Tuesday, February 28, 2023

 

माझी भटकंती !

 माझी भटकंती !

खरंतर मी भटक्या विमुक्त जमातींत पैदा व्हायचा पण कर्मघर्मसंयोगाने बामणांच्या कुळीं येऊन धडपडलों ! तरीही माझा भटकंतीचा गुणधर्म किंवा स्वभाव मला सोडतां आला नाही कधी. तसे पाहिले तर माझ्या तीर्थरूपांचेही तेच वैशिष्ट्य होते. कोणत्याही नवीन गावांत शिरल्यावर सर्वप्रथम पहाटे उठून ते त्या त्या गावचामुआयनाकरून येत आणि पोस्ट ऑफिस सकट कुठले दुकान कुठे आहे वगैरे इत्थंभूत माहिती गोळा करून येत. मात्र परत फिरताना देवपूजेसाठी फुलें चुकतां आणत असत

मी मघा म्हटलेभटक्या विमुक्त जमातींबद्दल. आमच्या लहानपणी दहाबारा बैलगाड्यांचा काफिला घेऊनगडरिया लुहारही जमात गावोंगांव हिंडत असे. त्यांना कायमस्वरूपी घर किंवा छप्पर कुठेच नसे. त्या काफिल्यांत स्त्रीपुरूष, मुलेमुली नि अगदी नवजात बालकेंही असत. काही कोंबड्या, शेळ्या, एकाद दुसरा घोडा, कुत्री मांजरी नि क्वचित पोपटाचा पिंजराही असे. (अशीच काहीशी परिस्थितीऊंस तोडणी मजुरांचीही असल्याचे ऐकून आहे. ) असो.

मला सांगायचंय माझ्या भटकंती बद्दल. खरोखर मला खूप खूप भटकायला खूप खूप आवडते. फरक इतकाच की मी आधी पाहिलेली किंवा भेट दिलेली गावें शहरें भटकायला जास्त आवडते. उदाहरणच द्यायचे तर काही वर्षांपूर्वी मी चक्क टांगा ठरवून आमच्या जन्मगांवीं इन्दौरचा पुन्हा एकदा फेरफटका मारून आलो आणि प्रत्येक ठिकाणी असंख्य आठवणींत गुम होऊन गेलो होतो

अगदी तशीच स्थिती मी जेव्हा जेव्हा उज्जैन, तराणा, शाजापूर किंवा मुम्बई, लंडन, पांवस अथवा शेगांवला जातो तेव्हा अक्षरश: उफाळून येते. मी हरखतो, हरवतो, गुंगून जातो गतकालीन रम्य स्मृतींत

वयोमानानुरूप आता प्रत्यक्ष भटकंतीवर मर्यादा आल्या असल्या तरीकां जे यया मनाचे एक निकें, जे देखिलिया गोडीचिया ठाया सवके, म्हणौनि अनुभव सुखचि कवतिकें, दावीत जाइजेही उक्ती सार्थ करतोय आतांशा


नाही, एवढ्यातच थांबायचा इरादा नाही आज

मी सांगणार आहे त्या त्या गावांतल्या किंवा शहरांतल्या विशेष जागांविषयी, जिथे मी मनापासून रमतो, तासन् तास स्वत: रमून जातो.

शाजापूरचे गिरवर मारूतीचे देऊळ माझे एक आवडते विश्रान्तिस्थान आहे. अतिशय सुंदर चित्तवेधक आहे ती मूर्ती. शाजापूरचीच रोडेश्वरी देवी चंडिकारूपांत असली तरी अत्यंत मोहक स्वरूप आहे तिचे. खूपसे माझ्या आईसारखे. लंडनच्या ब्लॅकहीथ जवळचे इटुकले तळें नि त्यांत बागडणारी बदकें नि पक्षी पाहात रमायला खूप आवडते मला. पांवसच्या सभामंडपांत तर मी कित्येक तास सहज घालवू शकतो ! तिथून बाहेर पडतांचआरेवारेचा विस्तीर्ण सागरकिनारा मनाला विलक्षण शांती देतो तर गणपतीपुळे नजीकचा विस्तीर्ण जलकुंभ मोहून टाकतो. शिर्डीतलीद्वारकामाईनि साकोरीचा मठ तर मला सतत साद देत राहतो

लंडनमधीलटेट् ब्रिटनहे चित्रशिल्प म्यूझियम मी अनेक वेळा पालथे घातले आहे तर कॉर्नवॉलचा जायगॅन्टिक ॲटलान्टिक मनाला विशालतम करणारा असतो. १०, स्नेहलतागंज मधले नानांचे शान्त पवित्र सभागृह निबरसानाखामगांवचे समाधिमंदिर माझी श्रध्दास्थाने आहेत. पर्थीच्या प्रशांतिमंदिरांत माझी दररोज हजेरी असतेच असते !

अगदी खरं सांगू ? आदित्य शगुनचे ग्यालरीत बसून मी या सर्व ठिकाणी मनसोक्त भटकंती करून येतो मी दररोज ! ! 

रहाळकर

२८ फेब्रुवारी २०२३




Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?