही विषयांतहाऊसजॉबकरून पदव्युत्तर शिक्षण सुरू ठेवणे शक्य होते. मात्र भोपाल स्थित मेडिकल डायरेक्टोरेट मधल्या ज्यूनिअर लेखनिकाने डायरेक्टरच्या सहीशिक्क्याने तीनेमणूकपरस्पर करून टाकली होती ! पुढे पुढे तर कुणाला शिक्षा करायची असेल किंवा निदान तशी तंबी द्यायची असेल तरमूसाखेडी भेज दूं क्या ?’ अशा शब्दात नामोहरम करता येई


मात्र त्या मूसाखेडीचंही स्वत:चं वैशिष्ठ्य होतं. एक डाक्टर, एक मिडवाईफ, एक वार्डबाय नि एकुलता एक कंपाऊंडर दोन दोन प्राथमिक केंद्रांवर आळीपाळीने हजेरी लावी. इतर सर्व वेळ डाक्टर नि मिडवाईफ निभावून नेत. औषधांची बॅग घेऊन कंपाऊंडर निघून जाई म्हणूननाईलाजास्तवडाक्टर मनांत येतील ती औषधें लिहून देई ! एकूणच सर्व सावळागोंधळ होता त्या काळी ! अशा ठिकाणी आमच्या गोल्ड मेडॅलिस्ट ची नेमणूक म्हणजे चेष्टेचा कहर होता की नाही

थांबीन म्हणतो आत्तां तरी !

रहाळकर

२४ फेब्रुवारी २०२३



Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?